पुढील 48 तासांत मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यालाही झोडपणार
Maharashtra Weather Forecast Today : पुढील 48 तासात मुंबईसह कोकणात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यालाही पाऊस झोडपणार आहे.
मुंबई : राज्यात पुढील काही तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आला आहे. भारतील हवामान विभागाच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज मुंबई, ठाणेसह कोकणात दिवसभर उकाडा जाणवला असला, तरी पुढील काही तासात पावसाची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची रिपरिप पाहायला मिळू शकते. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 28 आणि 29 मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आल्याने नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे आहे. 29 मे रोजी कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचंही हवामान खात्याने सांगितलं आहे.
काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा
दरम्यान, राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये आज नागरिकांना उष्णतेची लाट आणि दुष्काळाचा सामना करावा लागणार आहे. काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आला आहे. धुळे, जळगाव, अकोला, अमरावती या जिल्ह्यांतील नागरिकांना उष्णतेच्या तीव्र लाटेचा सामना करावा लागला आहे. या जिल्ह्यांना हवामान खात्याने उष्णतेचा यलो अलर्ट जारी केला आहे.
#हवामानअंदाज
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 28, 2024
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज तर उद्या (२९) रोजी कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. #WeatherUpdate pic.twitter.com/vhyWRDSWCI
विदर्भात अनेक जिल्ह्यात तापमान 40 अंशांच्या पुढे
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे सोमवारी 47.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, जे राज्यातील सर्वाधिक तापमान आहे. मंगळवारीही या भागातील तापमान सारखेच होते. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे. आयएमडीने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, ब्रह्मपुरी शिवाय राज्याच्या विदर्भातील अनेक ठिकाणी कमाल तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याची नोंद झाली आहे.
Extreme rains in North East...
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) May 28, 2024
TC pl https://t.co/PQi3o909xK
महत्त्वाच्या इतर बातम्या :