Maharashtra weather update: घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा, पुढील 5 दिवस पुन्हा पावसाचा जोर वाढणार
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होत असून चक्राकार वाऱ्यांचे प्रवाह राजस्थान तसेच पंजाब व आजूबाजूच्या परिसरात सक्रिय होत आहेत

Maharashtra weather update: गेल्या आठवड्यात राज्यभरात विविध ठिकाणी पावसाचा जोर वाढला होता . मुंबईसह राज्यभरात पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर या आठवड्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे .तरीही काही तुरळक भागात हवामान खात्याने मुसळधार पावसाचे अलर्ट दिले आहेत .पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड या भागात आज मुसळधार पावसाच्या शक्यता आहे .
23 Aug, 1.25 pm, Possibility of light to mod thunderstorms during next 3,4 hrs at isolated places over Maharashtra including ghat areas as seen from the latest satellite obs
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 23, 2025
Pl watch IMD alerts. pic.twitter.com/vHqtZy34QH
हवामान विभागाचा अंदाज काय ?
बंगालच्या उपसागरात पुन्हा एकदा कमी दाबाचा पट्टा तयार होत असून चक्राकार वाऱ्यांचे प्रवाह राजस्थान तसेच पंजाब व आजूबाजूच्या परिसरात सक्रिय होत आहेत .परिणामी, 25 तारखेपासून कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलं .
25 ते 28 ऑगस्ट दरम्यान कोकण गोवा तसेच मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते मुसळधार पावसाची नोंद होऊ शकते असा अंदाज IMD ने वर्तवला आहे .
पुढील पाच दिवस कुठे काय अलर्ट ?
राज्यात पुढील पाच दिवस मध्य महाराष्ट्र विदर्भ व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचे अलर्ट देण्यात आले आहेत . आज (23 ऑगस्ट ) रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावरही पावसाचा यलो अलर्ट आहे . मराठवाड्यात धाराशिव लातूर व नांदेडमध्ये मुसळधार पावसाच्या शक्यता असून या जिल्ह्यांनाही हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे .
दरम्यान रायगड, पुणे, सातारा, कोल्हापूरसह उद्या (24 ऑगस्ट) मराठवाड्यात परभणी नांदेड व हिंगोली मध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.
25 ऑगस्ट : 25 ऑगस्ट पासून विदर्भ मराठवाड्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असून संपूर्ण विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलाय .मराठवाड्यातील हिंगोली परभणी नांदेड लातूर जिल्ह्याला पाऊस झोडपणार असून कोकणपट्ट्यातील रायगड रत्नागिरी व मध्य महाराष्ट्रात नाशिक पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे .
26 ऑगस्ट : संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट, मुंबई सगळं ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग तसेच पुणे सातारा व कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय . बहुतांश महाराष्ट्रात हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे .
27 ऑगस्ट : मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी सह नाशिक पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथ्यावर पावसाचा येलो अलर्ट आहे .बुलढाणा अकोला वाशिम तसेच नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यालाही पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय .
























