Rajya Sabha Election 2022: मतमोजणीला एक तासाचा विलंब शक्य, भाजपच्या तक्रारीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडून दखल
Maharashtra Rajya Sabha Election : जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकुर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती.
मुंबई: राज्यसभेच्या निवडणुकीची मतमोजणीला एक तासाचा विलंब होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे तीन मतं अवैध ठरवावीत अशी भाजपने केलेल्या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली आहे. भाजपने राज्यसभेच्या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकुर आणि सुहास कांदे यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपने केली होती.
राज्यसभेसाठी मतदानाची प्रक्रिया 3.30 च्या दरम्यानच पूर्ण झाली. एकूण 285 आमदारांनी मतदान केलं. चार वाजता मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार होती. दरम्यान, भाजपकडून या निवडणूक प्रक्रियेवर आक्षेप घेण्यात आला. जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकुर आणि सुहास कांदे यांचे अवैध ठरवावे अशी मागणी भाजपकडून करण्यात आली. भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला एक पत्र लिहीत तशी तक्रार घेतली.
भाजपने केलेल्या या तक्रारीची दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. त्यामुळे सध्यातरी मतमोजणीची प्रक्रिया रखडली असून अजून त्याला एक तासाचा विलंब होणार असल्याची माहिती आहे.
सर्वच पक्षांकडून जल्लोषाची तयारी सुरू
दरम्यान, शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांनी आपणच निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला आहे. तर सर्व पक्षांनी विजयाचा जल्लोष करण्याची तयारी सुरू केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन बुके मागवण्यात आले आहेत.