एक्स्प्लोर

राज्यात अवकाळी पावसाचे ढग गडद, कुठं आणि कधी पडणार पाऊस?

राज्यात अवकाळी पावसाची (Rain) शक्यता वर्तवली जात आहे. जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी हवामानाच्या संदर्भात सविस्तर माहिती एबीपी माझाला दिली आहे.

Maharashtra Weather : सध्या राज्यातील काही भागात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळं अवकाळी पावसाची (Rain) शक्यता वर्तवली जात आहे. जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikrao Khule) यांनी हवामानाच्या संदर्भात सविस्तर माहिती एबीपी माझाला दिली आहे. राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नेमकी ही स्थिती का झाली आहे, यासंदर्भातील माहिती देखील खुळे यांनी दिली आहे.  

महाराष्ट्राच्या एकूण  23 जिल्ह्यात ढगाळ वातावरण

मुंबईसह कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापर्यंतच्या सर्व 7 आणि खान्देश, नाशिकपासून ते सोलापूर पर्यंतच्या मध्य महाराष्ट्रातील सर्व 10 तसेच धाराशिव लातूर नांदेड यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अश्या महाराष्ट्राच्या एकूण  23 जिल्ह्यात कार्तिक एकादशी दरम्यान 23 ते 24 नोव्हेंबर केवळ ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी  किरकोळ पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

25 26 आणि 27 नोव्हेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता

माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार ते सोमवार, म्हणजे 25 26 27 नोव्हेंबर दरम्यानच्या तीन दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातला त्यात रविवार 26 नोव्हेंबर (कार्तिक पौर्णिमे) ला पावसाचे वातावरण अधिक गडद होणार आहे. खान्देश, नाशिक, नगर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अकोला, या जिल्ह्याच्या क्षेत्रात मात्र मुसळधार पावसाची शक्यता अधिक जाणवते. मुंबईसह कोकणात ह्या पावसाळी वातावरणाचा प्रभाव मात्र अधिक असुन कालावधी तीन दिवसाचाच जाणवतो. 

अवकाळी पावसाचे नेमके कारण काय? 

तामिळनाडूतील कन्याकुमारी ते आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्याच्या किनारपट्टीसमोर बंगालच्या उपसागरात समुद्रसपाटीपासून तीन किमी उंचीपर्यंत जाडीच्या हवेच्या कमी दाब क्षेत्राचा पसरले आहे. तसेच 15 डिग्री अक्षवृत्तादरम्यान पूर्वेकडून येणाऱ्या तामिळनाडू आणि केरळ राज्यावरून पश्चिमकडे वाहणाऱ्या जबरदस्त  पुर्वी वारा झोता  तून वाहणाऱ्या हिवाळी मोसमी वाऱ्यामुळे चक्रीय वाऱ्याच्या स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं तामिळनाडू  आणि केरळ राज्यात सध्या भरपूर पाऊस पडत आहे. ही प्रणाली भू -भाग ओलांडून पुन्हा अरबी समुद्रात उतरून महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टी समांतर उत्तरेकडे आगेकूच करत आहे. तिथून गुजराथ राज्य कव्हर करून उत्तर महाराष्ट्रात 26 नोव्हेंबर दरम्यान डांगी परिसरातून उतरणार आहे. त्यामुळं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
                         
माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, 25 नोव्हेंबरला वायव्य उत्तर भारतात आदळणाऱ्या पश्चिमी झंजावाताचा परिणाम थेट मध्य प्रदेश, गुजराथमधून उत्तर महाराष्ट्रापर्यंत होणार आहे. यामुळं या दोन्हीही प्रणल्यांचा एकत्रित परिणाम महाराष्ट्रावर 23 ते 27 नोव्हेंबरच्या पाच दिवसाच्या पावसाळी वातावरणावर होणार आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या एक -दोन दिवसात चक्रीय वाऱ्याच्या स्थिती आणि कमी दाब क्षेत्रातून बंगालच्या उपसागरात पुन्हा एखाद्या चक्रीवादळाची बीज रोवण्याची शक्यता आहे. त्यामुळं डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात चक्रीवादळची स्थिती आहे.  

महत्त्वाच्या बातम्या:

Weather : रब्बी पिकांना वरदान मिळणार का? कार्तिक एकादशी ते पौर्णिमा कसं असेल राज्यातील वातावरण; जाणून घ्या सविस्तर माहिती एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार  कोण?Zero Hour Sanjay Raut : 'तो' आरोप राऊतांना महाग पडला? दुसरी जेलवारी थोडक्यात टळली?Zero Hour Malvan Statue : मालवणमधील शिवरायांचा पुतळा कसा कोसळला? कारणं काय? आरोपी नेमकं कोण?Zero Hour Case Guest Center : संजय राऊतांवर अब्रुनुकसाना खटला दाखल करण्याची गरज होतीच - दमानिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
शिर्डीच्या साईबाबांना चकाकणाऱ्या मुकूट अर्पण करण्याची 'सुवर्ण' इच्छा पूर्ण, महिला भक्त भावूक
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
मोठी बातमी! मोदी सरकारकडून कामगारांना मिळालं मोठं गिफ्ट, किमान वेतन दरात केली वाढ 
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
Embed widget