एक्स्प्लोर

Winter Assembly Session : राज्याचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होणार, 'या' मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता

Winter Assembly Session : सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अधिवेशनात विरोधकांचा सामना करणार आहेत.

Winter Assembly Session : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन (Winter Assembly Session) आजपासून सुरू होणार आहे. महत्वाच्या विविध मुद्दय़ांवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरण्याची तयारी केली आहे, तर त्यांना सडेतोड उत्तर देण्याची सरकारची तयारी असल्यामुळे आजचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. या अधिवेशनात विशेषत: राष्ट्रपुरुषांच्या अवमानावरून सरकारला घेरण्याचा इशारा विरोधकांनी दिला आहे. तसेच लोकायुक्त कायद्याचं बिल देखील अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सत्तांतर झाल्यानंतर दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) अधिवेशनात विरोधकांचा सामना करणार आहेत. अर्थात त्यांच्या सोबतील नागपूरकर असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) देखील असणार आहेत. मात्र अजित पवारांसारखा विरोधी पक्ष नेता आणि सोबतीला राष्ट्रवादी, शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेससारखे तगडे विरोधक समोर असणार आहेत.  नागपुरात (Nagpur) पार पडत असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्धव ठाकरे देखील उपस्थित राहणार आहेत.

या मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार?
राज्य विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून सीमाप्रश्न, पीक विम्यातील शेतकऱ्यांची फसवणूक, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी, विकासकामांवरील स्थगिती, राष्ट्रपुरुषांच्या अवमान आदी मुद्दय़ांवरून विरोधक सरकारला घेरण्याची शक्यता आहे. 

मविआ आमदारांची बैठक 

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मविआच्या आमदारांची आज बैठक होणार आहे. नागपूर विधान भवनात सकाळी 10 आणि दुपारी चार वाजता ही बैठक होईल. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीची बैठक नागपुरात आयोजित करण्यात आली असून या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. हिवाळी अधिवेशनानिमित्ताने विरोधी पक्षनेते अजित पवार यांची काल पत्रकार परिषद झाली. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. ही आज बैठक होणार आहे, तसेच उद्धव ठाकरे विधान परिषदेच्या कामकाजातही सहभागी होण्याची शक्यता आहे. असेही सांगितले. 

आज सहा मोर्चे निघणार 
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज सहा मोर्चे निघणार आहेत. त्यामध्ये धनगर समाजाचा मोर्चा, विदर्भ जन आंदोलन समितीचा मोर्चा तसेच आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा महत्त्वाचा ठरणार आहे. 

23 विधेयके प्रस्तावित 
सरकारकडून 23 विधेयके प्रस्तावित आहेत. तर 5 अध्यादेश देखील पटलावर ठेवण्यात येणार आहेत. 23 अध्यादेशांपैकी मंत्रिमंडळाची मान्यता प्राप्त 12 विधेयकं आहेत तर मंत्रिमंडळ मान्यता सापेक्ष 11 विधेयकं आहेत. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र लोकायुक्त विधेयक, 2022 मान्यतेसाठी मांडण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले होते.

नागपूर शहर सज्ज, सात मार्गावरील वाहतूक वळवली
दरम्यान अधिवेशनासाठी नागपूर शहर देखील सज्ज झालं आहे. अधिवेशनामुळं शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. विधानभवनाचे (Vidhan Bhavan) कामकाज सुरू असताना सात मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली असून चार मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 18 ठिकाणी वाहतूक संथ होणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले आहे.

सत्तांतर झाल्यानंतर नागपूरमध्ये प्रथमच अधिवेशन
महाविकास आघाडी सरकारच्या काळात डिसेंबर 2019 मध्ये नागपुरात हिवाळी अधिवेशन पार पडलं होतं. त्यानंतर कोरोना प्रादुर्भावामुळं नागपूरऐवजी मुंबईतच अधिवेशन पार पडले होते. आता राज्यात सत्तांतर झाल्यानंतर नागपूरमध्ये पहिलंच हिवाळी अधिवेशन पार पडत आहे. सत्तांतरांनंतर ऑगस्ट महिन्यात पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजापासून उद्धव ठाकरे दूर राहिले होते.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 07 PM TOP Headlines 07 PM 08 November 2024Maharashtra SuperFast | राज्यातील बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06 PM 08 November 2024Vidhan Sabha SuperFast | विधानसभा निवडणुकीचा सुपरफास्ट आढावा एका क्लिकवर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
Video: आधी विनंती, नंतर हात धरला; विराट कोहलीच्या चाहत्याने अखेर सेल्फी काढला; व्हिडिओ व्हायरल
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
मावळ पॅटर्नवाल्या बापू भेगडेंसह 8 जणांवर कारवाई; राष्ट्रवादीतून हकालपट्टी, तटकरेंकडून पत्र जारी
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
अजित पवारांसह 74 राजकीय नेत्यांवर आरोप असलेला शिखर बँक घोटाळा झालाच नाही; पोलिसांची दुसऱ्यांदा कोर्टात धाव
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 नोव्हेंबर 2024 | शुक्रवार 
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
राज ठाकरेंच्या सभेवरुन घरी परतताना मनसैनिकांच्या गाडीला अपघात; 3 जण रुग्णालयात दाखल
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
अमित शाहांकडून मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावाचे संकेत; उपमुख्यमंत्री अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया
Washim Assembly Election : भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
भाजपची अंतर्गत नाराजी, मविआचं पारडं जड; वाशिमच्या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार? 
CJI DY Chandrachud : तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
तारीख पे तारीख झाली, थेट टीका सुद्धा झाली, पण खरी शिवसेना, सत्तासंघर्षावर निकाल नाहीच! सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचुड यांना सुप्रीम कोर्टातून निरोप
Embed widget