अवकाळी पावसाची हजेरी! अमरावतीत ऑरेंज तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात यलो अलर्ट
Maharashtra Weather Latest Update : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुंबई : राज्यात आज कोकण विभाग (Kokan Region) वगळता अनेक भागात उष्णतेच्या लाटेपासून (Heatwave) दिलासा मिळाला आहे. मुंबईसह (Mumbai) कोकणात (Kokan) उन्हाचा जोर वाढला असताना, राज्यात इतर ठिकाणी अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) वाढत्या तापमानापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. विदर्भ (Vidrabh), मराठवाडा (Marathwada) यासह मध्य महाराष्ट्रातही (Madhya Maharashtra) अनेक भागात अवकाळी पावसाने (Rainfall) हजेरी लावली आहे. अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाने पहाटेपासूनच हजेरी लावली आहे.
आज अवकाळी पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र (Madhya Maharashtra) आणि मराठवाड्यात (Marathwada) तुरळक ठिकाणी पाऊस (Rain) किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) जारी केलेल्या ताज्या अंदाजानुसार, आज 9 मे रोजी पुणे, नाशिक, सोलापूर, सांगली, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. यावेळी सोसाट्याचा वारा पाहायला मिळणार असून वाऱ्याचा वेग 40 ते 50 किमी प्रति तास असण्याची शक्यता आहे.
#WeatherUpdate
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 9, 2024
हवामान अंदाज : मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता… pic.twitter.com/FAWx9SP4Dr
या भागात पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट
हवामान विभागाने आज नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सोलापूर, औरंगाबाद या भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे. तर सातारा, कोल्हापूर, जळगाव नंदुरबार, धुळे या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्याला आज पाऊस आणि गारपीट होण्याचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, गारपीट आणि सोसाट्याचा वारा (40-50 kmph) पाऊस पडण्याची शक्यता आहे.
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) May 9, 2024
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/EGGvZknH4P
विदर्भात पावसासह गारपीट होण्याची शक्यता
याशिवाय, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता असून काही ठिकाणी गारपीट होण्याचाही अंदाज आहे. अहमदनगर, जालना, परभणी, बीड या भागात तुरळक ठिकाणी विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. याशिवाय काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर 10 मे रोजी वातावरण सामान्य राहण्याचा अंदाज असून पावसाची शक्यता नाही.
महत्त्वाच्या इतर बातम्या :