एक्स्प्लोर
Advertisement
(Source: Poll of Polls)
SSC Result 2020 : पेपरला जाण्याआधी गॅरेजमध्ये काम; परिस्थितीवर मात करत स्वप्नालीचं दहावीत निर्भेळ यश
अभ्यास करायच्या वयात हातात हतोडा, जॅक, पाने, टायर; परिस्थीतीवर मात करत पंढरपुरच्या शेळवे गावातील स्वप्नाली गाजरेने मिळवले 83.80 टक्के गुण
पंढरपूर : दहावीचं वर्ष म्हणजे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाचं वर्ष असतं. सध्याच्या परिस्थितीत दहावीचे वर्ष विद्यार्थ्यांसाठी स्पर्धेचे वर्ष झाले आहे. दिवस-रात्र अभ्यास करुन विद्यार्थी अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र पंढरपुरच्या शेळवे गावात राहणाऱ्या स्वप्नाली गाजरे हिच्यावर कुटुंबाचां गाडा हाकण्याची आणि वडिलांची मदत करण्याची जबाबदारी खुप लहान वयात आली. वडील सत्यवान गाजरे हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. अवघी दोन एकराची शेती त्यातही सततच्या दुष्काळामुळे काही वर्षांपूर्वी मोटार गॅरेज सुरु केलं. या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनांची दुरुस्ती तसेच मोठमोठ्या गाड्यांच्या पंक्चरची दुरुस्ती ते करत. सोनालीने देखील परिस्थितीची जाण ठेवून अगदी लहान वयात खेळण्याऐवजी हातात स्क्रू-डायव्हर, हाथोडा, जॅक, पाने, टायर घ्यायला सुरुवात केली.
SSC Results 2020 | बीडमधील धनंजय नखातेने मिळवले सार्याच विषयात 35 गुण!
दहावीच्या वर्षी विद्यार्थी वर्षभर अभ्यास करतात, मात्र ऐन परीक्षांच्या दोन महिन्याआधी स्वप्नालीच्या वडीलांचा अपघात झाला. यात गंभीर जखमी झालेल्या स्वप्नालीच्या वडीलांच्या गुडघ्याच्या लिगामेंटला ईजा झाली. स्वप्नालीच्या परीक्षांना अवघे काही दिवस असताना मार्च महिन्यात त्यांच्या पायाचे ऑपरेशन झाले. त्यामुळे स्वप्नालीचे वडील घरीच राहत. घरची परस्थिती जेमतेम असल्याने हातात पुस्तक, वही, पेन घेऊन अभ्यास करण्याऐवजी तिला गॅरेजमध्ये जाऊन पंक्चर काढावे लागायचे. अगदी ज्या दिवशी पेपर असायचे त्या दिवशी देखील सकाळी पंक्चर काढून ती पेपरसाठी जात होती. पेपर देऊन आल्यानंतरही पुन्हा स्वप्नाली तेच काम करायची. त्यानंतर ती रात्रभर जागून दुसऱ्या दिवशीच्या पेपरचा अभ्यास करायची. तिच्या याच कष्टाचे चीज आज जाहीर झालेल्या निकालातून स्पष्ट झाले. स्वप्नाली गाजरे हिला दहावीच्या परीक्षेत 83.80 टक्के इतके गुण प्राप्त झाले आहेत.
SSC result 2020 | सिक्युरिटी गार्डच्या मुलीची झेप, दहावी बोर्डात 99 टक्के गुण
स्वप्नाली हिला तीन भावंडे आहेत. मोठ्या बहिणीचं नुकतंच लग्न झालंय. ती देखील उच्च शिक्षण घेते आहे. तर दुसरी बहिण देखील यंदाच्या वर्षी बारावीला आहे. तर लहान भाऊ देखील शाळेत जातोय. आपल्या गरीबीचं भांडवल न करता जिद्दीने शिक्षण घेणाऱ्या स्वप्नाली हिला पोलिस अधिकारी व्हायचं आहे. यासाठी तिने आतापासूनच तयारी देखील सुरु केलीय. सुर्य उगवण्याच्या आधी अगदी पहाटे जवळपास दररोज 10 किलोमीटर ती धावते. या शिवाय शारीरीक व्यायाम देखील करते. कर्तबगार असलेल्या या गावच्या लेकीने दहावीच्या परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केल्याचे कळताच पंचक्रोशीतून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.
SSC Result 2020 | दहावीचा गेल्या 15 वर्षांतील सर्वाधिक निकाल
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
महाराष्ट्र
निवडणूक
निवडणूक
Advertisement