Maharashtra Weather Update: उन्हाचा चटका वाढला, येत्या 3 दिवसांत मध्य महाराष्ट्रासह उर्वरित राज्यात हवामान अंदाज काय?
गेल्या दोन दिवसात थंडीत काहीशी वाढ झाली होती. पहाटे गारवा व दुपारी उन्हाचा चटका अशीच स्थिती कायम होती.

Maharashtra Weather Update: राज्यात फेब्रुवारी महिन्यापासून तापमानवाढीचा इशारा देण्यात आला असला तरी येत्या काही दिवसात तापमानात बदल होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. उत्तरेकडील राज्यांमध्ये असणाऱ्या कडाक्याच्या थंडीचा राज्यातील तापमानावर परिणाम होत असून तापमानाचा पारा चढउतार होत आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रात (Temperature) तापमानात 1-3 अंशांनी घट झाली होती. आता येत्या चार दिवसात मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण विभागात कमाल तापमानाचा पारा वाढणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलंय. त्यामुळे नागरिकांना उष्ण वाऱ्यांसह उन्हाचा चटका सहन करावा लागणार आहे. (IMD Foreast)
येत्या चार दिवसांसाठी काय दिलाय हवामान अंदाज?
हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, येतया 3 ते 4 दिवसांत कोकण , मध्य महाराष्ट्र, मराठवाडा भागात कमाल तापमान 2-3 अंशांनी वाढणार असल्याचं सांगण्यात आलंय. (Temperature) किमान तापमान गेल्या काही दिवसांपासून वाढले आहे. त्यात पुढील तीन ते चार दिवस फारसा बदल झालेला नसेल. तसेल विदर्भातील तापमानातही फारसा बदल नसून संपूर्ण महाराष्ट्रात कोरडे हावामान राहणार आहे. गेल्या दोन दिवसात थंडीत काहीशी वाढ झाली होती. पहाटे गारवा व दुपारी उन्हाचा चटका अशीच स्थिती कायम होती. मराठवाड्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण पहायला मिळाले. त्यामुळे किमान तापमान वाढण्याचा अंदाज आता वर्तवला जात आहे. हवामान विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज दिलाय.दरम्यान उत्तर, मध्य महाराष्ट्रात फेब्रुवारीच्या पहिल्या 15 दिवसांत काही दिवस थंडी कायम राहण्याचा अंदाजही देण्यात आलाय. (February Weather)
उन्हाच्या झळा, तापमान कसे?
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या हवामान अहवालानुसार, देशभरात फेब्रुवारी महिन्यापासून किमान आणि कमाल तापमान सरासरीहून अधिक राहणार असल्याचं सांगण्यात आलंय. मुंबई, किनारपट्टी व उत्तर व मध्य महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढणार असला तरी उत्तर महाराष्ट्रात चार ते पाच दिवस तीव्र थंडी राहण्याची स्थिती आहे. सध्या प्रशांत महासागरात ला नीना स्थिती सक्रीय असून मध्य व पूर्व भागात तापमान सामान्य तापमानाच्या खाली आहे. म्हणजेच कमजोर आहे. एप्रिलच्या शेवटी ला नीना सक्रीय होऊन तो पुन्हा तटस्थ होणार आहे. असं हवामान विभागानं वर्तवलंय. (IMD) येत्या पाच दिवसात मराठवाड्यात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून उत्तर मराठवाडयात भागात दिनांक 02 व 03 फेब्रुवारी रोजी तूरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उर्वरित भागात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.
हेही वाचा:
फेब्रुवारीपासूनच उन्हाचा चटका वाढणार, IMD चा तापमानवाढीचा इशारा, थंडी कितपत राहणार? वाचा सविस्तर
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
