Majha Impact : औरंगाबादच्या वरड गावचा अंधार 30 वर्षांनंतर दूर, एबीपी माझाच्या वर्धापनदिनाच्या पूर्वसंध्येला गाव प्रकाशमान
Majha Impact : औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील बरड वस्ती गेल्या 30 वर्षांपासून अंधारात खितपत पडली होती. मात्र एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत या गावात वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. गावात लाईट नव्हती एबीपी माझाने गावच्या आधारलेल्या व्यथा मांडल्या आणि अवघ्या 10 दिवसांत गाव प्रकाशमान झालं. गावकऱ्यांच आनंदला पारावार उरला नाही.
औरंगाबाद : आज एबीपी माझाचा 14वा वर्धापनदिन. गेली 14 वर्ष एबीपी माझा सामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढत आला आहे. एबीपी माझाची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हवी हे एबीपी माझाच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. एबीपी माझाच्या बातमीनंतर 30 वर्षांपासून अंधारात असलेली एबीपी माझाची बरड वस्ती प्रकाशमान झाली आहे. मंत्री अब्दुल सत्तार आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत काल (सोमवारी) संध्याकाळपासून गावात वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. 30 वर्षांपासूनचा अंधार नाहीसा झाल्यामुळे गावात आज गुढी उभारून आनंद साजरा करण्यात आला.
औरंगाबादमधील सिल्लोड तालुक्यातील बरड वस्ती गेल्या 30 वर्षांपासून अंधारात खितपत पडली होती. मात्र एबीपी माझाच्या बातमीची दखल घेत या गावात वीजपुरवठा सुरु करण्यात आला आहे. गावात लाईट नव्हती एबीपी माझाने गावच्या आधारलेल्या व्यथा मांडल्या आणि अवघ्या 10 दिवसांत गाव प्रकाशमान झालं. गावकऱ्यांच आनंदला पारावार उरला नाही. गावकऱ्यांनी आज आनंदाने गुढ्या उभारल्या आहेत. एबीपी माझाच्या बातमीने 30 वर्ष अंधारात खितपत पडलेल्या बरडवस्ती प्रकाशमान झाली आणि गावकऱ्यांनी खरी दिवाळी साजरी केली. लहान थोरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गावकरी ताल धरत नाचू लागले. घरासमोर सडा सारवन करत रांगोळ्या काढल्यात. एवढचं नाहीतर एकमेकांना पेढे भरवले आणि माझाचे आभार मानले. कारण गावात 30 वर्षांनंतर अंधाराच जाळ फिटलं होतं.
मिणमिणत्या दिव्यात, वाऱ्यावावधनातत दिवा विजू न देण्याची स्पर्धा करत अभ्यास करणारी मुलं या पुढे दिव्याच्या लख्ख प्रकाशनात अभ्यास करतील. 30 वर्ष जे प्रशासनाला दिसलं नाही माझानं दाखवल आणि प्रश्नासन खडबडून जाग झालं लोकप्रनिधी चे डोळे उघडले आणि 30 वर्ष जे झालं नाही ते अवघ्या 10 दिवसात झालं. गेली 14 वर्ष एबीपी माझा लोकांच्या सेवेत आहे. माझाच्या बातमीने आज बरडवस्तीची 30 वर्षांचा अंधाराचा वनवास संपला. संकटात माझा अनेक लोकांच्या मदतीला धावून येतो आणि येत राहील.
दरम्यान, बरड वस्तीवर ही लाईट 30 वर्षांनी आली आहे. 30 वर्ष यांनी अंधारात काढलीत. आज ज्यावेळी पहिल्यांदा लाईट लागली, त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वर्णन शब्दात करणं शक्य नाही. आजवर सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी अनेकदा एबीपी माझानं लढा दिला आहे. एबीपी माझाच्या बातमीने 30 वर्ष अंधारात खितपत पडलेल्या बरडवस्ती प्रकाशमान झाली. 'एबीपी माझा'च्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला सर्वात मोठा माझा इम्पॅक्ट दिसून आला. यामुळे 'एबीपी माझा'च्या 14 वर्षांच्या प्रवासात आणखी एक आनंदाचा क्षण जोडला गेला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :