Maharashtra School Reopen LIVE Updates: एकदा उघडलेली शाळा पुन्हा बंद करायला नको असा निर्धार करा: उद्धव ठाकरे
आज सोमवार 4 ऑक्टोबर राज्यातील शाळा सुरू झाल्या आहेत. या निमित्ताने दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत ऑनलाइन संवाद साधणार आहेत.
LIVE
Background
मुंबई : आज(सोमवार 4 ऑक्टोबर) राज्यातील शाळा सुरू होणार आहे. या निमित्ताने दुपारी 12 नंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे 'माझे विद्यार्थी माझी जबाबदारी' या कार्यक्रमांतर्गत सर्व शाळा, शिक्षक, मुख्याध्यापक यांच्याशी ऑनलाइन संवाद साधणार आहेत. विद्यार्थ्यांना सुद्धा हा कार्यक्रम दखविण्यात यावा अशा सूचना करण्यात आल्या आहेत.
शिक्षणोत्सव साजरा केला जाणार :
आज शाळेच्या पहिल्या दिवशी शैक्षणिक वातावरण निर्माण व्हावे यासाठी शिक्षणोत्सव साजरा केला जाणार आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचा अनौपचारिक स्वागत केले जाणार आहे. आज उपसंचालक, शिक्षणाधिकारी, प्राचार्य हे शाळांना भेटी देणार आहेत. सोबतच पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे केलेले स्वागत, नियोजनाचे फोटो समाजमाध्यमावर पोस्ट करण्यास सांगितले आहे. #शिक्षणोत्सव या नावाने फेसबुक, इंस्टा, ट्विटर हे फोटो पोस्ट करण्यात यावेत.
TET Exam : टीईटी परीक्षेची तारीख बदलली, आता 'या' तारखेला होणार परीक्षा
शाळांना दिलेल्या सूचना..
विद्यार्थ्यांना लवकरात लवकर गणवेश वाटप करण्यात यावे.
सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे, ज्या शिक्षकांची लसीकरण झालेले नाही त्या शिक्षकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करावे.
सर्व शाळांनी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे 100% लसीकरण करावे.
लसीकरण झाले नाही म्हणून हे कारण देत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुपस्थित राहता येणार नाही.
राज्यातील बोगस विद्यार्थी होणार उघड, परभणीत आढळले 14 हजार बोगस विद्यार्थी
मुंबईतील इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार
दीड वर्षांपासून बंद असलेल्या मुंबईतील शाळा आता 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शहरातील महानगरपालिका शाळा, खाजगी व्यवस्थापन, इतर सर्व मंडळाच्या शाळांना आठवी ते बारावी चे वर्ग सुरु करण्यास परवानगी मिळाली आहे. 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरु करण्यासाठीचा प्रस्ताव शिक्षण विभागाकडून आयुक्तांपुढे मांडण्यात आला होता. त्याला बीएमसी आयुक्त इकबाल सिंग चहल यांची मंजुरी मिळाली आहे. मुंबई परिक्षेत्रातील आठवी ते बारावीचे वर्ग असणाऱ्या सर्व माध्यमाच्या सर्व बोर्डाच्या एकूण शाळा 2553 आहेत व त्यात एकूण विद्यार्थी 5, 13, 502 विद्यार्थी शिक्षण घेतात.
एकदा उघडलेली शाळा पुन्हा बंद करायला नको असा निर्धार करा: उद्धव ठाकरे
गेल्या दीड वर्षानंतर आपल्या शाळा उघडल्या आहेत. आता त्या पुन्हा बंद करायला नको असा निर्धार करुयात असं राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
सध्याचा काळ कठीण आहे, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
कोरोनाचे नियम पाळून शाळा सुरु, सर्वांनी काळजी घ्यावी: मुख्यमंत्री
सध्याचा काळ कठीण आहे, त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून राज्यातील शाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. पालकांनी आपल्या पाल्याची काळजी घ्यावी असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
हिंजवडी येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या
हिंजवडी येथील जिल्हा परिषद शाळेत राष्ट्रवादी खासदार सुप्रिया सुळे पोहोचल्या. दीड वर्षानंतर शाळा खुल्या झाल्याने विद्यार्थ्यांना त्या प्रोत्साहित करत आहेत. त्यानंतर विध्यार्थ्यांना गणवेश आणि शालेय साहित्याचे त्या वाटप करतील.
विद्यार्थ्यांचे विदूषकांच्या हस्ते पुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सुमारे दीड वर्ष बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत या निमित्ताने पुण्यातील राजीव गांधी इ लर्निंग स्कूलमधील विद्यार्थ्यांचे विदूषकांच्या हस्ते पुष्प आणि चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले तर पालकांना मास्कचे वाटप करीत कोरोना विषयक काळजी घेण्याची आवाहन शिक्षकांकडून करण्यात येत होते
कोरोना नियमाचे पालन करत कल्याण डोंबिवलीत शाळा सुरू,शिक्षकांसह विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
राज्यभरात तब्बल दीड वर्ष बंद असलेल्या शाळा आजपासून सुरू झाल्यात .कल्याण डोंबिवली मध्ये देखील शाळांचे 8 वी ते 10 वी व कनिष्ठ महाविद्यालयाचे 11 व 12 वी पर्यन्त चे वर्ग सुरू करण्यात आले .कल्याण पूर्वेकडील सम्राट अशोक विद्यालयात मुलांचं स्वागत करण्यासाठी तयारी करण्यात आली आहे, शाळेत येणाऱ्या मुलांच्या स्वागतासाठी आरती, ढोल ,रांगोळ्या अशी तयारी करण्यात आली आहे ,विद्यार्थ्यांनी सकाळी आठ वाजताच शाळेत हजेरी लावली आहे .शाळेकडून मुलांना ओवाळून मुलांवर पुष्पवृष्टी केली जात आहे .मुलांना शाळेत आज शिक्षणाबरोबरच कोरोना बाबत जनजागृती केली जाणार आहे आहे