एक्स्प्लोर

Sanjay Raut : हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नही, आपको झुकाएंगे, संजय राऊतांनी दंड थोपटले

हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नही, आपको झुकाएंगे, असा इशारा देत संजय राऊत यांनी तपास यंत्रणा आणि भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. तसेच उद्यापासून तुम्हाला अनेक गोष्टी समजतील. 

Maharashtra Shiv Sena Sanjay Raut Press Conference : शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी मंगळारी पत्रकार परिषद घेत, भाजप आणि तपास यांत्रणावर टीकेचा बाण सोडला. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडचे सरकार पाडण्याचा डाव असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला. तसेच भाजप नेत्यांनी राज्यातील सरकार पाडण्यासाठी दबाव टाकला आणि तपास यंत्रणाच्या धमक्याही दिल्या, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला. हम डरेंगे नहीं, हम झुकेंगे नही, आपको झुकाएंगे, असा इशारा देत संजय राऊत यांनी तपास यंत्रणा आणि भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. तसेच उद्यापासून तुम्हाला अनेक गोष्टी समजतील, असेही सांगितले.

शिवसेनामध्ये संजय राऊत एकटे पडले आहेत, अशी टीका विरोधीपक्षांनी केली होती, या टीकेला उत्तर देण्यासाठी संजय राऊत यांनी शिवसेना भवनामध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडलं आहे. या पत्रकार परिषदेला महापौर किशोरी पेडणेकर, आनंद आढसूळ, अरविंद सावंत,विनायक राऊत,अनिल देसाई,दादा भुसे ,दिवाकर रावते , उदय सामंत , प्रियंका चतुर्वेदी, राहुल शेवाळे,सचिन अहिर,आदेश बांदेकर, मनीषा कायदे,गजानन कीर्तिकर , संजय शिरसाठ यांच्यासह अनेक शिवसेना खासदार, नेते आणि उपनेते उपस्थित होते. त्याशिवाय शिवसेना भवनाबाहेर कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. मुंबईसह पुणे, नाशिक, सोलापूर आणि इतर मोठ्या शहरातील शिवसेना कार्यलयाबाहेर शिवसैनिक जमले आहेत. पुणे आणि सोलापूरमध्ये पोस्टरबाजीही पाहायला मिळाली. 

महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न - 
'आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली. मन साफ असेल तर कुणालाच्या बापाला घाबरु नको, असे बाळासाहेब सांगायचे. ' खासदार संजय राऊत म्हणाले की, "केंद्रीय तपास यंत्राणांचा वापर करून महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही काही लोकांनी आम्हाला मदत केली नाही तर केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा तुमच्या मागे लावू.  आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली लढलो, नुसते हल्लेच नाहीत तर अतिरेक्यांचे हल्ले आम्ही परतवले आहेत ते याच वास्तूच्या खाली."

महाराष्ट्र हा गां*ची औलाद नाही -
शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख आधारस्तंभ आहेत. म्हणून हे सरकार पाडण्यासाठी भाजपने पवार कुटुंबियांच्या मागेही ईडीचा ससेमिरा लावला. मन साफ आहे तर कुणाच्या बापाला घाबरु नका असा सल्ला बाळासाहेबांनी दिला होता.  असं खासदार संजय राऊत म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करुन महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपाचा प्रयत्न आहे. पण महाराष्ट्र हा गां*ची औलाद नाही, महाराष्ट्र बेईमान नाही असा हल्लाबोल शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

फडणवीसांच्या काळात महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा सर्वात  मोठा घोटाळा 
देवेंद्र फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. महाआयटीमध्ये 25 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी आजच्या पत्रकार परिषदेत भाजपवर केले आहे.  भाजप सत्तेत असताना हरियाणाचा एक दूधवाला सात हजार कोटींचा मालक कसा झाला. ईडीला हे दिसत नाही का? असा सवाल देखील संजय राऊत यांनी उपस्थित केला.

मोहित कंबोज फडणवीसांना डुबवणार - 
देवेंद्र फडणवीसांचा अजून एक फ्रंटमॅन आहे त्याचे मोहित कंबोज आहे. तो फडणवीसांना डुबवणार  आहे. पत्रा चाळ जमिनीत कंबोजचा पैसा  आसून पीएमसी बॅंक घोटाळ्याचा पैसा त्यात लागला आहे. राकेश वाधवान त्यांच्याकडून केबीजी ग्रुपनं 12 हजार कोटींची जागा 100 कोटींना घेतली. अनेक व्यवसाय कंबोजच्या केबीजी ग्रुपचे, पैसे कुठून आलेत याच माहिती फडणवीसांना माहिती आहे.

'मुलुंडचा दलाल', किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊतांचा निशाणा - 
किरीट सोमय्या यांच्यावर टीकेचा बाण सोडताना संजय राऊत यांनी त्यांचा उल्लेख  'मुलुंडचा दलाल' असा केला. मुलुंडचा दलाल पत्रकार परिषद घेऊन सांगतो, या या वेळेस धाड पडणार.. हा काय प्रकार आहे? तुम्हांला काय वाटत आम्हीं झुकू? बाळासाहेबांनी आम्हाला शिकवल आहे, गुडघे टेकायचे नाहीत. तो 'दलाल' ज्याला मराठीत, शुद्ध मराठीत 'भडवा' म्हणतात त्याने म्हटले आहे की ठाकरे कुटुंबाने कोरलाई गावात 19 बंगले बांधले आहेत. ही बेनामी प्रॉपर्टी आहे. माझं त्या दलालाला आव्हान आहे, कधी सांगा?, असा टीकेचा बाण संजय राऊत यांनी सोडला आहे. 'ठाकरेंचे 19 बंगले अलिबागमध्ये दिसले, तर राजकारण सोडेन.  बंगले दिसले नाहीत, तर सोमय्यांना शिवसैनिक जोड्याने मारेल.' सरकार पाडण्यात मदत नाही केली तर तपास यंत्रणा मागे लागतील, असे भाजप काही नेत्यांनी सांगितले. सरकार पाडण्यात मदत केली नाही तर केंद्रीय यंत्ऱणा टाईट करतील, असेही भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले. भाजपच्या काही नेत्यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे सांगितले. सरकार पाडण्यात मदत नाही केल्यास तपास यंत्रणा मागे लावू, असे भाजप नेत्यांकडून सांगितले जात होतं.

कपडे शिवले तिथे देखील ईडीच्या लोकांनी तपास केला -
दोन वर्षांपूर्वी राज्यात भाजपचे सरकार होते. त्यावेळच्या वनमंत्र्यांच्या घरच्या लग्नात अवाढव्य खर्च करण्यात आला. त्या लग्नात कार्पेट हे साडे कोटी रुपयांचे होतं. हे ईडीला दिसलं नाही, पण मी कपडे शिवले तिथे देखील ईडीच्या लोकांनी तपास केला. असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ‘दोन वर्षांपूर्वी भाजपच्या सरकारातील वनमंत्र्यांच्या घरी लग्न होतं. ते वनमंत्री होते म्हणून लग्नाची थीम ही जंगलाची होती. त्यावेळी तिथलं कार्पेट हे साडे नऊ कोटींचे होतं. या लग्नात अवाढव्य खर्च केला होता. हे ईडीला कधी दिसलं नाही. पण आम्ही म्हटलं लग्न आहे...कशाला उगाचा काढा. पण मी ज्या ठिकाणी कपडे शिवले तिथेही ईडीच्या लोकांनी तपास केला, असे राऊत म्हणाले.’

ईडी अधिकार्यांना घाम फुटेल - 
जितेंद्र चंद्रालाल नवलानी कोण आहेत, हे ईडीने सांगावे. नवलानीचं नाव ऐकूण दिल्ली ते मुंबईच्या ईडी अधिकार्यांना घाम फुटेल, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी यावेळी केला. तसेच मुंबईच्या 70 बिल्डराकडून ईडी आणि दलालाकडून वसूली केली जात आहे. 70 बिल्डराकडून किमान 300 कोटी वसूल केले. यात ED चे काही अधिकारी सहभागी आहेत असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊत यांनी केला.  

किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना अटक करा  -
पीएमसी घोटाळ्यातील मास्टरमाईंड राकेश वाधवान हा किरीट सोमय्या यांचा पार्टनर आहे. त्या राकेश वाधवान यांना भाजपला 20 कोटी रुपयांचा निधी दिला होता असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. पीएमसी बँक घोटाळ्याच्या आधी सोमय्यांच्या जवळच्या अनेक लोकांनी त्यातून पैसे काढून घेतले आहेत. त्यामुळे किरीट सोमय्या आणि त्यांच्या मुलगा निल सोमय्या यांना अटक करा असं खासदार संजय राऊत म्हणाले. पीएमसी बँकेच्या घोटाळ्यातून मिळालेल्या पैशातून अनेक ठिकाणी जमिनी घेतल्या आहेत. या बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि निल सोमय्या यांना अटक करा अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
खासदार संजय राऊत म्हणाले की, "पीएमसी बँकेच्या घोटाळ्याप्रकरणी राकेश वाधवान याला ब्लॅकमेल केलं आणि त्याच्याकडून कोट्यवधीची जमीन घेतली. त्यांनी एक जमीन सात कोटी रुपयांना आणि वसई येथील 400 कोटी रुपयांची जमीन चार कोटी रुपयाला घेतली आहे आणि त्या जमीनीवर जी कंपनी आहे त्या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमय्या आहे. निकॉन फेज वन आणि निकॉन फेज दोन हा हजारो कोटींची प्रकल्प उभारला आहे. त्याला पर्यावरण क्लिअरन्स नाही. या प्रकरणी कंपनीच्या सर्व परवानग्या रद्द करा."

किरीट सोमय्या दलाल असल्याचा आरोप - 
खासदार संजय राऊत भाजप नेते किरीट सोमय्याविषयी बोलताना म्हणाले की, "छत्रपतींच्या या राज्यामध्ये या आधी असं घाणेरडे राजकारण केलं नाही. उद्धव ठाकरे आणि परिवाराच्या रोज काही ना काही बातम्या उठवायच्या. पण या बातम्या जो सांगतो ना तो दलाल आहे. किरीट सोमय्या हा माणूस मराठी द्वेष्टा आहे. त्यानेच मुंबईतील शाळांमध्ये मराठी सक्ती केल्यानंतर कोर्टाचे दरवाजे ठोठावले होते. आधी त्याचं थोबाड बंद करा. मराठीचा द्वेष करणाऱ्या या माणसाकडून अजून काय अपेक्षा करणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

1 Min 1 Constituency : 1 मिनिट 1 मतदारसंघ : 15 Nov 2024 : Vidhan Sabha : Maharashtra ElectionRaj Thackeray Bhiwandi : महिला कार्यकर्ता पाया पडली, राज ठाकरे म्हणले, हे नाही आवडत मलाNashik-BJP Sena Rada : भाजपच्या गणेश गीतेंच्या वाहनावर हल्ला,  नाशिकमध्ये भाजप-सेनेचा राडाShreya Yogesh Kadam Ratnagiri : 6 महिने मुलांपासून दूर; प्रचारादरम्यान योगेश कदमांच्या पत्नी भावूक

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shahu Maharaj : समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
समरजित घाटगेंच्या प्रचारात छत्रपती घराणं सक्रिय; शाहू महाराज म्हणाले, समरजित हे स्वतः सीए आहेत, त्यांना गणित चांगलं कळतं!
Sharad Pawar : शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
शरद पवारांनी दिलीप वळसेंच्या विरोधात देवदत्त निकमांना उभं 'का' केलं? काय आहे मोठं कारण, जाणून घ्या सविस्तर
Palus Kadegaon Sabha Constituency : विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
विश्वजीत कदम दबदबा कायम ठेवणार की भाजप गड फोडणार? पलूस कडेगावमध्ये कोण बाजी मारणार? 
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
आधी मविआला पाठिंबा, आता सज्जाद नोमानी म्हणाले, महाराष्ट्रच नव्हे, दिल्ली सरकारही टार्गेट, शेलारांकडून व्हिडीओ ट्विट
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Muddyache Bola Nagpur : नागपूरमध्ये कुणाची हवा? मुद्द्याचं बोला थेट नागपूरहून #abpमाझा
Sharad Pawar In Chandgad : नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
नंदाताई तुमच्या माझ्या कन्या आहेत; फसवणूक करणाऱ्यांना शिक्षा द्यायची असेल तर निवडून द्या; शरद पवारांची चंदगडकरांना साद
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
राज ठाकरे आले, माईकवरुन थोडकंच काय ते सांगितलं अन् निघून गेले; जाहीर सभा ने घेता परत फिरले
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Sada Sarvankar : उमेदवारापाठी राज-उद्धव ठाकरे असले तरी नावापेक्षा काम महत्वाचं असतं
Embed widget