Maharashtra Covid-19 Updates: महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 845 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, 17 जणांचा मृत्यू
Maharashtra Covid-19 Updates: महाराष्ट्रात गेल्या काही दिवासांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे.
Maharashtra Covid-19 Updates: महाराष्ट्रात गेल्या काही दिवासांपासून कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. राज्यात आज (रविवार, 21 नोव्हेंबर) 845 नव्या कोरोनाबाधित आढळून आले. तर, 17 जणांच्या मृत्युची नोंद झालीय. याशिवाय, 730 रुग्णांनी आज कोरोनावर मात केलीय. महाराष्ट्र कोरोनामुक्तच्या दिशेनं वाटचाल करीत असल्याचं या आकड्यातून स्पष्ट होतंय. राज्यात सध्या एकूण 9 हजार 799 रुग्ण सक्रीय आहेत. राज्यातील नागरिकांसाठी ही अतिशय दिलासादायक माहिती आहे.
महाराष्ट्राला कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला रोखण्यास मोठं यश आलंय. या काळात डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांसह फ्रंटलाईन वर्कर्सनं मोलाचा वाटा उचललाय. ज्यामुळं राज्यातील रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होऊ लागलीय. राज्यात आज 845 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झालीय. तर, 17 रुग्णांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागलाय. सध्या राज्यातील मृत्युदर 2.12 टक्के एवढा झालाय. राज्यात आजपर्यंत 6 कोटी 46 लाख 87 हजार 403 जणांचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी 66 लाख 29 हजार 875 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. राज्यात सध्या 97 हजार 482 रुग्ण होम क्वारंटाईन आहेत. तर, 1 हजार 19 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.
मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या-
मुंबईत गेल्या 24 तासात 213 नवे रुग्ण आढळून आले. तर, 3 जणांचा मृत्यू झालाय. याशिवाय, 281 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. मुंबईतील कोरोनामुक्तांची एकूण संख्या 7 लाख 39 हजार 707 वर पोहचलीय. महत्वाचं म्हणजे, बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्क्यावर गेलाय. मुंबईत सध्या 2 हजार 577 रुग्ण सक्रीय आहेत. तसेच रुग्ण दुप्पटीचा दर 2 हजार 403 दिवसांवर पोहचलाय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-