घराबाहेर पडताना काळजी घ्या! मुंबई, ठाण्यात रिमझिम पावसाच्या सरी; विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी
Maharashtra Weather Update : ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबई : आज दक्षिण कोकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोकणासह मध्य आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. या भागात 40-50 किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरी
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, आज सोलापूर, लातूर, धाराशिव, पालघर, नांदेड या जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी पाहायला मिळतील. तसेच या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर कोंकण, उत्तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 किमी प्रतितास वेग), मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) June 11, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या pic.twitter.com/NL3za8ipG8
आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट
आयएमडीच्या अंदाजानुसार, ठाणे, मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी या भागात मध्यम ते हलक्या पावसाच्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय, जळगाव, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, या भागातही पावसाची शक्यता आहे. सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
#हवामानअंदाज
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) June 11, 2024
आज व उद्या दक्षिण कोंकणासह दक्षिण मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी, उत्तर कोंकणासह मध्य व उत्तर मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तसेच मराठवाड्यातील काही ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.#WeatherUpdate pic.twitter.com/PuEu7XQLds
विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता
दरम्यान, हवामान विभागाने विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :