एक्स्प्लोर

Maharashtra weather update: उत्तरेत पावसाच्या शक्यता, महाराष्ट्रात पुढील 24 तासांत हवामान बदलणार; वर्षाअखेरीस हवामान खात्याचा अंदाज काय?

येत्या 24 तासात देशभरात हवामान बदलणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय. सध्या उत्तरेत बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Maharashtra weather update: देशभरात तापमानाचा नीचांक नोंदवला जातोय. उत्तर भारतात शीतलहरींमुळे प्रचंड गारठा वाढला असून हरियाणातील हिस्सारमध्ये काल 2.5°c तापमानाची नोंद झाली. उत्तरेकडील शीत लहरींचा परिणाम महाराष्ट्रावरही झाला आहे. उत्तरेकडील वारे हळूहळू दक्षिणेकडे येत असल्याने महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर वाढला आहे. पण येत्या 24 तासात देशभरात हवामान बदलणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिलाय. सध्या उत्तरेत बहुतांश राज्यांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिमी झंजावातामुळे हवामानात मोठा बदल होणार आहे. उत्तरेत अनेक भागात धुक्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 

उत्तर भारतातील काही भागात धुक्यामुळे, निवडक विमानतळांवरील विमान वाहतुकीवर परिणाम होणार असल्याचे सांगण्यात येतंय. यामुळे प्रवाशांना विलंब होऊ शकतो. प्रवाशांना अधिकृत विमान सेवांची माहिती अपडेट करण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

हवामान विभागाचा अंदाज काय? 

सध्या उत्तर भारतात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. जम्मू- काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. अनेक राज्यांमध्ये धुक्याची चादर कायम आहे. हवामान विभागाने वर्तवलेली पावसाची शक्यता ही उत्तरेतील राज्यांमध्ये काही तुरळक भागांमध्ये वर्तवण्यात आल्याने त्या भागात दोन ते तीन अंशांनी तापमानात वाढ होणार आहे. गारठा कायम राहणार असून पंजाब हरियाणा मध्य प्रदेश या राज्यांमध्ये 30 डिसेंबरपर्यंत  थंडीची लाट कायम राहणार आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे. महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहणार आहे. प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार पुढील 4 दिवसात किमान तापमान 1 ते 2 अंशांनी घटणार आहे. सध्या पश्चिमी झंजावात उत्तरेकडे तयार होत असून त्यामुळे हा हवामान बदल होणार असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात पुढील पाच दिवस हवामान कसे? 

राज्यात पुढील पाच दिवस हवामानात दोन ते तीन अंशांची घट होण्याची शक्यता आहे. आज राज्यातील बहुतांश भागात 10 अंशांच्या खाली तापमान गेले आहे. अहिल्यानगर 7.7, छत्रपती संभाजी नगर 10.5, मालेगाव 10, नाशिक 9.8, परभणी 9.9, सातारा 10.8, पुण्यात 11.9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.  बहुतांश ठिकाणी पारा घसरला आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात थंडीची तीव्रता वाढली असून काही भागांमध्ये सकाळी आणि संध्याकाळी व रात्री प्रचंड गारठा जाणवतोय. 

प्रादेशिक हवामान केंद्राच्या अंदाजानुसार महाराष्ट्रात पुढील पाच दिवस किमान तापमान 1 ते 2 अंशांनी घसरणार आहे. पुढील 24 तासानंतर हळूहळू 2 ते 3 अंशांनी तापमानात वाढ होईल असे सांगण्यात आले आहे. पुढील पाचही दिवस राज्यात कोरडे व थंड हवामान राहण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
कपिल सिब्बल यांचे दावे बिनबुडाचे, माझाच निर्णय खरा ठरणार, राहुल नार्वेकर यांचं प्रत्युत्तर!
Snakebite : सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद
सर्पदंश आता ‘अधिसूचित आजार’ घोषित; साप चावल्यास लस, उपचार अन् मृत्यूची होणार नोंद

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
मुंबईत रिक्षा चालवणार, पैसे कमावणार... पण मराठी बोलणार नाही; उत्तर भारतीय रिक्षा चालकाचा माज, प्रताप सरनाईकांना थेट चॅलेंज
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Maharashtra Live blog updates: जळगाव जिल्ह्यात भुसावळ शहरात,मिरची पूड फेकून धान्य व्यापाऱ्याची लूट; पंधरा लाखांची रोकड लंपास
Rapido Uber OLA new Rules: ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
ओला, उबेर, रॅपिडो वाहनचालकांसाठी 1 सप्टेंबरपासून नवे नियम लागू, परिवहन विभागाच्या आठ निर्णयांनी सर्वच बदलणार
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Home Loan : 20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे, प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
20 वर्षांचं गृहकर्ज 12 वर्षात कसं फेडायचं? 5 सोपे,प्रभावी उपाय आणि लाखो रुपये वाचवा,जाणून घ्या
Satyendar Jain Arrested: आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक, मोदी सरकारचा अंत निश्चित, केजरीवालांचा आरोप, भाजपकडूनही पलटवार
मोठी बातमी, आम आदमी पार्टीचे नेते सत्येंद्र जैन यांना एसीबीकडून अटक
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
Embed widget