एक्स्प्लोर

विधानपरिषद निकाल: शिक्षक आणि पदवीधर निवडणूक संपूर्ण निकाल

कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी बाजी मारली. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी विजयी हॅटट्रिक केली. तिकडे नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडेंनी मोठा विजय मिळवला.

मुंबई:  विधानपरिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या मतदानाचा निकाल अखेर जाहीर झाला. कोकण पदवीधर, मुंबई पदवीधर, तर मुंबई शिक्षक आणि नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या जागांचा निकाल जाहीर झाला. कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपच्या निरंजन डावखरे यांनी विजय मिळवला. मुंबई पदवीधरमध्ये शिवसेनेच्या विलास पोतनीस यांनी बाजी मारली. तर मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी विजयी हॅटट्रिक केली. तिकडे नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडेंनी मोठा विजय मिळवला. या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांनी आपली ताकद लावली होती. त्यामुळे या निकालात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. शिवसेना आणि भाजप यांच्यात मुख्य लढत होती. चारपैकी दोन जागा शिवसेनेने, एक भाजप आणि एक लोकभारती पक्षाने जिंकली. मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल: कपिल पाटील यांची हॅटट्रिक मुंबई शिक्षक मतदारसंघात लोकभारतीचे कपिल पाटील यांनी भाजपचा दारुण पराभव करत, विजयाची हॅटट्रिक केली. भाजप पुरस्कृत उमेदवार अनिल देशमुख या मतदारसंघात थेट तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यामुळे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासाठी हा धक्का आहे. लोकभारतीचे कपिल पाटील यांना 4050, शिवसेनेचे शिवाजी शेंडगे यांना 1736, तर भाजप पुरस्कृत अनिल देशमुख यांना 1124 मतं मिळाली. मुंबई शिक्षक मतदारसंघ हा गड लोकभारतीचे कपिल पाटील यांनी राखून ठेवला आहे. यावर्षी निवडणुकीत शिवसेना आणि भाजपने ताकद लावली. शिवसेनेने या निवडणुकीसाठी पाकिटं वाटल्याचा तसेच बंगल्यावर बोलवून शाळा संस्थाचालकांची बैठक घेतल्याचा आरोप केला कपिल पाटील यांनी केला होता. मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक निकाल मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेने आपला गड कायम राखला. शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस यांनी भाजपचे अमितकुमार मेहता यांचा तब्बल 11 हजार 611 मतांनी पराभव करत दणदणीत विजय मिळवला. विलास पोतनीस यांनी 19 हजार 354 मतं मिळवली. तर भाजपचे अमितकुमार मेहता यांना 7792 मतं मिळाली. एकूण कोटा 16 हजार 900 चा होता. म्हणजेच शिवसेनेने भाजपचा 11 हजार 611 च्या मताधिक्क्याने पराभव केला. शिवसेनेने यावेळी या मतदारसंघातून कॅबिनेटमंत्री दीपक सावंत यांचा पत्ता कट करत विलास पोतनीस यांना उमेदवारी दिली होती. कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणूक निकाल अत्यंत चुरशीच्या आणि राज्याचं लक्ष लागलेल्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपने बाजी मारली. कोकण पदवीधर मतदारसंघात निरंजन डावखरे यांनी 8127 मतांनी विजय मिळवला. शिवसेनेचे उमेदवार संजय मोरे दुसऱ्या क्रमांकावर राहिले. निरंजन डावखरे यांना 32 हजार 831 तर संजय मोरे यांना 24 हजार 704 मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नजीब मुल्ला तिसऱ्या क्रमांकावर राहिले. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणूक निकाल नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेन भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना धोबीपछाड देत भगवा फडकावला, शिवसेनेचे किशोर दराडे दहा हजारांपेक्षा जास्त मतांनी विजयी झाले. किशोर दराडे यांना 24  हजार 369 मतं मिळाली. तर दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत टीडीएफचे उमेदवार संदीप बेडसे यांना 13 हजार 830 मतांवर समाधान मानावं लागलं. तर भाजपचे अनिकेत पाटील तिसऱ्या स्थानावर फेकले गेले. एक महिन्यापूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत किशोर दराडे यांचे मोठे बंधू नरेंद्र दराडे विजयी झाले. आज एक महिन्याच्या अंतराने एकाच घरात दोन आमदार झाले असून दोघेही वरीष्ठ सभागृहात दिसणार आहेत. निकाल 
मुंबई पदवीधर –विजयी उमेदवार – विलास पोतनीस (मिळालेली मते 19354)*
*मुंबई शिक्षक –विजयी उमेदवार – कपिल पाटील (मिळालेली मते 4050)*
*कोकण पदवीधर –विजयी उमेदवार – निरंजन डावखरे (मिळालेली मते 32831)
कशी झाली निवडणूक प्रक्रिया? मुंबई शिक्षक मतदारसंघात 8353 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 82.13 आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघात 37237 मतदारांनी मतदान केले होते. त्याची टक्केवारी 52.81 तर कोकण पदवीधर मतदारसंघात एकूण 75439 मतदारांनी मतदान केले होते  त्याची टक्केवारी 72.35 आहे. या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनद्वारे मतदान नव्हते तर एकल संक्रमणीय पद्धतीचे मतदान होते. म्हणजे मतदारास मतपत्रिकेवरील उमेदवारांना पेनाने पसंतीक्रम द्यावयाचे होते. यामध्ये उमेदवारासाठी विजयी होण्यासाठी एका विशिष्ट सूत्रानुसार कोटा निश्चित केला जातो. तो मिळाल्यास उमेदवार विजयी घोषित केला जातो, अन्यथा हा कोटा पूर्ण होईपर्यंत फेऱ्या घेण्यात येतात. यामध्ये सर्वात कमी मते मिळालेल्या उमेदवारांची मते प्रमुख उमेदवारांमध्ये पसंतीक्रमानुसार ट्रान्स्फर केली जातात. याला बाद फेरी म्हणतात. ज्याची मते ट्रान्स्फर होतात ते उमेदवार आपोआपच बाद ठरविले जातात. मुंबई शिक्षकसाठी ३९५१ मतांचा कोटा ठरविण्यात आला होता. याठिकाणी ७९०० वैध मतदान होते. यात कपिल पाटील यांना ४०५० मते बाद फेऱ्यांत मिळाली. कोकण पदवीधरसाठी ३५ हजार १४३ चा कोटा होता. याठिकाणी ७० हजार २८५ मतदान झाले होते. निरंजन डावखरे यांना २९ हजार ३५ मते तर नजीब मुल्ला यांना १४ हजार ६२५ आणि संजय मोरे यांना २३ हजार २५८ मते होती. याठिकाणी रिंगणात १४ उमेदवार होते. विजयासाठी आवश्यक कोटा कुणीच पूर्ण न केल्याने कमी मते मिळालेल्या ११ उमेदवारांची मते ट्रान्स्फर करण्यात आली त्यामुळे डावखरे २९ हजार २०१४, मुल्ला १४ हजार ८२१ आणि मोरे २४ हजार ७०४ अशी मतसंख्या वाढली. तरी देखील प्रथम उमेदवारांनी विजयाचा कोटा पूर्ण न केल्याने तिसऱ्या क्रमांकावरील नजीब मुल्ला यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली. यामध्ये १२६९ मते संजय मोरे यांना आणि ९८७ मते निरंजन डावखरे यांना मिळाली. यामुळे डावखरे यांची ३० हजार १९१ तर संजय मोरे यांची २४ हजार ७०४ मतसंख्या झाली. यावरही कोटा पूर्ण न झाल्याने पहाटे ४.१५ वाजता दुसऱ्या क्रमांकावरील संजय मोरे यांची मते ट्रान्स्फर करण्यात आली यामुळे डावखरे यांच्या मतांचे मूल्य ३२ हजार ८३१ इतके झाले. आवश्यक तो ३५ हजार १४३ मतांचा कोटा ते पूर्ण करू शकले नसले तरी रिंगणातील उरलेले एकमेव उमेदवार म्हणून त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी डॉ जगदीश पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या अनुमतीने विजयी घोषित केले. संबंधित बातम्या विधानपरिषद निकाल: शिक्षक आणि पदवीधर निवडणूक संपूर्ण निकाल   कोकण पदवीधर: 23 तासांनी निकाल, निरंजन डावखरेंचा विजय!   मुंबई पदवीधरमध्ये शिवसेना, तर शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील विजयी   दोन पैलवान सख्खे भाऊ एकाच महिन्यात विधानपरिषदेवर! 

LIVE UPDATE

07.15AM : भाजपाचे निरंजन डावखरे विजयी 11.55 PM : कोकण पदवीधर दुसऱ्या पसंतीच्या मतांची आता मोजणी होणार, मतदारांनी चुकीच्या पद्धतीने मतदान केल्याने तबाबल 2500 मतं अवैध ठरवली 11.39 : मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील यांचा, तर मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेनेच्या विलास पोतनीस यांचा विजय 11.13 PM : नाशिक : नववी बाद फेरी आतापर्यंतची मतं - किशोर दराडे - 17 हजार 111 संदीप बेडसे - 11 हजार 65 अनिकेत पाटील - 6 हजार 438 11.13 PM : यश अपेक्षित होतं आणि ते मिळालं, सगळ्यांचे आशीर्वाद आहेत, प्रत्येक दिवशी डावखरे साहेबांची आठवण येते, निरंजन डावखरे यांची प्रतिक्रिया 11.13 PM : पहिल्या फेरीत निरंजन डावखरे आघाडीवर आहेत, विजय निश्चित आहे. गड राखला, रवींद्र चव्हाण यांची प्रतिक्रिया 11.13 PM : मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस विजयी 11.05 PM : सहव्यांदा शिवसेना उमेदवार जिंकून आले, आता विधानपरिषदेत शिवसेनेचे एक डझन वाघ झाले, विलास पोतनीस यांच्या विजयी आघाडीनंतर अनिल परब यांची प्रतिक्रिया 10.55 PM : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. डावखरे तिसऱ्या फेरीनंतर 5 हजार 734 मतांनी आघाडीवर आहेत. मात्र कोटासाठी अपेक्षित असलेली मते अद्याप मिळाली नसल्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी होणार आहे. 10.40 PM : नाशिक : आठवी बाद फेरी अखेर किशोर दराडे - 16 हजार 971 संदीप बेडसे - 11 हजार 8 मते अनिकेत पाटील - 6 हजार 355 10.40 PM : नवी मुंबईतील नेरुळच्या मतमोजणी केंद्राबाहेर तणाव वाढला, शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते भिडले, पोलीस बंदोबस्त वाढवला 10.25 PM : नाशिक : सहाव्या बाद फेरी अखेर किशोर दराडे 16 हजार 932 संदीप बेडसे 10 हजार 993 अनिकेत पाटील 6 हजार 349 एकूण वैध 47 हजार 978 मतं 10.22 PM : कोकण पदवीधर : तिसरी फेरी पूर्ण, निरंजन डावखरे 28 हजार 945, तर संजय मोरे यांना 23 हजार 211 मतं, निरंजन डावखरे यांची 5 हजार 734 मतांची आघाडी 09.26 PM : मुंबई शिक्षक मतदारसंघ निवडणूक : भाजप पुरस्कृत उमेदवार अनिल देशमुख यांचा दारुण पराभव, थेट तिसऱ्या क्रमांकाची मतं, विनोद तावडे विरुद्ध कपिल पाटील युद्धात कपिल पाटील यांचा दणदणीत विजय मतं : कपिल पाटील 4050 शिवाजी शेंडगे 1736 अनिल देशमुख 1124 7.45 PM : कोकण पदवीधर निवडणूक : दुसरी फेरी पूर्ण, निरंजन डावखरे यांना 11,180, तर शिवसेनेचे संजय मोरे यांना 8997 मतं, निरंजन डावखरेंकडे एकूण 2992 मतांची आघाडी 7.30 PM : नाशिक शिक्षक मतदारसंघ : पहिल्या फेरीअखेर शिवसेनेचे किशोर दराडे 16 हजार 886 मतांनी आघाडीवर, दुसऱ्या पसंतीची मतमोजणी सुरु, राष्ट्रवादी पुरस्कृत टीडीएफचे संदीप बेडसे यांना 10 हजार 970, तर टीडीएफच्या दुसऱ्या गटाचे भाऊसाहेब कचरे यांना 5 हजार 167 मतं, भाजपचे अनिकेत पाटील यांना 6 हजार 329 मते, दुसऱ्या फेरीत 23 हजार 900 मतांचा कोटा निश्चित 6.30 PM : मुंबई पदवीधर निवडणूक : मतांची पहिली फेरी पूर्ण, शिवसेनेचे विलास पोतनीस 19,403 मते, भाजपाचे अमितकुमार मेहता 7792 मते, एकूण मते 16,900, शिवसेनेकडून भाजपाचा 11,611 च्या मत्याधिक्क्याने पराभव, औपचारिक घोषणा बाकी 05.10 PM : कोकण पदवीधर निवडणूक : पहिल्या फेरीतील 28 हजार मतांची मोजणी पूर्ण, निरंजन डावखरेंना 10 हजार 304, तर शिवसेनेच्या संजय मोरे यांना 9 हजार 494 मतं. 4.32 PM: कोकण पदवीधर निवडणूक:  25 हजार मतांची मोजणी पूर्ण, पहिल्या फेरीत भाजपच्या निरंजन डावखरेंना 9284 तर शिवसेनेच्या  संजय मोरेंना 8523 मतं,  अजून 52 हजार मतांची मोजणी बाकी 4. 15 PM  कोकण पदवीधर निवडणूक: निरंजन डावखरे पहिल्या फेरीत आघाडीवर 4.00 PM - विधानपरिषदच्या मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील सलग तिसऱ्यांदा विजयी झाले आहेत. यावेळी मतदान झालेल्या 8000 पेक्षा जास्त मतांपैकी 4 हजार पेक्षा जास्त मते कपिल पाटील यांना मिळाली आहेत. मात्र अजून विजयाची औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. 4.00 PM-  मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी विजयी आघाडी घेतली आहे. पहिल्या फेरीत 20 हजार मतांपैकी 11 हजार मतं विलास पोतनीस यांना मिळाली आहेत.  यामुळे शिवसेनेनं पुन्हा एकदा मुंबई पदवीधरचा गड राखल्याचं जवळपास स्पष्ट झालंय 4.00 PM - कोकण पदवीधरच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून शिवसेनेचे संजय मोरे यांनी 2000 पेक्षा जास्त मतांची आघाडी घेतली आहे. तर भाजपचे निरंजन डावखरे दुसऱ्या स्थानावर असून राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नजीब मुल्ला तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र या तिन्ही उमेदवारांमध्ये मतांचे अंतर खूप कमी असल्याने काटे की टक्कर होणार असल्याचं दिसून येत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघाची पहिली फेरी अजून पूर्ण झालेली नाही. मुंबई पदवीधर अपडेट :- शिवसेनेचे उमेदवार विलास पोतनीस पहिल्या फेरीनंतर 4500 मतांनी आघाडीवर मुंबई शिक्षक मतदार संघात लोकभारतीचे कपिल पाटील पहिल्या फेरीत  4500मतांनी आघाडीवर नाशिक विधानपरिषद निवडणूक मतमोजणीदरम्यान गोंधळ, एका मतपेटीत दोन मतपत्रिका जास्त आढळल्या, मतपेटीतून मतपत्रिका बाहेर काढताना लक्षात आला प्रकार, 462 ऐवजी 464 मतपत्रिका आढळल्याने गोंधळ मतदानाची टक्केवारी : मुंबई पदवीधर- 53.23 %, मुंबई शिक्षक- 83.26 %, कोकण पदवीधर-73.89 %, नाशिक शिक्षक- 92.30 % कोकण पदवीधर मतदारसंघात चुरस विधान परिषदेच्या चार जागांवर निवडणूक होत असताना सगळ्यात चुरशीची असलेली निवडणूक म्हणजे कोकण पदवीधर मतदारसंघांची निवडणूक. राष्ट्रवादी काँग्रेसचे निरंजन डावखरे यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळे गद्दाराला धडा शिकवा या भावनेने राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात उतरली आहे. स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी मुंबईत सभा घेतली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निरंजन डावखरे यांना पक्षात आणल्याने भाजपसाठी निवडणूक प्रतिष्ठेची आहे. शिवसेनाही या निवडणुकीत तयारीनिशी उतरली आहे. कोकण पदवीधरसाठी पक्ष आणि उमेदवार भाजप : निरंजन डावखरे राष्ट्रवादी काँग्रेस : नजीब मुल्ला शिवसेना : संजय मोरे मुंबई पदवीधर मतदारसंघ निवडणूक कोकणसोबतच मुंबई पदवीधर, मुंबई शिक्षक मतदारसंघाचा निकाल आज जाहीर होत आहे. यावर्षी शिवसेना, भाजप आणि इतर पक्षाने ताकद पणाला लावल्यामुळे या निवडणुकाही चुरशीच्या झाल्या आहेत. मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील इतर सर्वच मंत्र्यांनी या निवडणुकीसाठी मेहनत घेतली आहे. मुंबई पदवीधर मतदार संघ - पक्ष आणि उमेदवार भाजप : अॅड. अमितकुमार मेहता शिवसेना : विलास पोतनीस काँग्रेस आघाडी आणि शेकापचे राजेंद्र कोरडे लोकभारती : जालिंदर सरोदे अपक्ष ( मनसे, स्वाभिमानी पुरस्कृत) : राजू बंडगर अपक्ष : डॉ. दीपक पवार मुंबई शिक्षक मतदारसंघ मुंबई शिक्षक मतदारसंघ हा गड लोकभारतीचे कपिल पाटील यांनी राखून ठेवला आहे. यावर्षी निवडणुकीत शिवसेना आणि भाजप ताकद लावत आहेत. शिवसेनेने या निवडणुकीसाठी पाकिटं वाटल्याचा तसेच बंगल्यावर बोलवून शाळा संस्थाचालकांची बैठक घेतल्याचा आरोप केला कपिल पाटील यांनी केला होता. मुंबई शिक्षक मतदारसंघ : पक्ष आणि उमेदवार शिवसेना : शिवाजी शेंडगे लोकभारती : कपिल पाटील अपक्ष (भाजप पुरस्कृत) : अनिल देशमुख नाशिक शिक्षक मतदारसंघ उमेदवार संदीप बेडसे - महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (काँग्रेस-राष्ट्रवादीचा पाठिंबा) शिवसेना –  किशोर दराडे( विधानपरिषदेत नुकतेच विजयी झालेल्या नरेंद्र दराडेंचे बंधू) भाजप – अनिकेत पाटील, ( माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील यांचे चिरंजीव) संबंधित बातम्या   पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या चार जागांसाठी उद्या निवडणूक    शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, नाशकात पैठणी वाटल्याचा आरोप   विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक जाहीर 
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Ghatkopar Hoarding Video : मर गया...मर गया, घाटकोपरमधील होर्डिंग कोसळतानाचा LIVE व्हिडीओABP Majha Headlines : 05 PM : 13 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सGhatkopar Hoarding Video : मुंबईत महाकाय होर्डिंग कोसळलं, 80 गाड्या दबल्याची माहितीGhatkopar Hoarding Video : घाटकोपरमध्ये कोसळलेलं होर्डिंग अनधिकृत? Kirit Somaiya यांचा आरोप काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
ढगाळ हवामानाचा अमित शाह-एकनाथ शिंदेंना फटका, हेलिकॉप्टर रद्द करून बाय रोड मुंबईकडे रवाना
Maharashtra Lok Sabha Election Voting 2024: चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
चौथ्या टप्प्यासाठी 5 वाजेपर्यंतची मतदानाची आकडेवारी समोर; शिरुरमध्ये 43.89 टक्के, तर औरंगाबादमध्ये 54.02 टक्के मतदान
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Photos: वडाळ्यात टॉवर कोसळला, चारचाकी गाड्या अडकल्या; वीज टॉवरवरही उडाला भडका
Gaurav More : रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
रानू मंडल, फिल्टरपाड्याचा गुंड,स्वत:ला महान समजायला लागलाय; हिंदी रिऍलिटी शोमुळे गौरव मोरे ट्रोल,अभिनेत्यानेही दिलं जशास तसं उत्तर 
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
सावधान! 'या' जिल्ह्यात कोसळणार सर्वात जास्त पाऊस, पंजाबराव डखांचा अंदाज काय?
Sunny Leone Net Worth : ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
ना आयटम साँग, ना कोणता चित्रपट; तरीही 'या' अभिनेत्रीकडे आहे 115 कोटींची संपत्ती
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
मुंबईत सोसाट्याचा वारा, रस्ते, रेल्वे, मेट्रो, विमान, सगळी वाहतूक कोलमडली, मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरवर खांब कोसळला!
Congress on PM Modi : अडवाणी, मुरली मनोहर जोशीप्रमाणे मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसच्या बड्या नेत्याचा सवाल
अडवाणी, जोशींप्रमाणे पीएम मोदींनाही 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
Embed widget