एक्स्प्लोर

Maharashtra SSC Result 2021 Live Updates: दहावीच्या निकालासाठीचे संकेतस्थळ लवकरच पुर्ववत होईल : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

MSBSHSE, Maharashtra SSC Result 2021 LIVE Updates : आज दहावीचा निकाल  जाहीर होणार आहे. दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे.

LIVE

Key Events
Maharashtra SSC Result 2021 Live Updates: दहावीच्या निकालासाठीचे संकेतस्थळ लवकरच पुर्ववत होईल : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

Background

MSBSHSE, Maharashtra SSC Result 2021 LIVE Updates: : आज दहावीचा निकाल ( SSC Result 2021) जाहीर होणार आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागणार आहे. आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या निकालाचं विशेष महत्त्व म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. 

Maharashtra SSC Result 2021 : आज दहावीचा निकाल, दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार

शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावीचा निकाल 16 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती दिली. राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आणि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता यंदा राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाद्वारे गुण देण्याचा शासन निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. यासाठी अंतर्गत मूल्यमापनाचे निकष सुद्धा ठरवले होते. या मूल्यमापनाच्या आधारे आज दहावीचा निकाल दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर होणार आहे. बोर्डाच्या  www.mahahsscboard.in  या अधिकृत संकेसस्थळावर हा निकाल विद्यार्थ्यांना पाहता येईल. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी निकालाबाबत माहिती दिली. यावर्षी पहिल्यांदाच दहावी बोर्ड परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाकडून घेण्यात आला होता. त्यामुळे हा निकाल पूर्णपणे अंतर्गत मूल्यपामनद्वारे तयार करण्यात आला आहे.

Maharashtra SSC Result 2021 : दहावीचा निकाल आज जाहीर होणार, दुपारी 1 वाजता पाहता येणार ऑनलाईन निकाल

www.mahahsscboard.in (या संकेतस्थळावर विद्यार्थी आपला निकाल पाहू शकतील)

दहावीची परीक्षा यावर्षी 29 एप्रिल ते 20 मे या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र त्याच दरम्यान राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव पाहता ही परीक्षा रद्द करण्यात आली. विद्यार्थ्यांना इयत्ता नववी आणि दहावीच्या मिळवलेल्या गुणांच्या आधारे अंतर्गत मूल्यमापन करून निकाल जाहीर करण्याच्या सूचना करण्यात आल्या. यामध्ये इयत्ता नववी मिळालेले 50 टक्के गुण व दहावीत वर्षभरात  अंतर्गत मूल्यमापनाचे 50 टक्के गुण एकत्र करून हा निकाल तयार करण्याचे आदेश शाळांना देण्यात आले होते. त्यानुसार शाळांनी मुख्यध्यापकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार करून विषयनिहाय गुण विद्यार्थ्यांना देऊन हा निकाल बोर्डाकडे पाठवला. त्यानंतर बोर्डाकडून या शाळेकडून आलेल्या निकालावर योग्य ते काम करून उद्या हा निकाल जाहीर करण्याचे ठरवले आहे. दहावीच्या निकलाबाबत विद्यार्थी समाधानी नसल्यास त्यांना परिक्षेचा देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. यावर्षी दहावीच्या परिक्षेसाठी एकूण 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.  यामध्ये 9 लाख 9 हजार 931 मुले तर 7 लाख 48 हजार 693 विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली होती आता या परीक्षेचा उद्या निकाल लागणार आहे त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपली आहे.

17:38 PM (IST)  •  16 Jul 2021

दहावीच्या निकालासाठीचे संकेतस्थळ लवकरच पुर्ववत होईल : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

दहावीच्या निकालाचे संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू करण्याचे आदेश शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले आहेत. संकेतस्थळ लवकरच पुर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे. माध्यमिक शालांत परीक्षेच्या संकेतस्थळावर अचानक भेट देणाऱ्यांची संख्या वाढल्यामुळे संकेतस्थळ काही काळासाठी क्रॅश झाल्याने विद्यार्थांना आपला निकाल बघता आला नाही. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचेही प्रा. गायकवाड यांनी निर्देश दिले आहेत.

13:11 PM (IST)  •  16 Jul 2021

दहावी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट ओपन होईना

Maharashtra SSC Result 2021: दहावी निकाल पाहण्यासाठी वेबसाईट ओपन होईना, एक वाजताची वेळ उलटूनही विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईना 
https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-board-ssc-result-2021-live-updates-msbshse-maharashtra-class-ssc-10-result-declared-mahresult-nic-in-mahahsscboard-in-indiaresults-com-varsha-gaikwad-994796

11:58 AM (IST)  •  16 Jul 2021

दहावीचा निकाल दुपारी एक वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर पाहता येणार

राज्यातील 22,767 शाळांतून 16 लाख 58 हजार 614 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 % लागला आहे. सन 2021 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2020 च्या निकालाच्या तुलनेत 4.65 % जास्त आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या 28424 एवढी असून त्यांच्या निकालाची टक्केवारी 97.45 आहे. कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे दहावीचा निकाल यंदा जवळपास एक-दीड महिना उशीरा लागणार आहे. आज दुपारी 1 वाजता बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. यंदाच्या निकालाचं विशेष महत्त्व म्हणजे, इतिहासात पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. 

11:57 AM (IST)  •  16 Jul 2021

72 पैकी 27 विषयांचा निकाल 100 टक्के

एकूण 72 विषयांना सुधारित मूल्यमापन कार्यपध्दतीत निश्चित केलेल्या भारांशनुसार गुणदान करण्यात आले असून त्यामध्ये 27 विषयांचा निकाल 100 % टक्के लागला आहे राज्यातून नियमित उत्तीर्ण विद्यार्थ्यांपैकी 6 लाख 48 हजार 683 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 6 लाख 98 हजार 885 विद्यार्थी प्रथम श्रेणीत 218070 विद्यार्थी द्वितीय श्रेणीत 9356 विद्यार्थी उत्तीर्ण श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

11:55 AM (IST)  •  16 Jul 2021

दहावीच्या निकालात मुलींची बाजी

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (100%) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल नागपूर विभागाचा (99.84%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94% आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02% ने जास्त आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल 97.84% लागला आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Anil Parab Full PC : मुंबईत मराठी माणूस टिकला पाहिजे : अनिल परब : ABP MajhaPune Drugs Video Exclusive : पुण्यातील मॉलमध्ये ड्रग्जचं सेवन, 2 तरुणींचा धक्कादायक व्हिडीओBhandara : गोसीखुर्द जल पर्यटन प्रकल्पाच्या फलकावरुन फडणवीसांचे नावच गायब!ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 June 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
पंकजा मुंडेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या युवकास अटक; परभणी पोलिसांनी उचललं, परळीत स्वाधीन केलं
Malegaon : अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
अखेर 'त्या' तरुणाला मिळाली 20 लाखांची मदत, पॉवर सप्लाय कंपनीच्या गलथान कारभारामुळे गमावले होते हात
MEA On Passport Verification : पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
पासपोर्टसाठी अर्ज करणाऱ्यांना खुशखबर; जाणून घ्या आता किती लवकर मिळणार पासपोर्ट?
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
शुभमन गिल कर्णधार, रियान पराग-अभिषेक शर्माला संधी; झिम्बॉब्वे दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
अमोल मिटकरींनी तोंडाला आवर घालावी, दरेकरांचा संताप; रोहित पवारांवरही बोचरा पलटवार
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
T20 World Cup 2024 : इंग्लंड की दक्षिण आफ्रिका, उपांत्य फेरीत भारताचा सामना कुणासोबत?  
Ram Mandir : पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
पहिल्याच पावसात राम मंदिरातील रामलल्लांच्या गाभाऱ्यात पाण्याची गळती; मुख्य पुजारींनी केली चौकशीची मागणी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
मोठी बातमी : पुणे ड्रग्स प्रकरणातील आरोपींना 29 जूनपर्यंत पोलिस कोठडी
Embed widget