एक्स्प्लोर

मान्सून तळकोकणात कधी दाखल होणार? हवामान खात्यानं दिली महत्त्वाची माहिती, सिंधुदुर्गात यलो अलर्ट

हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून कर्नाटकात पोहोचण्याचा अंदाज आहे. तर 7 ते 8 जुनपर्यंत मान्सून सिंधुदुर्गात (Sindhudurg) दाखल होण्याचा अंदाज आहे.

Maharashtra Weather News : सध्या पावसासाठी पोषक वातावरण (Weather) तयार होत आहे. केरळमध्ये (Keral) मान्सून (Monsoon) दाखल झाला आहे. दरम्यान, केरळमध्ये जरी मान्सून दाखल झाला असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) कधी मान्सूनचे आगमन होणार असा प्रश्न विचारला जात आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, येत्या 2 ते 3 दिवसात मान्सून कर्नाटकात पोहोचण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर 7 ते 8 जुनपर्यंत मान्सून राज्याच्या प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्गात (Sindhudurg) दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे.

सिंधुदुर्गमध्ये 2 ते 4 जून दरम्यान वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता 

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्गमध्ये 2 ते 4 जून दरम्यान वादळी वारे, गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळं प्रशासनाने जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला आहे. तसेच या काळात ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार आहेत. मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक स्थिती आहे. त्यामुळं येत्या 2 ते 3 दिवसात तो कर्नाटकात पोहोचण्याचा अंदाज आहे. तर 7 ते 8 जुनपर्यंत मान्सून राज्याच्या प्रवेशद्वार असलेल्या सिंधुदुर्गात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

राज्यात इतर ठिकाणी कसं असेल हवामान?

वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे जूनच्या सुरुवातीला मान्सूनपुर्व पाऊस राज्यात सक्रिय होईल. त्याप्रमाणे आज 2 जून दक्षिण पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सांगली धाराशिव लातूर नांदेड पाऊस वाढण्याची शक्यता आहे. तर 3/4/5 जूनला राज्यात मध्य महाराष्ट्र अहमदनगर नाशिक संभाजी नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बीड परभणी जालना जोरदार मेघ गर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. 6/7/8 जूनला अरबी समुद्रात देखील एक प्रणाली सक्रिय होईल. तसेच 17/18 जून च्या जवळपास देखिल प्रणाली तयार होणार आहे. 

उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता

उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर अहमदनगर काही भागात पुढील दोन तीन दिवस गडगडाटी पाऊस अधून मधून होईल. तसेच 3/4 जून पासून मान्सून पुर्व पाऊस सरू होईल. तर 6/7/8 जूननंतर देखिल पाऊस सक्रिय राहण्याचा अंदाज आहे. 

कोकणात काय स्थिती राहणार?

सिंधुदुर्ग रायगड रत्नागिरी  ठाणे मुंबई पालघर काही भागात तीन दिवस ढगाळ  वातावरण राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.   

मध्य महाराष्ट्रात तापमानत घट होणार, जोरदार पाऊस पडणार

मध्य महाराष्ट्रात आजपासून पुढील दोन दिवस पुणे अहमदनगर दक्षिण सातारा कोल्हापूर सोलापूर सांगली स्थानिक मान्सून पुर्व पाऊस होईल. दिवसाचे तापमानात घट होईल. तसेच 2/3 जूनपासून जोरदार वादळी पाऊस  होईल. 5/ 6 /7/8 जूननंतर देखील पाऊस राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.   

मराठवाडा वळिवाच्या पावसाची शक्यता

आज मराठवाड्यातील लातूर नांदेड हिंगोली  बीड धराशिव जालना बीड परभणी या  भागात स्थानिक मान्सून पुर्व वळिव पावसाची शक्यता आहे. 2 जून ते 8 जून अनेक भागात पाऊस सक्रिय होण्याची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या:

कोकणात आज आणि उद्या पावसाचा यलो अलर्ट, मुंबई, ठाण्यात उन्हाच्या झळा कायम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा:  7 AM :  15  नोव्हेंबर  2024 : ABP MajhaTop 100 : टॉप 100 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा : 6 AM :15 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  6:30 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mallikarjun Kharge : सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
सोयाबीनचा हमीभाव देऊन फरकासह 7 हजार रुपयांपर्यंत रक्कम देणार, मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडून घोषणा
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
Embed widget