Sanjay Raut: संजय राऊत धमकीप्रकरणी मयुर शिंदेला अटक, राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती
संजय राऊत यांना धमकी दिल्या प्रकरणी मयुर शिंदे नावाच्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे.
![Sanjay Raut: संजय राऊत धमकीप्रकरणी मयुर शिंदेला अटक, राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती Maharashtra Sanjay Raut news Mayur Shinde has been arrested in the Sanjay Raut threat case Mumbai Police Sanjay Raut: संजय राऊत धमकीप्रकरणी मयुर शिंदेला अटक, राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/06/15/1e8a31a31118a51468dd1434a690ad43168681276091789_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या मयुर शिंदेला अटक करण्यात आली आहे. राऊतांची सुरक्षा वाढवावी यासाठी बनाव रचल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस (Mumbai Police) सूत्रांनी ही माहिती दिली आहे. मयुर शिंदे हा सुनील राऊतांचा निकटवर्तीय असल्याची चर्चा आहे.
मुंबई पोलिसांनी आतापर्यंत चार व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलीसांनी ही माहिती दिली आहे. मयुर शिंदे हा संजय राऊत यांच्या जवळचा आहे. मयुर शिंदेने संजय राऊतांची सुरक्षा वाढवण्यासाठी हा बनाव रचला होता. मयुर शिंदेने स्वत: फोन केले नाहीत. मात्र मयुर शिंदे हा या मागचा मुख्य सूत्रधार असून आपल्या जवळच्या साथीदारांना त्याने हे फोन करण्यास सांगितल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
राऊत बंधू हे राजकारणी आहेत की गँगस्टर? संदिप देशपांडेंचा सवाल
या प्रकरणी बोलतान मनसे नेते संदिप देशपांडे म्हणाले, संजय राऊत आणि सुनील राऊत यांचे गँगस्टर लोकांशी संबंध आहे. माझ्यावर हल्ला करणारा व्यक्ती देखील संजय आणि सुनील राऊत यांच्या जवळील आहे. राऊत बंधू हे राजकारणी आहेत की गँगस्टर आहेत? हा प्रश्न उपस्थित राहत आहे. धमकीचा बनाव रचण्यासाठी मयुर शिंदेचा वापर राऊत बंधूंनी केला आहे.
संजय राऊत धमकी प्रकरणात मयूर शिंदे नामक व्यक्ती ला अटक केली आहे का ?आणि केली असेल तर त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून धमकी दिली हे जनतेला समजलच पाहिजे. मुंबई पोलिसांनी हे जाहीर करावं
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 15, 2023
मयुर शिंदे हा गेली अनेक वर्ष सुनील राऊत यांच्यासोबत काम करत आहे. तो कायम त्यांच्यासोबत असतो मुलुंड, भांडुप, विक्रोळी परिसरात त्याचा दबदबा आहे. सध्या मयुर शिंदे एका वेगळ्या पक्षासाठी काम करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांचे बंधू आणि भांडुप मतदारसंघाचे आमदार सुनील राऊत यांच्या मोबाईलवर धमकीचा फोन आला होता. एका अज्ञात व्यक्तीनं हा फोन सुनील राऊतांना केला होता. सुनील राऊतांनी फोन उचलताच सकाळी 9 वाजताचा भोंगा बंद करा, अन्यथा महिनाभरात तुम्हा दोघांनाही गोळ्या घालू अशी थेट धमकी या अज्ञात व्यक्तीनं संजय राऊतांना आणि सुनील राऊतांना दिली.
दरम्यान, शरद पवार, संजय राऊत धमक्यांच्या सत्रानंतर सरकारवर विरोधकांनी टीकेची उठवली आहे. तसंच राऊतांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हे ही वाचा :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)