एक्स्प्लोर

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! 'या' तारखेपासून अवकाळी पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? 

राज्यातील वातावरणात (Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत.

Maharashtra Weather News : राज्यातील वातावरणात (Weather) सातत्यानं बदल होत आहे. कुठं थंडीचा कडाका (Cold Weather) जाणवत आहे, तर कुठं ढगाळ वातावरण आहे. या बदलत्या वातावरणामुळं शेतकरी (Farmers) चिंतेत आहेत. कारण बदलत्या वातावरणाचा फळपिकांना मोठा फटका बसत आहे. दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे.  राज्यात 20 तारखेपर्यंत हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर 21 तारखेपासून राज्यात अवकाळी पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. 

नेमकं काय म्हणाले पंजाबराव डख?

पंजाबराव डखांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्रात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे. राज्यात 19 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी पडणार असल्याची माहिती पंजबाराव डखांनी दिली आहे. 

शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी?

सध्या अनेक शेतकऱ्यांची कांदा काढणी सुरु आहे. ज्या शेतकऱ्यांचा कांदा काढणीस आला असेल‌ अशा शेतकऱ्यांनी कांदा काढणी करुन झाकून ठेवावा असा सल्ला पंजाबराव डख यांनी दिला आहे. कारण महाराष्ट्रात 21 डिसेंबर ते 26 डिसेंबर दरम्यान भाग बदलत अवकाळी पाऊस पडणार आहे. राज्यात 19 तारखेपर्यंत कडाक्याची थंडी पडणार आहे. जे तिरुपतीला दर्शनाला जाणार आहे त्यांच्यासाठी महत्वाची माहिती आहे. 17, 18, 19 डिसेंबरला तिरुपती, तामिळनाडू भागात अवकाळी पावसाची शक्यता असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. पुढील काहि दिवस  थंडीचे आहेत. शेतकऱ्यांनी, रब्बी पिकांचे सिंचन, तणनियंत्रण व खत नियोजन यांचा मेळ घालून पीक वाढीचा वेग-दर साधावा. शेतकऱ्यांनी थंडीचा लाभ उठवावा. कारण डिसेंबरातील थंडीच्या मासिक अंदाजनुसार, शेवटच्या आठवड्यात कमाल व किमान अशी दोन्हीही तापमाने, सरासरीपेक्षा अधिक राहून, थंडी सरासरीपेक्षा कमी जाणवण्याची शक्यता आहे. 

अवकाळी पावसाच्या अंदाजामुळं शेतकऱ्यांच्या मनात भीती

अवकाळी पावसाच्या अंदाजामुळं शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. कारण, हा पाऊस फळ पिकांसाठी धोकादायक असतो. त्यामुळं द्राक्ष, डाळिंब केळी उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. मात्र, सध्या राज्यातील पावसाचं वातावरण निवळलं आहे. पुन्हा एकदा राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. मात्र, 21 डिसेंबरपासून राज्यात भाग बदलत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी नैसर्गिक संकटांचा मोठा फटका बसत असतो. या संकटामुळं अनेकवेळा हाती आलेली पिकं देखील वाया जाण्याची दाट शक्यता असते.  

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat Nashik Crime: अखेर पोलिसांनी रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस धाडलीच, चौकशीसाठी शिर्डीत जावं लागणार
अखेर पोलिसांनी रुपाली चाकणकरांच्या बहिणीला नोटीस धाडलीच, चौकशीसाठी शिर्डीत जावं लागणार
Maharashtra Live blog updates: रिश्ते ही मायने रखते है .. प्रचाराला बोलविल्यास जाणार सुप्रिया सुळेंनी दिले संकेत
Maharashtra Live blog updates: रिश्ते ही मायने रखते है .. प्रचाराला बोलविल्यास जाणार सुप्रिया सुळेंनी दिले संकेत
Beed Crime News : मोठी बातमी : मस्साजोगमध्ये चोरट्यांचं हैदोस, सरपंच संतोष देशमुखांचं घर फोडलं, 6-7 घरांवरही डल्ला
मोठी बातमी : मस्साजोगमध्ये चोरट्यांचं हैदोस, सरपंच संतोष देशमुखांचं घर फोडलं, 6-7 घरांवरही डल्ला
Nashik Crime News: सात महिला पोलीस, आठ दिवस 'त्या' कंपनीत नियोजनबद्ध काम, कुकर्माचे पुरावे गोळा केले अन्...; नाशिकमधील धर्मांतराच्या रॅकेटचा कसा झाला पर्दाफाश?
सात महिला पोलीस, आठ दिवस 'त्या' कंपनीत नियोजनबद्ध काम, कुकर्माचे पुरावे गोळा केले अन्...; नाशिकमधील धर्मांतराच्या रॅकेटचा कसा झाला पर्दाफाश?

व्हिडीओ

Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitish Kumar: तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
तब्बल 21 वर्षांनी नितीश कुमार पुन्हा त्याच ठिकाणी परतले आहेत जिथं होते! दिल्ली टू दिल्ली व्हाया पाटणा नेमका प्रवास कसा झाला?
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
राहत्या बंगल्यात नोटांची थप्पीच्या थप्पी सापडलेल्या न्यायमूर्ती यशवंत वर्मांचा अखेर राजीनामा; सुप्रीम कोर्टाच्या चौकशीत दोषी, संसदेत महाभियोग प्रस्ताव
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
Embed widget