विधानसभेची खडाजंगी : नागपुरातील 12 विधानसभा मतदारसंघात कुणाचं वर्चस्व? 2019 च्या सर्व आमदारांची यादी, एका क्लिकवर
Maharashtra Vidhan Sabha Election : लोकसभा निवडणुकीत विदर्भात महायुतील काहीसा फटका बसल्याचे चित्र होतं. परिणामी, आगामी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारेल हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Maharashtra Assembly 2019 MLA List : नागपूर : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी संपली असून आता विधानसभा निवडणुकांचे (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) वारे सध्या वाहू लागले आहेत. अशातच आगामी विधानसभेची (Maharashtra Assembly Election 2024) अद्याप घोषणा झालेली नसली तरी, पुढील विधानसभेसाठी सर्व पक्षांनी आपली कंबर कसली असून राजकीयदृष्ट्या सर्वांगाने जुळवाजुळव सुरू केली आहे. अशातच यंदाची राज्यातील विधानसभेची निवडणूक चुरशीची होणार आहे. कारण गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politicle Updates) अनेक राजकीय भूकंप झाल्याचं पाहायला मिळालं आहे.
सर्वात आधी शिवसेनेतील (Shiv Sena) अंतर्गत बंडाळी, त्यानंतर सत्तेत असलेलं महाविकास आघाडी (Maha Vikas Aaghadi) सरकार कोसळणं, शिंदेंनी (Eknath Shinde) भाजपच्या (BJP) साथीनं महायुती (Mahayuti) सरकार स्थापन करुन स्वतः मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं, त्यानंतर अजित पवारांच्या बंडानंतरची राष्ट्रवादीतील फूट, तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर ठोकलेला दावा. यासर्व घडामोडी राज्याच्या राजकारणाला हादरे देणाऱ्या ठरल्या. त्यामुळे ज्या मतदार राजानं हे राजकीय हादरे झेलले, तो मतदार राजा यंदा राज्याचं सिंहासन कुणाच्या हवाली करणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
नागपुरातील 12 विधानसभा मतदारसंघात कुणाचं वर्चस्व?
अशातच लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेस (Congress) सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. 13 खासदारांसह काँग्रेस राज्यात आणि महाविकास आघाडीत (Maha Vikas Aghadi) सर्वात मोठा पक्ष ठरलाय. सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयामुळे काँग्रेसचे संख्याबळ 14 वर पोहोचणार आहे. महाविकास आघाडीत आणि राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत आहे. शिवाय, लोकसभेच्या या निकालामुळे विधानसभेला महाविकास आघाडीतील गणिते बदलणार असणार असल्याची चिन्हे आहेत.
विशेष म्हणजे, विदर्भात काँग्रेसने घरवापसी करत दहा पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीला यश मिळवून दिले आहे. तर भाजप 2 आणि शिंदेच्या शिवसेनेला अवघ्या 1 ठिकाणी यश आले आहे. त्यामुळे विदर्भात महाविकास आघाडीने चांगलीच मुसंडी मारली असून काँग्रेस विदर्भातही सर्वत मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने भाजप आणि महायुतीला अधिक कस लावावा लागणार असल्याचे उघड आहे. दुसरीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख या दोन्ही नागपुरातील नेत्यांमधील आरोप-प्रत्यारोपांमुळे नवा वाद रंगला आहे. त्यामुळे विदर्भात आणि विशेषत: नागपूर मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. असे असले तरी त्याआधी नागपूर जिल्ह्यातील 12 मतदारसंघात सध्या आमदार कोण? हे जाणून घ्या सविस्तर...
नागपूर जिल्ह्यातील आमदार : 12 (Nagpur MLA List)
-
काटोल विधानसभा - अनिल देशमुख (राष्ट्रवादी- शरद पवार)
-
सावनेर विधानसभा - सुनील केदार (काँग्रेस)
-
हिंगणा विधानसभा - समीर मेघे (भाजप)
-
उमरेड विधानसभा - राजू पारवे (काँग्रेस) - सध्या शिवसेना एकनाथ शिंदे
-
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा- देवेंद्र फडणवीस (भाजप)
-
नागपूर दक्षिण विधानसभा - मोहन मते (भाजप)
-
नागपूर पूर्व विधानसभा - कृष्णा खोपडे (भाजप)
-
नागपूर मध्य विधानसभा - विकास कुंभारे (भाजप)
-
नागपूर पश्चिम विधानसभा - विकास ठाकरे (काँग्रेस)
-
नागपूर उत्तर विधानसभा - नितीन राऊत (काँग्रेस)
-
कामठी विधानसभा - टेकचंद सावरकर (भाजप)
-
रामटेक विधानसभा - आशिष जयस्वाल (अपक्ष)
2019 मधील विधानसभानिहाय लढती आणि मताधिक्य
काटोल विधानसभा : काटोल विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजीगृह मंत्री अनिल देशमुख यांनी तब्बल 94 हजार मते घेत विजयावर नाव कोरले. त्यांनी भाजपचे चरणसिंग ठाकूर यांना पराभूत करून आपला विधानसभा मतदारसंघ पुन्हा काबीज केला होता. सलग चारवेळा काटोल सर करणारे माजी गृहमंत्री तसेच राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भाजपने त्यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच काटोलचे माजी नगराध्यक्ष चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली होती.
सावनेर विधानसभा : सावनेर विधानसभा मतदारसंघातून 2019 च्या निवडणुकीत काँग्रेसचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांनी दणदणीत विजय मिळवला होता. सावनेर मतदारसंघात सुनील केदार विरुद्ध भाजपने डॉ. राजीव पोतदार यांना उमेदवारी देऊन ही लढत अधिक प्रतिष्ठेची केली होती. मात्र यात केदार यांनी 20 हजार 227 अधिक मतांनी विजय मिळवला होता. तर भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार यांना या पराभवाला समोर जावे लागले होते.
हिंगणा विधानसभा : हिंगणा विधानसभा मतदारसंघात सलग तीन टर्म भाजपाचे वर्चस्व आहे. 2019 साली सलग दुसऱ्यांदा समीर मेघे यांना उमेदवारी देण्यात आली होती. यात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पांडुरंग विजयबाबू घोडमारे यांचा 46 हजार 167 मतांनी पराभव करून विजय मिळवला होता. हिंगणा विधानसभा क्षेत्रावर एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) ज्येष्ठ नेते माजी मंत्री रमेशचंद्र बंग यांचे वर्चस्व होते. मात्र भाजपने (BJP)सन 2009 मध्ये प्रथमच तत्कालीन आमदार विजय घोडमारे यांच्या रूपाने पहिल्यांदा मतदार संघात भाजपने प्रवेश केला. यानंतर आमदार समीर मेघे (MLA Sameer Meghe) आपल्या विकासकामांच्या जोरावर आपला विजयी रथ कायम गतिमान ठेवलाय.
उमरेड विधानसभा : नुकत्याच पार पडलेली रामटेक लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राजू पारवे यांचा पराभव झाल्याने भाजपची नामुष्की झालीय. कधीकाळी काँग्रेसमध्ये असलेले आणि 2019 मध्ये काँग्रेसकडून उमरेड विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले राजू पारवे यांचा मात्र 2024 चा लोकसभेत पराभव झाला आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत उमरेड विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर पारवे यांच्या विरोधात काँग्रेसचे राजू पारवे विजयी झाले होते. काँग्रेसचे राजू पारवे यांनी भाजपचे सुधीर पारवे यांचा 18 हजार 26 मतांनी पराभव केला होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिंदे गटात प्रवेश करत लोकसभा निवडणुक लढवली. त्यात मात्र त्यांना पराभव स्वीकारावा लागला.
नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा : नागपूर विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने सर्वत महत्वपूर्ण आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा मतदारसंघ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 2019 साली सलग पाचव्यांदा विजय मिळवला आहे. असे असले तरी 2019साली फडणवीस यांनी नागपूर दक्षिण पश्चिममधून मिळवलेला विजय तितकासा समाधानकारक राहिला नाही. मुख्यमंत्रीपदावर असल्यामुळे फडणवीस यांना एका लाखापेक्षा जास्त मताधिक्क्याने विजय मिळवू असा विश्वास होता. पण काँग्रेस उमेदवार आशिष देशमुख यांच्याविरोधात फडणवीसांनी अवघे 49, 482 मतांनी विजय मिळवला होता. तर लगतच्या उत्तर नागपूरमधून काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत आणि नागपूर पश्चिममधून विकास ठाकरे यांनी विजय मिळवला होता.
नागपूर लोकसभेत विधानसभा निहाय आघाडी
नागपूर लोकसभा क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी पाच विधानसभा क्षेत्रात भाजपला तर एक विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला आघाडी मिळाली आहे. मात्र 2019 च्या तुलनेत सर्वच विधानसभा क्षेत्रात भाजपची आघाडी कमी झाल्याचे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात भाजपला 2019 मध्ये 65069 मतांची आघाडी होती. मात्र यंदा फडणवीस यांच्या क्षेत्रात भाजपची आघाडी 33,535 एवढी आहे. म्हणजेच फडणवीस यांच्या मतदारसंघात भाजपची आघाडी जवळपास 36 हजारांनी कमी झाली आहे.
भाजप आमदार मोहन मते यांच्या मतदारसंघात 2019 मध्ये 43524 मतांची आघाडी होती. मात्र ती यंदा घसरून 29712 पर्यंत खाली आली आहे.
भाजप आमदार कृष्णा खोपडे यांच्या मतदारसंघात 2019 मध्ये नितीन गडकरी यांना 75380 मतांची आघाडी होती मात्र यंदा ती काहीशी कमी होऊन 73371 एवढी राहिली आहे.
भाजप आमदार विकास कुंभारे यांच्या मतदारसंघात 2019 मध्ये भाजपला 22494 मतांची आघाडी होती मात्र यंदा ती 25861 पर्यंत वाढली आहे.
काँग्रेस आमदार नितीन राऊत यांच्या उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रात गेल्या वेळेला काँग्रेसला 8910 मतांची आघाडी होती. मात्र यंदा नितीन राऊत यांच्या क्षेत्रात काँग्रेसची आघाडी तिप्पट वाढून ती 32215 झाली आहे.
काँग्रेस आमदार आणि नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे यांच्या स्वतःच्या पश्चिम नागपूर विधानसभा क्षेत्रात ही ते आघाडी घेऊ शकले नाही. 2019 मध्ये या मतदारसंघातून भाजपला 19 हजार मतांची आघाडी होती. यंदा गडकरी यांनी विकास ठाकरे यांच्याच मतदारसंघात 6584 मतांची आघाडी घेतली आहे.
(Maharashtra Vidhansabha MLA List 2019)
महायुती : 162 (भाजप (105), शिवसेना (56), रासप (01), रिपाइं, रयत क्रांती संघटना, शिवसंग्राम)
महाआघाडी : 105 (राष्ट्रवादी (54), काँग्रेस (44), बहुजन विकास आघाडी (03), शेकाप (01), स्वाभिमानी (01), समाजवादी पक्ष (02)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Maharashtra MLA List : महाराष्ट्रातील सर्व आमदारांची नावे, 288 विधानसभा, जिल्हानिहाय आमदारांची यादी