ट्विटर वॉर : नारायण राणे विरुद्ध मिलिंद नार्वेकर
नारायण राणेंनी (Narayan Rane) शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांच्यावरही खोचक शब्दात टीका केली. त्यानंतर नार्वेकर यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे.
![ट्विटर वॉर : नारायण राणे विरुद्ध मिलिंद नार्वेकर Maharashtra twitter war between bjp narayan rane and shivsena milind narvekar ट्विटर वॉर : नारायण राणे विरुद्ध मिलिंद नार्वेकर](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/02/16/2ca104b7d3f3ab1162c7c7b90fbb01fa_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : राज्यातील दोन नेते सध्या ट्विटरवर एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यात ट्विटरवर चांगलेच शाब्दिक 'वॉर' रंगले आहे. या वादाची ठिणगी पडली ती नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदे शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांवर टीकास्त्र सोडलंय. त्यानंतर नार्वेकर आणि राणे यांच्यात ट्विटरवॉर पाहायला मिळत आहे.
बुधवारी नारायण राणेंनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पूर्वी नार्वेकर हे मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे असे म्हणाले. बेल मारली की येस सर… काय आणू? असं म्हणणारे आता नेते बनले, अशा शब्दात राणेंनी मिलिंद नार्वेकरांची खिल्ली उडवली. यावर मिलिंद नार्वेकरांनी ट्वीट करत नारायण राणेंच्या मेमरीची घंटी वाजवली आहे. मिलिंद नार्वेकर आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात का ? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?
बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करून विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?@MeNarayanRane
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) February 16, 2022
या ट्वीटवर नारायण राणेंनी देखील मिलींद नार्वेकरांना ट्विट करत प्रत्युत्तर दिले आहे. नारायण राणेंनी सुशांतसिंगच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्र्यांनी दोन वेळा फोन करत गोष्टी लक्षात असल्याची आठवण करून दिली आहे. नारायण राणे आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अशा किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका.
सुशांतसिंगच्या हत्येनंतर आपल्या फोनवरून राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दोनवेळा कॉल केला होता हे आपण विसरलात की काय ? अश्या किती घटना मी आपणांस सांगू ? मला बोलायला लावू नका.@NarvekarMilind_
— Narayan Rane (@MeNarayanRane) February 16, 2022
आता यावर नार्वेकर काय उत्तर देणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या :
Sanjay Raut : शिवसेना 2024 पर्यंत दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचलेली असेल : संजय राऊत
शिवसेनेकडून राणेंवर 'लाव रे तो व्हिडीओ'चा प्रहार; ईडीच्या चौकशीला घाबरून राणे भाजपमध्ये गेल्याचा आरोप
Narayan Rane : संजय राऊत यांची नजर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खुर्चीवर, नारायण राणेंचा संजय राऊतांवर हल्लाबोल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)