एक्स्प्लोर
माझा व्हिजन : फेरीवाल्यांच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्र्यांची मनसेवर जोरदार टीका
राज्यातील युती सरकारनं 3 वर्ष पूर्ण केली आहेत. कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? असा सवाल विरोधकांना विचारत सत्तेवर आलेल्या फडणवीस सरकारनं 3 वर्षात नेमकं काय केलं?, हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न म्हणजे ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ समीट.
मुंबई : सरकारच्या ३ वर्षपूर्तीनिमित्त एबीपी माझाच्या ‘माझा महाराष्ट्र, माझा व्हिजन’ या कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्याअवैध फेरीवाल्यांचा प्रश्नावरुन मनसेवर जोरदार टीका केली. राजकीय स्वार्थासाठी फेरीवाल्यांविरोधात आक्रमक आंदोलनं केली जात असल्याचं सांगत नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंवर टीका केली.
'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात अनेक दिग्गज नेत्यांनी आपली मतं माडली. यावेळी मुंबई शहराची अवस्था याबाबतही सखोल चर्चा करण्यात आली.
अरविंद सावंत :
- मुंबई महापालिका रुग्णालयांच्या बाबतीत राज्य सरकारपेक्षा पुढे आहे.
- महापालिकेचे अधिकार संकुचित करण्याचे प्रकार सुरु आहेत.
- फेरीवाल्यांबाबत राज्य सरकारनं धोरणं निश्चित केलं पाहिजे
- फेरीवाल्यांकडे सत्ताधाऱ्यांचं दुर्लक्ष होत आहे.
- कोस्टल रोडबाबत आपल्याला निर्णय घ्यावाच लागेल.
- बुलेट ट्रेनला आम्ही योग्य ठिकाणी विरोध नक्कीच करु.
- दिलदार मित्र या शब्दात बरंच काही दडलेलं आहे.
- मुंबईचे मुळचे प्रश्न खराब राजकारणामुळे.
- मुंबईच्या महापौरांना निर्णायचे पुरेसे अधिकार दिले गेले पाहिजेत.
- मुंबई ही सर्वांचीच आहे.
- जिल्हा रुग्णालय, उपकेंद्रांवर डॉक्टर नसल्याने रुग्णांचे मृत्यू
- यवतमाळमध्ये कीटकनाशकांमुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूला आरोग्य विभाग जबाबदार आहे
- राज्यातील पारदर्शकता वेडी झाली, असं राज्यातील शेतकऱ्यांना वाटू नये म्हणजे मिळवलं.
- रुग्णालयामध्ये डॉक्टर नसल्याने अनेक ठिकाणी रुग्णांचे मृत्यू
- महाराष्ट्रातील अर्ध्याहून अधिक प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर नाहीत.
- 10 डिसेंबरपर्यंत राज्यातील खड्डे बुजतील, अशी परिस्थिती नाही आणि नवीन काम सुरु होतील, अशीही स्थिती नाही.
- सरकारने हतबलता दाखवणं हे शोभनीय नाही
- सरकारने हतबलता दाखवणं, हे पहिल्यांदाच आम्ही पाहतोय.
- कंत्राटदार आणि सरकारचं भांडण चालू आहे.
- खड्डे बुजावण्याबाबत चंद्रकांत पाटील हतबल असल्याचे त्यांनी दाखवले.
- प्राथमिक आरोग्य केंद्रांची संख्या घटली नाही, उलट वाढली; उपकेंद्र केवळ महाराष्ट्रातच आहे
- नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र द्या म्हणून आमचे लोकप्रतिनिधी प्रयत्न करत असतात.
- प्रत्येक जिल्ह्यातील 10 रस्ते असे काढणार आहोत, जे पीडब्ल्यूडी करणार आहे.
- लातूर-टेंभुर्णी नॅशनल हायवेकडे रस्ता आहे.
- 15 डिसेंबरपूर्वी रस्ते खड्डेमुक्त करणारच
- शाळाबाह्य विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी वेगळी मोहीम राबवली.
- डिजिटल शाळांसाठी एका मोठ्या उद्योगपतींसोबत चर्चा
- पुढच्या 8 महिन्यात 100 शाळा डिजिटल करु
- मुंबई विद्यापीठा व्यतिरिक्त कोणत्याही शाळेचा, विद्यापीठाचा निकाल लांबला नाही
- शिक्षक बदलीमध्ये केवळ ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत, बदल्या आताच होणार नाहीत, वार्षिक परीक्षेनंतर होतील
- शिक्षण संस्थांची लूट थांबवली, अॅडमिशन प्रक्रिया पारदर्शक केली
- मी शिक्षक मंत्री नाही तर शिक्षण मंत्री आहे, विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी कडक पावलं उचलणार
- ज्या शाळांचा 15-20 टक्के निकाल लागतो, तेथील शिक्षकांना पगारवाढ द्यायची का?
- 85 टक्के शाळा या प्रगत आहेत
- 45 हजार कोटी रुपये शिक्षकांच्या पगारात गुंतवतो.
- बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं निकालाच्या घोळामुळे नुकसान झालं, हे खरंय.
- मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुंच्या हट्टीपणामुळे निकालाचा घोळ
- दिवाळीला प्रमाणपत्र दिलेल्या किती शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा झाले?
- वीज उत्पादनात महाराष्ट्र पुढे, मात्र तरीही आठ-दहा तास लोडशेडिंग
- 2016-17 मध्ये आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 50 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात
- तीन वर्षात 417 आयटीपार्क उभे राहिले
- तीन वर्षात 1208 नवीन उद्योग सुरु झाले, अडीच लाख रोजगार उपलब्ध झाले
- 30 हजार कोटींची परकीय गुंतवणूक एकट्या महाराष्ट्राने गेल्या तीन वर्षात मिळवली.
- राज्यात पुरेशा प्रमाणात वीज
- शेवटचा शेतकरी कर्जमुक्ती होईपर्यंत प्रयत्न करणार
- कर्जमुक्तीसाठी शिवसेना-भाजपमध्ये एकवाक्यता
- कर्जमाफीसाठी लागणारा पैसा हा कष्टकरी जनतेचा आहे.
- अतिशय पारदर्शक कर्जमाफी करण्याचा संकल्प आहे.
- मिलिंद नार्वेकरांना चिठ्ठी पाठवून अल्टिमेटम देणं, इतके माझे वाईट दिवस आले नाहीत.
- काही गोष्टी अयोग्य असतील, पण अंजली दमानियांच्या हेतूवर शंका नाही
- खडसेंच्या चौकशीचा अहवाल आम्ही सभागृहात सादर करु
- घोटाळ्यांमध्ये जे जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल, कोणालाही सोडणार नाही
- महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीमुळे विरोधकांच्या कार्यक्रमाला उपस्थिती
- राजकीय संवाद म्हणून विरोधकांच्या कार्यक्रमांना हजेरी
- जो शेतकऱ्याला हमीभाव मिळाला पाहिजे, तो व्यापाऱ्याला जातोय, हे घोटाळे आम्ही रोखतोय
- कर्जमाफीसाठी आम्ही कोणत्याही शेतकऱ्याला नाकारत नाही, त्रुटी दूर करण्यासाठी शेतकऱ्यांशी संपर्क साधू
- कुपोषणाचा प्रश्न गंभीर, या प्रश्नांच्या मुळाशी जाणं आवश्यक
- कर्जमाफीमध्ये घोटाळे होऊ नये म्हणून प्रचंड अभ्यास केला.
- अवैध फेरीवाले हटवलेच पाहिजेत. त्यांना काढलं जाईल. सरकार ते काम करेल.
- फेरीवाला प्रकरणाला मराठी-अमराठी चेहरा देणं, शुद्ध राजकीय बदमाशी आहे.
- मुंबई बशीसारखी, जोराचा पाऊस आल्यावर पम्प केल्याशिवाय पाणी बाहेर जात नाही.
- आर्थिक स्थिती भक्कम आहे असं नाही, पण स्थिती वाईटही नाही
- कर्ज किती वाढलं हे महत्त्वाचं नाही, कर्ज किती फेडू शकतो हे महत्त्वाचं
- आता सर्वात स्वस्त सोशल मीडिया, त्यावर पैसा खर्च कऱण्याची गरजच नाही
- महाराष्ट्राचा विकास दर 10 टक्के आहे
- महाराष्ट्राच्या जाहिरातीचं बजेट 50 कोटी, 300 कोटी हा आकडा चुकीचा
- घोटाळ्यांच्या चौकशीवरुन दुर्लक्ष नाही, सिंचन घोटाळ्यांची चौकशी सुरुच
- शिवसेनेमुळे राष्ट्रवादीला जवळ करतोय असं अजिबात नाही, विधान परिषदेत आमचं बहुमत नाही, त्यामुळे संवाद ठेवण्याची गरज
- विधानपरिषदेत राष्ट्रवादी मोठा पक्ष, त्यामुळे एखादा कायदा पास करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा करावी लागते.
- विरोधी पक्ष आणि सत्ताधारी, असा दोन्ही स्पेस घेतल्यास लोकांना आवडत नाही, मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेवर निशाणा
- पूर्वी बाळासाहेब होते, चर्चा व्हायची, अलिकडे काही नेत्यांना सरकारवर टीका करण्याची सवय
- थेट सरपंच निवडीला शिवसेनेने विरोध केला, मात्र तो निर्णय वगळता, सर्व निर्णय एकमताने घेतले
- सरकारच्या सर्व निर्णयावर टीका करण्याची मित्रपक्षाच्या काही नेत्यांना सवय
- मी कपटी मित्र कुणालाही म्हटलं नाही आणि आमच्या मित्राला तर नाहीच नाही.
- पवारसाहेबांना या वयात मैदानात उतरावं लागतंय हे सुदैवी की दुर्दैवी त्यांनीच ठरवावं
- शिवसेना असो किंवा भाजप, प्रत्येक प्रश्नावर मंत्र्यांसोबत उतरतो.
- प्रत्येक प्रश्नाला उत्तर देताना मी दिसतो, कारण या सरकारमध्ये आम्ही सामूहिकरित्या काम करतो.
- उद्धव ठाकरेंसोबत संवाद साधण्यासाठी बैठकांची गरज नाही.
- आम्ही सगळंच केलं असं म्हणणार नाही, पण आम्ही योग्य दिशेने आहोत
- मुंबईत मेट्रोचं काम सुरु, एप्रिल 2018 पासून रो-रो सेवा मिळणार
- 31 जानेवारीपर्यंत एलफिन्स्टन, करी रोड आणि आंबिवली स्टेशनवर फूट ओव्हर ब्रीज सैन्य बांधणार
- देशात आलेला गुंतवणूकदार पहिल्यांदा महराष्ट्राकडे येतो.
- मुंबई, पुणे, नागपूर सगळीकडे मोठ्या प्रमाणावर काम सुरु
- शिक्षणात 18 व्या क्रमांकावर होतो, आता 3 ऱ्या क्रमांकावर आलो, आता पहिल्या क्रमांकावर येऊ.
- डिजिटायझेशनमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर
- सर्वाधिक शौचालयं महाराष्ट्रात, 45 लाख शौचालय बांधली
- देशातील सर्वात जास्त शौचालय, ग्रामीण घरं महाराष्ट्रात
- सगळ्यात जास्त ग्रामीण घरं महाराष्ट्रात
- निती आयोगाचा रिपोर्ट, सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात
- महाराष्ट्रात आलेला एफडीआय 1 लाख 29 हजार कोटी आहे.
- नवी मुंबई, नागपूर, शिर्डी अशा सर्वच विमानतळांची काम सुरु केली.
- गेल्या 10 वर्षात महाराष्ट्रात जी रेल्वेची कामं बंद होती, ती सुरु केली.
- 2019 पर्यंत बीडमध्ये रेल्वे नेणार म्हणजे नेणार
- पायाभूत सुविधांवर सर्वाधिक भार, भारतातील पायाभूत सुविधांचे जास्त प्रकल्प महाराष्ट्रात
- सर्वात जास्त इन्फ्रास्ट्रक्चरवर खर्च महाराष्ट्रात होतो.
- सगळ्यात जास्त भर इन्फ्रास्ट्रक्चर दिला आहे.
- सिंचनावर पूर्वी फक्त पैसे खर्च व्हायचे, आता रेकॉर्डब्रेक सिंचन प्रकल्प सुरु केले
- शेतीचा विकासदर 12 टक्क्यांनी वाढला.
- शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शाश्वत कार्यक्रम गरजेचे, शेती शाश्वत झाल्यानंतर आत्महत्या थांबतील.
- आत्महत्या आम्हाला मिळालेली लिगसी, या आत्महत्या आज सुरु झाल्या नाहीत.
- तीन वर्षात शेती क्षेत्रातील गुंतवणुकीत तीन पटीने वाढ
- राज्यातील शेतकरी एकावेळी दोन-तीन पिकं घेतो.
- खोटं बोल पण रेटून बोल, ही विरोधकांची स्टाईल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement