एक्स्प्लोर

Palash Muchhal and Mary Dcosata: पलाश मुच्छल अन् मेरी डिकॉस्टाचं अफेअर? मोबाईलवरचं सिक्रेट चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल

Palash Muchhal and Mary Dcosata: पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टा यांच्या अफेअरची सोशल मीडियावर जोरदार चर्चा. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचं लग्न तुटल्याची माहिती समोर येत आहे.

Smriti Mandhana & Palash Muchhal: गेल्या काही दिवसांपासून बॉलीवूड इंडस्ट्री, क्रिकेटविश्व आणि सोशल मीडियावर प्रचंड चर्चा असलेले स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचे लग्न स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना (Shrinivas Mandhana) यांना  छातीत दुखू लागल्याने अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले होते. आता हा लग्नसोहळा कधी होणार याबाबत उत्सुकता असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्मृतीच्या (Smriti Mandhana) वडिलांना हार्टअटॅक आल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे कारण हे केवळ बाहेर दाखवण्यासाठी असून या सगळ्यामागे वेगळ्याच गोष्टी दडल्याची चर्चा कालपासून सोशल मीडियावर  रंगली आहे. त्यानुसार पलाश मुच्छल (Palash Muchhal) याचे नृत्यदिग्दर्शक असणाऱ्या मेरी डिकॉस्टा (Mary Dcosata) या मुलीशी प्रेमसंबंध असल्याचे सांगितले जात आहे. लग्नाच्या आदल्या दिवशी पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टा यांचे मोबाईलवरील चॅटिंग लीक झाल्याने हे लग्न तुटल्याची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. 

पलाशने स्मृती मानधनाचा विश्वासघात केल्याचे आणि तो  मेरी डिकॉस्टा या एका मुलीसोबत चॅट करत असल्याचे स्क्रीन शॉट सोशल माध्यमावर व्हायरल होत आहेत. पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टाचे चॅट हे स्मृती सोबत पलाशचे लग्न  ठरल्यानंतरचे असल्याचे सांगितले जाते. या चॅटची  abp  माझा  पुष्टी करत नाही. मात्र, या व्हायरल होत असलेल्या चॅटबाबत पलाश किंवा स्मृती मानधना यांच्याकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. 

पलाशचे हे चॅट समोर आल्याने  स्मृती आणि पलाशचे या कारणाने तर पुढे ढकलले नाही ना, असा प्रश्न सोशल माध्यमावर  विचारला जात आहे.  दरम्यान स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांची तब्येत आता स्थिर असून कोणताही धोका नाही. डॉक्टरांनी केलेल्या अँजिओग्राफीमध्ये कोणताही ब्लॉकेज नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे मानधना कुटुंबाने सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर पलाश आणि स्मृती यांचे लग्न कधी होणार ही चर्चा रंगली असताना पलाश व मेरीचे चॅट समोर आल्याने याप्रकरणारे वेगळेच वळण घेतले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmymantra Media (@filmymantramedia)

Mary Dcosata news: मेरी डिकॉस्टा कोण?

मेरी डिकॉस्टा ही नृत्यदिग्दर्शक आहे. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्या लग्नसोहळ्यात दोघांच्या डान्सची कोरिओग्राफी मेरी डिकॉस्टा करणार होती. गेल्या काही महिन्यांपासून पलाश मुच्छल आणि मेरी डिकॉस्टा यांचे अफेअर सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या दोघांच्या चॅटिंगवरुन दोघांमध्ये बरीच जवळीक असल्याचे दिसत आहे.

आणखी वाचा

स्मृती मानधनानंतर लग्नाला गेलेल्या टीम इंडियातील खेळाडूंनीही तेच केलं, 24 तासांत सगळे फोटो गायब, नेमकं काय घडलं?

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Agarkar: निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांचा पगार किती कोटींच्या घरात? पदावर येताच बीसीसीआयने दिली होती तब्बल 300 टक्क्यांची घसघशीत वाढ!
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
मुथय्या मुरलीधरन ते वसीम अक्रम! 'असा' पराक्रम करणारे फक्त पाचच गोलंदाज, भारतीय खेळाडूचा समावेश आहे का?
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Ind vs Pak Hockey: जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर
जय हो... 'वर्ल्ड कप' सामन्यात भारताने पाकिस्तानला धूळ चारली, 16 वर्षानंतर आमने-सामने; पाकिस्तान स्पर्धेतून बाहेर

व्हिडीओ

Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nashik Crime News: नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
नाशिकमधील विवाहबाह्य प्रेमप्रकरणाचा भयंकर शेवट, वेळ देत नसल्यामुळे तिची चिडचिड, कडाक्याचं भांडण, रागाच्या भरात त्याने कार अंगावर घातली अन्...
Bus Fire Accident: सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
सकाळी सव्वा दहाची वेळ; गाडीत बिघाड झाल्याचं चालकाच्या लक्षात आलं अन्..., पिंपरी चिंचवडमध्ये स्कुल बस जळून खाक
Pune Crime News: राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
राजगडावरून फिरून आले; मध्यरात्री वेताळ टेकडीवर गेले अन्... अल्पवयीन मित्रांनीच मित्राला हातोडी डोक्यात घालून संपवलं
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
लग्नासाठी चढवली होती वर्दी, प्रवासी अन् पोलिसांना धूळ चारली; अखेर रेल्वे स्टेशनवरील तोतया महिला अटकेत
Sajjan Kumar: काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
काँग्रेस नेते सज्जन कुमार यांचे तिहार तुरुंगात निधन, शीखविरोधी दंगली प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगत असतानाच अखेरचा श्वास घेतला
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
Video: धक्कादायक! झेडपी शाळेत चक्क खासगी शाळेतील विद्यार्थी बसवले; अभिजीत दिपकेंसमोरच मुलांची कबुली
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
दिल्लीतील पाकिस्तानी उच्चायुक्तालयाच्या दारात बुलडोझर फिरवला; बॅरिकेड्स आणि कुंपण हटवलं, इस्लामाबादमधील कारवाईनंतर जोरदार प्रत्युत्तर
Nashik Crime News: मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
मैत्रीत दगाफटका; फिरायला गेले अन् मित्राने महिलेला कारनं चिरडलं, अपघाताचा बनाव रचला पण..., असं फुटलं बिंग, नाशिकमधील घटना
Embed widget