Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 848 कोरोनाबाधितांची नोंद, 50 जणांचा मृत्यू
Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मोठी घट होताना दिसत आहे.

Coronavirus In Maharashtra: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 848 नवे कोरोनाबाधित आढळून आले. तर, 50 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालीय. याशिवाय, 987 रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. राज्यात आतापर्यंत एकूण 64 लाख 79 हजार 396 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. ज्यामुळं राज्यातील रुग्ण बरं होण्याचं प्रमाण 97.68 टक्क्यांवर पोहचलंय. राज्यात सध्या 9 हजार 187 रुग्ण सक्रीय आहेत.
राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला मोठं यश आलंय. राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के इतका आहे. राज्यात आतापर्यंत तपासण्यात आलेल्या सहा कोटी 50 लाख 47 हजार 491 जणांची कोरोना चाचणी करण्यात आलीय. त्यापैकी 66 लाख 33 हजार 105 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आलाय. राज्यात सध्या 90 हजार 538 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत. तर, 1 हजार 65 रुग्ण वैद्यकीय संस्थेत उपचार घेत आहेत.
महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे, असा इशारा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नागरिकांना दिलाय. या लाटेची कोणतेही गंभीर परिणाम दिसणार नसल्याचं त्यांनी सांगितलंय. राज्यात आतापर्यंत 80 टक्के नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आलीय. त्यामुळं पहिल्या किंवा दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसरी लाट ही सौम्यच असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्यात कोरोनाची तिसरी लाट आली तरी त्याचा सामना करण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. दुसऱ्या लाटेच्या वेळी असणाऱ्या आरोग्याच्या पायाभूत सुविधांमध्ये आता दीडपट वाढ करण्यात आल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी म्हटलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
