एक्स्प्लोर

Weather Update: कुठे अतिवृष्टी तर कुठे विश्रांती; राज्यात आज मुसळधार पावसाची शक्यता, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Maharashtra Weather Update: पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

पुणे: राज्याच्या अनेक भागात पावसाने विश्रांती घेतली आहे, तर अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे, आज हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 24 तासांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आज कोकणातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. 

राज्यात आजच्या दिवस पाऊस

राज्यात आज (बुधवार) पर्यंतच पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. उद्या (गुरुवार) पासून राज्यात पाऊस विश्रांती घेण्याची शक्यता आहे. सध्या 15 ते 16 सप्टेंबरपर्यंत खंड पडणार असल्याची माहिती आहे. त्यानंतर राज्यात काही ठिकाणी रिमझिम पावासाची शक्यता आहे. त्यानंतर 27पासून पुन्हा मुसळधार पावसाची (Heavy Rain) शक्यता आहे.

गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्गात मोठी वाढ

गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सातत्यानं मुसळधार पाऊस (Heavy Rain) होत आहे. परिणामी, धरणाच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्यानं धरण प्रशासनानं धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गात मोठी वाढ केली आहे. धरणाचे सर्व 33 दरवाजे कालपासून उघडण्यात आले असून आज सकाळपासून धरणाचे सात दरवाजे दोन मीटरनी तर, 26 दरवाजे दीड मीटरनी सुरू करण्यात आले आहे. सध्या धरणातून 3 लाख 93 हजार 619 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. सातत्यानं पाऊस सुरू राहिल्यास पाण्याच्या विसर्गात आणखी मोठी वाढवण्याची शक्यता असल्यानं नदीकाठावरील गावातील नागरिकांनी सतर्क रहावं, असा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

गोंदिया जिल्ह्यात पावसाने घेतली विश्रांती

गोंदिया जिल्ह्यात काल मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यातील संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालं होतं अनेक भागाला पुराचा फटका बसला होता. नदी नाले हे तुडुंब भरून वाहत होते. अनेक मार्ग बंद करण्यात आले होते .परंतु आता काल रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतली असून जिल्ह्यातील परिस्थिती आता हळूहळू पूर्व पदावर यायला सुरुवात झाली आहे. अशातच नदी आणि नाल्याच्या बाजूला असणाऱ्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे आता या शेतीचे पंचनामे लवकरात लवकर महसूल विभाग आणि कृषी विभाग करतील असे अपेक्षा आता नागरिक करत आहेत.

भंडाऱ्यात मुसळधार पावसाच्या नदीपत्राच्या प्रवाहात क्रेन गेली वाहून

भंडारा जिल्ह्यात परवा सायंकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीनाले प्रवाहित झालेले आहे. दरम्यान, भंडारा शहरालगत सुरू असलेल्या बायपासच्या निर्माणाधीन कामावर वैनगंगा नदीच्या कोरंबी परिसरात मोठ्या पुलाची निर्मिती होत आहे. या कामावर असलेली क्रेन मुसळधार पावसामुळं वैनगंगा नदी प्रवाहित झाल्यानं या प्राण्याच्या प्रवाहात भलीमोठी क्रेन वाहून गेल्याचा प्रकार आज सकाळी घडला. ही क्रेन नदीपत्रातून वाहत जात असताना या परिसरात असलेल्या मोठ्या हायटेन्शन वायर तुटल्यात. नागरिकांच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी ठरली असली तरी, क्रेन नदीपत्रातून वाहून जात असल्यानं पुढील गावातील गावकऱ्यांना धोक्याची शक्यता नाकारता येत नाही, यादृष्टीेनं प्रशासनानं आता नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रामनाथ कोविंद हे भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट; ठाकरे गटाच्या खासदाराची जीभ घसरली
रामनाथ कोविंद हे भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट; ठाकरे गटाच्या खासदाराची जीभ घसरली
Chandrakant Patil On Rahul Gandhi : तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकात पाटलांची टीका
तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकात पाटलांची टीका
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MVA Mumbai Seat : वादातल्या मुंबईतल्या 6 ते 7 जागांवर लवकरचा तोडगा, दोन दिवस बैठक सुरु राहणारMVA Wardha Pattren :मतदारसंघासाठी देवाण-घेवाण,  महाविकास आघाडीत वर्धा पॅटर्नच्या पुनरावृत्तीची शक्यताSalim Khan  Threat : सलमानच्या वडिलांना लॉरेन्स बिश्नोईच्या नावे अज्ञात महिलेची धमकीJay Malokar Brother : जय मालोकारचा मृत्यू जबर मारहाणीनं, भावाची प्रतिक्रिया काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रामनाथ कोविंद हे भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट; ठाकरे गटाच्या खासदाराची जीभ घसरली
रामनाथ कोविंद हे भाजपच्या पिंजऱ्यातील पोपट; ठाकरे गटाच्या खासदाराची जीभ घसरली
Chandrakant Patil On Rahul Gandhi : तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकात पाटलांची टीका
तुमचा नेता इंग्लंडमध्ये बसून आरक्षण घालवतो असं म्हणतो आणि आम्ही आरक्षण घालवणार अस सांगता; चंद्रकात पाटलांची टीका
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
राज्यात सलग 11 दिवस कोसळणार मुसळधार पाऊस, पंजाबराव डखांनी वर्तवला अंदाज, कधीपासून सुरु होणार पाऊस?
Ratnagiri Crime News : व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
व्यक्तीला पडलेल्या स्वप्नावर आधी FIR नोंदवला, मग तपास केला अन् समोर आला कुजलेला मृतदेह
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि नक्षत्र बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Kolhapur Vidhan Sabha : सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर, आता आणखी एका पक्षाची एन्ट्री; कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीला तगडा झटका?
Liquor Policy: मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! फक्त 99 रुपयांना मिळणार तुमच्या आवडीचा ब्रँड, नेमकं धोरण काय?
Pitru Paksha 2024 : पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
पितृ पक्षाचा काळ 5 राशींसाठी ठरणार अडचणींचा; नोकरी-व्यवसायात डाऊनफॉल, आर्थिक स्थितीही ढासळणार
Embed widget