Coronavirus | राज्यात कोरोनाचा विळखा वाढतोय; आज विक्रमी 4814 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद!
राज्यात आज विक्रमी 4 हजार 814 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली तर 3 हजार 661 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान, कोरोना संसर्गाचा विळखा राज्यात वाढताना दिसत आहे.
मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे. राज्यात आज विक्रमी 4 हजार 841 नवीन कोरोना बाधितांची नोंद झाली आहे. परिणामी राज्यातील कोरोना बाधितांची संख्या दीड लाखांच्या उंबरठ्यावर जाऊन पोहोचली आहे. राज्यातील एकूण रुग्ण संख्या आता 1 लाख 47 हजार 741 अशी झाली आहे. आज 3 हजार 661 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 77 हजार 453 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या 63 हजार 343 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात 192 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत 6 हजार 931 लोकांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात सलग दुसऱ्या दिवशी साडेतीन हजारांपेक्षा जास्त रुग्णांना घरी सोडण्यात आलं आहे. 3 हजार 661 करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यात मुंबई मंडळातील मुंबई मनपा, ठाणे, पालघर, रायगड या चार जिल्ह्यात सर्वाधिक 2844 रुग्ण घरी सोडणयात आले आहे. कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर राज्यात 29 मे रोजी राज्यात एकाच दिवशी 8381 रुग्णांना घरी सोडण्यात आले होते. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सातत्याने बरे होणाऱ्या रुग्णांचा आलेख वाढत असून सुमारे 15 दिवसानंतर 15 जून रोजी 5071 इतके रुग्ण बरे होऊन एकाच दिवशी घरी सोडण्यात आले होते. त्यानंतर दहा दिवसांच्या अंतराने 24 जून रोजी एकाच दिवशी 4161 एवढ्या विक्रमी संख्येत करोनाच्या बरे झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले होते.
राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय; 28 जूनपासून राज्यात सलून उघडण्यास परवानगी
कोरोनाचा विळखा वाढतोय राज्यात आज साडेतीन हजारपेक्षा जास्त रुग्णांना घरी सोडण्यात आले असले तरी कोरोना रुग्णांची संख्या देखील वेगाने वाढताना दिसत आहे. मुंबईसह ठाणे, रायगडमध्ये आतापर्यंत 107714 रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे विभागात 21346 कोरोना संक्रमित रुग्ण आहेत. तिकडे नाशिक विभागात 6935 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. औरंगाबाद विभागातही 2384 जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर कोल्हापूर विभागातही 1813 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. विदर्भातील नागपूर विभागात 1740 लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्याची नोंद आहे. लातूर विभागात 837 जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.
Rajesh Tope PC | आशा सेविकांना एक तारखेपासून तीन हजार रुपये मानधन मिळणार - आरोग्यमंत्री राजेश टोपे