Temperature Update | येत्या दोन दिवसांत विदर्भ, मराठवाड्यात उकाडा वाढणार; मुंबईतही सूर्यनारायणाचा प्रकोप
मार्च महिन्याच्या मध्यापासूनच राज्यात सर्वत्र उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आणि महिना अखेरीपर्यंत पारा सातत्यानं वरच जात असल्याचं पाहायला मिळत आहे.

Temprature Update मार्च महिन्याच्या मध्यापासूनच राज्यात सर्वत्र उकाडा जाणवण्यास सुरुवात झाली आणि महिना अखेरीपर्यंत पारा सातत्यानं वरच जात असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या आठवडाभरापासून तापमानात होणारी वाढ पाहता हवामान खात्याकडूनही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. शनिवारी मुंबईत झालेल्या तापमानवाढीनंतर रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातही असंच चित्र पाहायला मिळालं.
मुख्य म्हणजे येते दोन दिवस उकाडा आणखी वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. या भागांमध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कोकणासह मुंबईतही सूर्यनारायणाचा प्रकोप दिसून येणार आहे.
Lockdown | तुमचे लॉकडाऊन, आमचे मात्र मरण; हातावर पोट असणाऱ्यांची व्यथा - पंकज क्षीरसागर
शनिवारी मुंबईत पारा 40 अंशांवर
हवामान खात्याच्या वतीनं ट्विट करत के.एस. होसाळीकर यांनी याबाबतची माहिती दिली होती. मुंबईचा पारा शनिवारी दुपारच्या सुमारास 40 अंशांवर पोहोचला होता. मार्च महिन्यातील सर्वाधिक म्हणजेच 41.7 अंश सेल्शिअस तापमानाची नोंद 1956 च्या सुमारास करण्यात आली होती. ज्यानंतर अनेक वर्षांनी पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा अधिक प्रमाणात जाणवू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सध्या राजस्थानकडून महाराष्ट्राच्या दिशेनं जे कोरडे वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात उष्णतेची लाट आल्याची माहिती हवामान खात्याचे उपमहासंचालक जयंता सरकार यांनी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
