![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Maharashtra Weather : नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी! पुढील काही दिवस राज्यातील हवामान कसं असेल?
Cold Weather in Maharashtra, IMD Update : राज्यात नववर्षात थंडी आणि धुक्यासह पावसाची रिमझिमही पाहायला मिळणार आहे. पुढील काही दिवस राज्यातील हवामान कसं असेल, हे जाणून घ्या.
![Maharashtra Weather : नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी! पुढील काही दिवस राज्यातील हवामान कसं असेल? Maharashtra Weather Update Today Cold Weather in Maharashtra rain alert IMD Update marathi news Maharashtra Weather : नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी! पुढील काही दिवस राज्यातील हवामान कसं असेल?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/12/28/cf36663937d4fb5a16aa053183f619011703730261427322_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Maharashtra Weather Update Today : राज्यात थंडी (Winter) आणि धुक्यासह (Fogg) पावसाची रिमझिमही ( Rain Update ) पाहायला मिळणार आहे. सध्या राज्यातील (Maharashtra) तापमानात (Temperature Drops) कमालीची घट झाली आहे. सकाळी आणि रात्री थंडी (Cold Weather) तर दुपारी तापमानात वाढ दिसून येत आहे. मुंबईसह (Mumbai) उपनगर, ठाणे (Thane) आणि कोकणातही (Kokan) तापमानाचा पारा घसरला आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवसात राज्यातील तापमानात आणखी बदल होऊन पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) वर्तवला आहे.
राज्यातील तापमानात घट होण्याचा अंदाज
येत्या दोन दिवसात महाराष्ट्रातील हवामानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. डिसेंबरअखेर आणि जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील किमान तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे वर्षाअखेर आणि नववर्षाच्या स्वागताला पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आयएमडीमे वर्तवली आहे.
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे राज्यात हुडहुडी
काश्मीर खोऱ्यात जोरदार बर्फवृष्टी पाहायला मिळत आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमध्ये पाऊस आणि बर्फवृष्टी सुरु आहे. पर्वतीय भागात होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे मैदानी भागात थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे. यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. उत्तरेकडील थंड वाऱ्यांचा परिणाम राज्याच्या वातावरणावरही होत असल्याचं दिसत आहे.
उत्तर महाराष्ट्रात गारठला
उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. येत्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमान 10 अंशाखाली जाण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकणात देखील तापमानाचा पारा घसरण्याची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, मुंबई, ठाण्यातील किमान तापमान 14 ते 17 अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यत आहे. पश्चिम महाराष्ट्रात देखील काही भागात किमान तापमान 10 अंशांवर येणार आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातही जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. मराठवाड्यात अनेक जिल्ह्यांमध्ये देखील किमान तापमानात घट होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)