मतचोरीच्या विरोधात मोर्चा! आयोजकांवर गुन्हा दाखल होणार, भाजपच्या आंदोलनावरही कारवाई होणार
मतचोरीच्या विरोधात विरोधकांना आज काढलेल्या मोर्चाच्या विरोधात गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे.
Mumbai : मतदारयादीतील घोळ आणि मतचोरी विरोधात आज (1 नोव्हेंबर) मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच एकत्रित रस्त्यावर उतरले होते. त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, किसान सभेचे नेते अजित नवले उपस्थित होते. त्याचबरोबर अनेक संघटनांचे पदाधिकाऱ्यांनी देखील मतचोरीच्या विरोधात आज मोर्चा काढला. या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी सत्ताधारी भाजपने देखील आज मूक आंदोलन केलं होतं. या दोन्ही आंदोलनाच्या संदर्भात महत्वाची अपडेट समोर आली आहे.
परवानगीशिवाय मोर्चा आणि आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार
विरोधकांनी आज जो मतचोरीच्या विरोधात सत्याच्या मोर्चा काढला होता, त्या प्रकरणी त्यांच्या गुन्हा दाखल होणार आहे. या प्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल होणार असल्यावही माहिती मिळाली आहे.
तसेच भाजपने देखील विरोधकांच्या मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी आज मुकमोर्चा आंदोलन केलं होतं. त्यांच्या विरोधतही गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण, परवानगीशिवाय मोर्चा आणि आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल होणार आहे. आझाद मैदान पोलीस ठाणे आणि झोन 2 मध्ये डी बी मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होणार आहे.
राज ठाकरेंनी वाचला दुबार मतदारांचा पाढा
1 जुलै 2025 च्या तारखेनुसार उत्तर मुंबईत 1739456 यातील 62370 दुबार मतदार आहेत. राज ठाकरे यांनी मुंबईतील लोकसभा मतदारसंघात किती दुबार मतदार आहेत याची माहिती दिली. मुंबई उत्तर पश्चिम 60231,मुंबई उत्तर पूर्व मध्ये 92983 दुबार मतदार, मुंबई उत्तर मध्ये 63740 दुबार मतदार, मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात 50565, दक्षिण मुंबईत 55205, नाशिक लोकसभा मतदारसंघात 99673 दुबार आणि मावळ 145636 दुबार मतदार आहेत. दुबार मतदार म्हणत राज ठाकरेंनी कागदपत्रांच्या डोंगर दाखवला. राज ठाकरे यांनी याला निवडणुका म्हणतात का? असा सवाल केला. यातून लोकशाही टिकेल का असा सवाल त्यांनी केला. आमदार सांगतो 20 हजार मतं बाहेरून आणली.नवी मुंबईत आयुक्तांच्या बंगल्यावर मतदार नोंदवले गेले. शौचालयात मतदार नोंदवले गेले ही लाजिरवाणी गोष्ट सुरु आहे. मशीन्स च डेमन्स्टार्शन केलं आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत 232 आमदार विजयी होऊनही राज्यभर शांतता होती. सगळ्यांना जर प्रश्न असेल निवडून आलेल्यांना देखील प्रश्न पडला होता. हा सगळं प्रकार निवडणूक आयोगांमार्फत सुरू आहे. हा मतदारांचा अपमान नाही का? त्यांच्या मताला काय किंमत आहे, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
























