Maharashtra SSC Result 2021 : दहावीच्या निकालात 100 टक्केला भाव! 27 विषय, 957 विद्यार्थी, कोकण विभाग अन् 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 टक्के
Maharashtra SSC Result 2021 : यंदाच्या निकालात दहावीच्या 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर दहावी परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे.
Maharashtra SSC Result 2021 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेऊन मंडळ अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकालाची घोषणा केली. यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटवर पाहता येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
Maharashtra SSC Result 2021 : आज दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार
यंदाच्या निकालात दहावीच्या 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर दहावी परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत. संपूर्ण राज्यात मिळून 758 मुले नापास झाली पुन्हा परीक्षा देणारे 128 मुले नापास झाली आहेत. राज्यातील 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे तर 9 शाळांचा निकाल शुन्य टक्के लागला आहे.
यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. पत्रकार परिषद घेऊन मंडळ अध्यक्ष दिनकर पाटील यांनी निकालाची घोषणा केली. यंदा दहावीचा निकाल 99.95 टक्के लागला असून यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. आज दुपारी 1 वाजल्यापासून दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना वेबसाईटवर पाहता येणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं.
यंदाच्या निकालात दहावीच्या 27 विषयांचा निकाल 100 टक्के लागला आहे. तर दहावी परीक्षेत कोकण विभागाने बाजी मारली असून कोकण विभागाचा निकाल 100 टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात 957 विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण मिळाले आहेत.
Maharashtra SSC Result 2021: आज दहावीचा निकाल, पाहा महत्वाचे अपडेट्स
या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून एकूण 15 लाख 75 हजार 806 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 75 हजार 752 विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे. त्यापैकी 15 लाख 74 हजार 994 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून निकालाची टक्केवारी 99.95 आहे.
या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळामधून एकूण 82 हजार 802 पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 82 हजार 674 विद्यार्थ्यांची संपादणूक शाळांकडून प्राप्त झाली आहे त्यापैकी 74618 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी 90.25 आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (100%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (99.84%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94% आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02% ने जास्त आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84% लागला आहे.
एकूण 72 विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये 27 विषयांचा निकाल 100 % टक्के लागला आहे राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 6 लाख 98 हजार 885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 218070 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 9356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.
राज्यातील 22767 शाळांतून 16 लाख 58 हजार 614 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे. सन 2021 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2020 च्या निकालाच्या तुलनेत 4.65 % जास्त आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 28424 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 97.45 आहे.
कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागणार आहे. आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या निकालाचं विशेष महत्त्व म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या.
विद्यार्थ्यांना आपला निकाल mahresult.nic.in , http://result.mh-ssc.ac.in, http://www.mahahsscboard.in या वेबसाईट्सवर पाहता येईल
असा पाहा निकाल
-सर्वात आधी mahresult.nic.in , http://result.mh-ssc.ac.in, http://www.mahahsscboard.in वेबसाईटवर जा.
-होम पेजवर असलेल्या SSC Examination Result 2021 वर क्लिक करा
- इथं आपला रोल नंबर टाकून आपल्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं टाका
- सबमिट करा
- निकाल आपल्या स्क्रिनवर दिसेल, तो सेव्ह करा
- निकालाची प्रिंट काढायला विसरु नका