एक्स्प्लोर

Maharashtra Rains Live Updates : लातूरसह नांदेडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी

Maharashtra Rains Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे.

Key Events
Maharashtra Rains Live Updates 4 July 2022 rain in Pune, Satara and Dhule including Mumbai Maharashtra Rains Live Updates : लातूरसह नांदेडमध्ये मुसळधार पावसाची हजेरी
Maharashtra Rains Live

Background

Maharashtra Rains Live Updates : सध्या राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र, राज्यातील काही ठिकाणी पावसानं हजेरी लावली आहे. तसेच देशातील विविध भागात देखील दमदार पाऊस पडत असताना दिसत आहे. देशातील कर्नाटक, केरळसह राजधानी दिल्लीत पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. तर राज्यातील मुंबईसह ठाणे, पुणे, सातारा, धुळे, लातूर या परिसारत पाऊस झाला आहे. दरम्यान, येत्या तीन दिवसांत राज्याच्या विविध भागात विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रासह घाट परिसरात, काही भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. 

राज्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी, काही ठिकाणी मुसळदार पावसामामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावासाचा खूप मोठा फटका बसला आहे. अनेक ठिकाणी शेती पिकं वाया गेली आहेत. तर काही ठिकाणी जमिनी खरवडून गेल्या आहेत. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यात जवळपास आठ लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकाचे नुकसान झाले आहे.

धुळे पाऊस

धुळे  जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. पिके सडण्याचा धोका वाढला आहे, मात्र अद्यापही शासनाकडून पंचनामे सुरू करण्यात आलेले नसल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात आत्तापर्यंत सरासरीच्या तुलनेत 103 टक्के पाऊस झाला असून साक्री तालुक्यात  सर्वाधिक पावसाने हजेरी लावली आहे. तर शिंदखेडा तालुक्यात आणि शिरपूर तालुक्यात पावसाची अत्यंत कमी हजेरी लागली आहे. शिंदखेडा तालुक्यातील नरडाणा चिमठाणे तर शिरपूर तालुक्यातील जवखेडा होळनाथे मंडळात अत्यल्प पाऊस झाला आहे. या भागात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचे प्रमाण वाढल्याने पिके करपू लागली आहेत. साक्री तालुक्यात जास्त पाऊस झाल्याने शेतात पाण्याचा निचरा होत नसल्याने पिके सडण्याचा धोका वाढला आहे. 

धुळे जिल्ह्यातील 39 मंडळांपैकी 16 मंडळात 100 टक्क्यांपेक्षा अधिक साक्री तालुक्यात दोन मंडळात 200 टक्क्यांपेक्षा जास्त तर पाच मंडळात 70 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. साक्री तालुक्यात जवळपास 418 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असून शेतात पाणी शिरल्याने कापूस, तूर, मका, ज्वारी, बाजरी आदी पिके सडण्याचा धोका वाढला आहे. 

15:00 PM (IST)  •  04 Aug 2022

आजपासून पुढील पाच दिवस राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज

Rain : आजपासून राज्यात पुढील पाच दिवस चांगल्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. 

09:54 AM (IST)  •  04 Aug 2022

लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस, गावातील रस्त्यांना नदीचं स्वरुप

तुगाव येथे ढगफुटी तर हालसी येथे जोरदार पाऊस ...गावातील रस्त्यांना आले नदीचे रूप ...प्रत्येक गल्लोगल्ली वाहत होते पाणी 

Latur Rain : तुगावं हे कर्नाटकातील गाव तर हालसी हे महाराष्ट्रातील गाव. या दोन्ही गावांच्या मधून मांजरा नदी वाहते. काल संध्याकाळी या भागात दीड तास पावसानं कहर केला. कर्नाटकातील तूगाव येथे कधी नव्हे ते असा पाऊस झाला. 10 हजार लोकसंख्या असलेल्या गावात कधीच शेत शिवारात पाणी आलं नव्हते. मात्र, आता गावातील प्रत्येक रस्त्याला ओढ्याचे रुप आले आहे. गावातील रस्त्यावरुन पाणी वाहत होते. गावातील प्रत्येक रस्ता हा नदीसारखा वाहत होता. यावरुन पावसाचा जोर लक्षात येतो. या गावाच्या शिवारातील सोयाबीन पीक वाहून गेलं आहे. दुबार पेरणीही शक्य नाही कारण पाण्याबरोबर माती खरवडून गेली आहे. तुफान पाऊस चालू असताना वीजही गायब झाली होती. तूगाव येथे ढगफुटी सारखा पाऊस पडला आहे. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली

व्हिडीओ

Solapur Mahapalika Election : भाजप उमेदवाराच्या मुलाकडून पैसे वाटप? धक्कादायक व्हिडीओ समोर
Ram Kadam BJP : ठाकरे बंधुंनी मराठी माणसाचा ठेका घेतलाय का? राम कदम यांची टीका
Ravindra Dhangekar Pune : पुणे शहराचा डान्सबार होऊ देणार नाही, धंगेकरांची भाजपवर टीका
Padu EVM : ईव्हीएमला बॅकअप म्हणून पाडू मशीन गरज लागली तर वापरणार, निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण
Mumbai Mahapalika Candidate : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 1700 उमेदवार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
ट्रम्प टॅरिफच्या तुघलकी फतव्यावर आज 'सर्वोच्च' फैसला! निकाल विरोधात गेल्यास अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार; ट्रम्प म्हणाले, 'तर अमेरिका..'
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
धावत्या पॅसेंजर ट्रेनच्या तीन डब्यांवर तब्बल 65 फूट उंचीवरील पुलावरून क्रेन कोसळली; 25 जणांचा भयावह अंत, 80 जखमी, बहुतेक प्रवासी शाळकरी विद्यार्थी
BMC Election 2026: मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
मतदानाला अवघे काही तास उरले, संजय राऊतांची मराठी मतदारांना भावनिक साद, म्हणाले, 'एक आहे तर सेफ आहे'
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
'बार डान्सर तुम्ही स्टेजवर घेऊन येता ..' दिपाली सय्यदने वाक्य उच्चारताच राधा पाटील संतापली, बिग बॉसच्या घरात दुसऱ्याच दिवशी दोघींमध्ये जुंपली
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
ड्रग्जमध्ये पिढी बर्बाद होतेय, 7 महिन्यात 93 मुली गायब, मुंबई रेल्वे अपघातात 26500+ मृत्यू, ते का दिसत नाही? हीच का आमच्या जीवाची किंमत? अमित ठाकरेंनी फडणवीसांचा 11 वर्षातील पाढाच वाचला
Nana Patole On Washim News: 'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
'कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक...', वाशीममध्ये अधिकाऱ्याने शेतकऱ्याला बुटाने मारलं, घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पटोलेंना संताप
Bigg Boss Marathi 6: गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
गेमच फिरला! पॉवर कीसाठी करणसमोर गयावया, शेवटी पाया पडली पण..; रुचिताला गेम भारी पडला, नॉमिनेशनला जाणार सामोरी?
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
सिंचन घोटाळ्यापेक्षाही दहापट मोठा घोटाळा महामार्गांच्या कामांमध्ये झालाय; अधिकारी, पुढारी आणि कॉन्ट्रॅक्टर या तिघांच्या संगनमताने महाराष्ट्राला प्रचंड लुटलंय; विजय पांढरेंचा गंभीर आरोप
Embed widget