एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

El Nino : चांगली बातमी! येत्या दोन महिन्यात एल निनोचा प्रभाव कमी होणार, आगामी मान्सून सर्वसाधारण राहण्याची शक्यता

Weather El Nino Impact : आगामी मान्सून हंगामात पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. प्रशांत महासागरातील एल निनोचा प्रभाव कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Monsoon Update News : आगामी मान्सून (Monsoon) हंगामासाठी सकारात्मक बाब आहे. आगामी मान्सून हंगामात पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात आली आहे. प्रशांत महासागरातील एल निनोचा (El Nino) प्रभाव येत्या दोन महिन्यात कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आगामी मान्सून हंगामाच्या आधी महासागराचे तापमान सर्वसाधारण पातळीवर येण्याचे संकेत अमेरिकी हवामान शास्त्र संस्था नोआने दिले आहेत. आगामी मान्सून हंगामासाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे. एल निनोची शक्यता नसल्याने पाऊस सर्वसाधारण राहील असा अंदाज आहे. 

आगामी मान्सून हंगामात पाऊस सर्वसाधारण राहण्याची शक्यता

गेल्या वर्षी एल निनोचा थेट प्रभाव मान्सून काळातील पर्जन्यमानावर झाला. 2023 मध्ये देशात सरासरीच्या 94 टक्के पावसाची नोंद झाली होती. तर, महाराष्ट्रातील सांगली, सातारा , सोलापूर, बीड, धाराशिव, हिंगोली, जालना, अकोला आणि अमरावती या नऊ जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस नोंदला गेला होता. सध्या जानेवारीमध्येच राज्यातील अनेक तालुक्यांत पाणीटंचाई जाणवू लागली आहे. एल निनो ओसरून ला निनाची स्थिती आल्यास राज्यात मान्सून दरम्यान सर्वसाधारण ते सरासरीहून अधिक पाऊस पडेल.

येत्या दोन महिन्यामध्ये एल निनोचा प्रभाव ओसरण्याचा अंदाज

दरम्यान, हवामान अभ्यासक मयुरेश प्रभुणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या दोन महिन्यामध्ये एल निनोचा प्रभाव ओसरण्याचा अंदाज आहे. एप्रिल ते जून महिन्यात प्रशांत महासागराचं तापमान न्यूट्रल होण्याची शक्यता 73 टक्के आहे. ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यत प्रशांत महासागराचं तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. त्या भागात ला निना निर्माण होण्याची शक्यता 50 ते 60 टक्के आहे. ला निना आल्यास मान्सून काळात सर्वसाधार ते सरासरीहून अधिक पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

एल निनो म्हणजे काय?

विषुववृत्तीय प्रशांत महासागराचं तापमान सरासरीपेक्षा जास्त नोंदवलं जात तेव्हा त्याला एल निनो असं म्हटलं जातं. प्रशांत महासागराचं सरासरी तापमानापेक्षा तापमान 0.5 अंश अधिक झाल्यास एल निनोची परिस्थिती निर्माण होते. तापमान 0.5 अंशापेक्षा अधिक झाल्यास जगभरातील वाऱ्यांवर त्याचा परिणाम होतो, ज्यामुळे हवामानातही बदल दिसून येतो. 

एल निनोचा वातावरणावर परिणाम

एल निनोमुळे मान्सून काळात बाष्प कमी होतं आणि त्यामुळे मान्सून कमी होतो. याचा परिणाम आधीही आपल्याला दिसून आला आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्रात अपुरा पाऊस झाला. पण, आता एल निनोची स्थिती जाऊन तापमान सर्वसाधारण होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे ही आगामी मान्सूनसाठी दिलासादायक बाब असून राज्यात सरासरी पाऊस राहण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

 

 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 26 November 2024 सकाळी १० च्या हेडलाईन्स-100 Headlines | 100 हेडलाईन्स बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर Superfast News ABPमाझाSanjay Raut Mumbai : रश्मी शुक्ला, अदानी ते महायुती सरकार;संजय राऊतांची रोखठोक प्रतिक्रिया #abpमाझाTop 90 At 9AM 26 November 2024 सकाळी ९ च्या महत्वाच्या बातम्या #abpमाझा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे कमालीचे सावध! ठाकरेंसोबत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय घडलं?
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
महाजन, गुलाबराव पाटलांसह 'हे' बडे नेते मंत्रि‍पदाच्या शर्यतीत, जळगावातून कोणाची वर्णी लागण्याची शक्यता
Dharashiv crime: आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
आईने गळफास घेतला, दोन छोट्या बाळांची प्रेतं पाण्याच्या बॅरेलमध्ये तरंगताना दिसली, धाराशीवमधील धक्कादायक घटना
Ajit Pawar: 'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
'रुक्मिणीला कुठं सोडलं...', अजितदादांचा सवाल, लाडक्या बहिणी म्हणाल्या, 'रुक्मिणीला आणलंय, वहिनींकडे द्यायचंय...', नेमकं काय घडलं?
Ind vs Aus 2nd Test : कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
कोच गौतम गंभीरने सोडली संघाची साथ; अचानक परतला भारतात, मोठं कारण आलं समोर
Maharashtra Wether Updates : राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
राज्याचा पारा घसरला; मुंबईत गुलाबी थंडीची चाहुल, पुणे गारठलं, तर नाशकात नीच्चांकी तापमानाची नोंद
PAN 2.0 Project : मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
मोठी बातमी! सरकारने आणलं QR कोडवालं पॅनकार्ड, जुनं पॅनकार्ड रद्दीत जाणार, पॅन 2.0 प्रोजेक्ट आहे तरी काय?
Nagraj Manjule : खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
खाशाबा जाधव यांच्यावरील चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना समन्स; नेमकं प्रकरण काय?
Embed widget