एक्स्प्लोर

Maharashtra School Reopen News : शाळा पुन्हा गजबजणार! एक डिसेंबरपासून पहिली ते चौथीपर्यंत शाळा सुरू होणार

school reopen in Maharashtra : एक डिसेबरपासून राज्यातील पहिली ते चौथी पर्यंतची शाळा सुरू करण्यात येणार आहे.

School Repoen in Maharashtra :  कोरोनाचा जोर ओसरत असताना राज्यातील इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा एक डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या निर्णयाला मान्यता दिली आहे. जवळपास दोन वर्षानंतर आता राज्यातील शाळांमध्ये लहान मुलांचा किलबिलाट ऐकू येणार आहे. पाल्यांना मुलांना शाळेत पाठवण्याची सक्ती नसणार आहे. लवकरच याबाबतची मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात येणार आहेत. 

शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवला होता. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत काय निर्णय होईल याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य मंत्रिमंडळाने पहिली ते चौथीपर्यंतची शाळा सुरू करण्याची परवानगी दिली. राज्यातील काही ठिकाणी याआधीपासूनच चौथीपासून, सातवीपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. 

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत चालल्यानंतर हळूहळू सर्व गोष्टींमध्ये शिथिलता येत आहे. आता पहिली ते चौथी शाळा सुरु होणार असल्याचे संकेत आरोग्यमंत्री टोपे यांनी दिले होते. पहिली ते चौथी सर्व विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत.  त्यांचे लसीकरण केले पाहिजे. 12 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण करावे हा मुद्दा मांडला गेला आहे. पहिली ते चौथी शाळा सुरु करायला परवानगी द्यावी असंही त्यांनी म्हटलं होते. मात्र, लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्र सरकार टास्क फोर्सच्या अहवालानंतर निर्णय घेणार आहे.

शहरी भागात पहिली ते सातवी आणि ग्रामीण भागात पहिली ते चौथीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास चाईल्ड टास्क फोर्सने हिरवा कंदील दिला होता. राज्य शासनाने इतर बाबींची पूर्तता केल्यास, शाळा सुरू करण्यास काहीच हरकत नसल्याचा चाइल्ड टास्क फोर्सचे म्हणणे आहे. चाईल्ड टास्क फोर्सने हिरवा कंदील दाखवला असला तरी  शाळा सुरु करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतरच होणार होता. अखेर आजच्या मंत्रिमंडळात याला मंजुरी देण्यात आली.

मार्गदर्शक सूचना तयार करणार

टास्क फोर्ससोबत चर्चा करून मार्गदर्शक सूचना तयार करणार असल्याचे राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले. शाळा सुरू करण्याच्या दृष्टीने तयारीसाठी आठ दिवसांचा वेळ घेतला आहे. शाळा सुरू करण्यासंदर्भात उद्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले. मागील अनुभव पाहता आरोग्यमय वातावरण सुरक्षित वातावरण देण्याचा प्रयत्न करू असेही त्यांनी म्हटले.  टास्क फोर्ससोबत चर्चा करून वेगळ्या मार्गदर्शक सूचना तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालक व इतर घटकांनीदेखील शाळा सुरू करण्यासाठीच्या सूचना द्याव्यात. त्यानुसार आपण मार्गदर्शक सूचना तयार करू असे वर्षा गायकवाड यांनी म्हटले. मागील वेळेस शाळेत सुरू करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना सविस्तर आहेत. त्यानुसार पहिली ते सातवी शाळा सुरू करण्याबाबत विचार करणार असल्याचे त्यांनी म्हटले. 

महत्त्वाच्या बातम्या

Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Sudhakr Kohale: भाजपच्या परंपरेनुसारच माझी उमेदवारी, घोषणा दिल्लीतून; अनिल सोले अन् गिरीश व्यास यांचा आरोप चुकीचा, सुधाकर कोहळेंच स्पष्टीकरण; म्हणाले, पक्षांतर्गत बंडखोरीचे झेंडे..
भाजपच्या परंपरेनुसारच माझी उमेदवारी, घोषणा दिल्लीतून; अनिल सोले अन् गिरीश व्यास यांचा आरोप चुकीचा, सुधाकर कोहळेंच स्पष्टीकरण; म्हणाले, पक्षांतर्गत बंडखोरीचे झेंडे..
Accident News: ज्योत आणण्यापूर्वीच घराचा दिवा विझला! भीषण अपघातात तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; तुळजापूर मंदिरातून छत्रपती संभाजीनगरला ज्योत घेऊन परतताना कंटेनरची दुचाकीला धडक
ज्योत आणण्यापूर्वीच घराचा दिवा विझला! भीषण अपघातात छत्रपती संभाजीनगरच्या तीन तरुणांचा दुर्दैवी अंत; तुळजापूर मंदिरातून ज्योत घेऊन परतताना कंटेनरची दुचाकीला धडक
Nagpur News: दुष्काळाचं सावट! नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा मोठा निर्णय
दुष्काळाचं सावट! नागपूर जिल्ह्यात बोअरवेल खोदकामांवर पुढील आदेशापर्यंत बंदी; संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचा मोठा निर्णय

व्हिडीओ

Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha
Nagpur Project Water Report : पाणी घटलं, संकट वाढलं, ऑक्टोबरमध्ये मे सारखी परिस्थिती | Special Report ABP Majha
Sanjay Raut Pune :पंतप्रधान म्हणून यंदा मोदींचा शेवटचा वाढदिवस असेल, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य
Datta Bharne Vijay Shivtare : वाहिनी गप्पा मारणारी आणि जास्त कानाला लागणारी माणसं आता ओळखा
Abhijeet Dipke On Delhi Protest : CJP आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी का नाकारली?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
CJP Protest Delhi: अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
अजिंक्य शिंदेंच्या नेतृत्त्वात सीजेपीचे आंदोलक पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, मेट्रो सेवा सुरु, दिल्लीत नेमकं काय घडलं?
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Delhi CJP Protest LIVE Updates: सीजेपी आज पुन्हा जंतरमंतरवर धडकणार, अजिंक्य शिंदे करणार नेतृत्त्व
Rahul Gandhi: 'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
'मोगॅम्बो' मोदींनी लोकशाही आणि देशातील तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त केलं; राहुल गांधींचा सडकून प्रहार, म्हणाले, मोदी अस्तित्वासाठी लढत आहेत, गेल्या 15 वर्षांचा खेळ संपला
Neha Bora CJP Protest Delhi: दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्ली पोलिसांचं लाजीरवाणं कृत्य, नेहा बोराला पकडताना पोलीस कर्मचाऱ्याने काय केलं? व्हिडीओ व्हायरल
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
दिल्लीत सीजेपीच्या मुंबई समन्वयकास मारहाण; प्रणय अहिरे रुग्णालयात दाखल, सीजेपी म्हणाली, लोकशाहीचा आवाज दाबता येणार नाही
Kolhapur News: प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
प्रेयसीचं लग्न ठरलं, प्रियकरानं अपहरण करून दरीत ढकललं; प्रेयसी जागीच ठार, कोल्हापूर जिल्ह्यातील घटनेनं थरकाप
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
तुषार गांधींना एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या ठाण्यात नेलं; आदित्य ठाकरेंचा इशारा, अखेर 8 तासांनी सुटका
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
दिल्लीत लाॅकडाऊन, तब्बल 38 हजार सशस्त्र पोलिसांच्या फौजाच फौजा, तरीही CJP, जेनझी, वकिल, विद्यार्थी संघटनांचा ज्ञानेश कुमारांविरोधात वणवा पेटला; तीन माजी सीएमसह तब्बल 4 हजार जणांना छावण्यांमध्ये डांबलं
Embed widget