Maharashtra Rain : महाराष्ट्रात आज पावसाचा 'यलो अलर्ट', वाचा हवामान विभागाचा अंदाज
Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं (Rain) दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागातच पावसानं हजेरी लावली आहे.
Maharashtra Rain : राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसानं (Rain) दडी मारल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. काही भागातच पावसानं हजेरी लावली आहे. जुलै महिन्याचा पंढरवाडा संपला तरी म्हणावा सता पाऊस न झाल्यामुळं शेतकरी चिंतेत आहेत. दरम्यान, मुंबईसह उपनगर ठाणे, कोकण विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या अंदाजानुसार, पुढचे तीन ते चार दिवस राज्यात पावसाची शक्यता आहे.
या भागात पावसाचा यलो अलर्ट
हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज महाराष्ट्रात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. बहुतांश जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भासह उत्तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. सोलापूर, सातारा, नाशिक, नंदूरबार, ठाणे आणि पालघर हे जिल्हे वगळत अन्य सर्व जिल्ह्यात आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत जोरदार पाऊस
मुंबईत सध्या जोरदार पाऊस पडत आहे. मुंबईसह उपनगर ठाणे परिसरात चांगला पाऊस झाला. या पावसामुळं सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळं काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम देखील झाल्याचं पाहायल मिळालं. त्याचबरोबर अकोला जिल्ह्यातही (Akola) चांगला पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झालेत. तर अनेक नदी नाल्यांना पूर आला. अकोला शहरातील शारदानगर, पार्वतीनगर, गुरुदत्तनगर, मेहरेनगर, रेणुकानगरातील घरांमध्ये नाल्याचे पाणी शिरले होते. या भागातील जवळपास 250 पेक्षा अधिक घरांना पाण्यानं वेढलं होतं.
पाऊस नसल्याने मराठवाड्यात विदारक परिस्थिती
यंदा पाऊस नसल्याने मराठवाड्यात अत्यंत विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. पुर्ण जुन महिना गेला. जुलै अर्धा लोटला तरी पाऊस पडत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळं मराठवाड्यात तब्बल 44 टक्के पेरण्या बाकी आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्या देखील पावसाअभावी हातून जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याच्या काही भागात चांगला पाऊस (Rain) पडत आहे. तर काही ठिकाणी पावसानं दडी मारली आहे. ज्या ठिकाणी चांगला पाऊस झालाय, त्या ठिकाणी पेरणीच्या (Sowing) कामांना वेग आला आहे. तर जिथं अद्याप कमी पाऊस झालाय, त्या ठिकाणी पेरण्या खोळंबल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
Yavatmal Rain : यवतमाळमधील नेर तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस, जमिनी गेल्या खरवडून; शेती पिकांचं मोठं नुकसान