विधानसभेत आमदार सुनील शेळके अक्षरक्ष: रडले! लक्षवेधी लावत नसल्यामुळे नाराजी
Sunil Shelke News Update : पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयावर शेळके यांनी लक्षवेधी लावली होती. मात्र ती लागत नसल्यानं ते नाराज झाले.
Sunil Shelke News Update : लोकप्रतिनिधी इमोशनल झाल्याची काही उदाहरणं आपण पाहत असतो. अनेकदा जाहीर मंचावरुन काही नेतेमंडळी रडल्याचं देखील आपण पाहिलं आहे. मात्र आता एका आमदाराला विधिमंडळात अक्षरक्ष: रडायची वेळ आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर ही वेळ आली आहे. लक्षवेधी कालपासून लावत नसल्यामुळे सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयावर शेळके यांनी लक्षवेधी लावली होती. मात्र ती लागत नसल्यानं ते नाराज झाले.
अन्यथा लढा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही
आमदार सुनील शेळके म्हणाले की, जर पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा यांनी विषय घेतला नाही. तर 2011 साली जे प्रकरण झालं होतं. याची पुन्हा पुनरावृत्ती होईल. कारण त्यावेळी जे आंदोलन झालं होतं ते याच विषयासाठी झालं होतं. त्यांनी सांगितलं की, अजित पवार यांची भेट घेतली त्यांनी मीटिंग लावण्याचं आश्वासनं दिलं आहे. विधानसभेत देखील मला मीटिंग लावण्याचं आश्वासन मिळालं आहे. त्यांना हा विषय मार्गी लावावाच लागेल, अन्यथा लढा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेळके यांनी दिला.
आमदारांना घरं देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह
आमदार सुनील शेळके म्हणाले की, आमदारांना घरं देण्याचा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. कारण अनेक आमदार असे आहेत जे लोकवर्गणीतून आमदार आहेत. त्यांची परिस्थीत हालाखीची आहे. त्यांना घर मिळणे गरजेचं आहे. आमच्या सारख्या शहराच्या जवळ राहणाऱ्या सदन आमदारांनी मनाचा मोठपणा दाखवावा असंही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या: