एक्स्प्लोर

पुढील चार दिवस पावसाचा जोर कमी होणार, पण 1 ऑगस्टपासून पुन्हा मुसळधार पडणार, वाचा हवामानाचा अंदाज

पुढील चार दिवस म्हणजे 28 ते 31 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे ( Manikrao Khule) यांनी दिली आहे.

Maharashtra Rain News : राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, यापुढे हवामान कसं राहणार आहे. कुठं कुठं पाऊस पडणार आहे? याबाबतची माहिती जेष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितली आहे. पुढील चार दिवस म्हणजे 28 ते 31 जुलैपर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याची माहिती माणिकराव खुळे ( Manikrao Khule) यांनी दिली आहे. संपूर्ण मराठवाडा तसेच नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा 15 जिल्ह्यात जोरदार तीव्रतेच्या पावसाची शक्यता कमी आहे. केवळ मध्यमच पावसाची शक्यता असल्याचे खुळे म्हणाले. 1 ऑगस्टपासून या जिल्ह्यांमध्ये पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असल्याचे ते म्हणाले.

मराठवाड्यात काय स्थिती?

मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात तर केवळ मध्यम पावसाची शक्यता आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 3 ऑगस्टपर्यंतही टिकून राहू शकते, असे जाणवते. छत्रपती संभाजीनगर, जालना हिंगोली या तीन जिल्ह्यात तर सध्या पेरपिके जरी ठिक वाटत असली तरी जोरदार अशा पावसाची शक्यता आहे.  ऑगस्ट मधील मान्सूनचे वर्तनच येथील भवितव्य ठरवेल, असे वाटते. 

नंदुरबार धुळे जळगांव सहित संपूर्ण विदर्भातील 14 जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता

नंदुरबार धुळे जळगांव सहित संपूर्ण विदर्भातील अशा एकूण 14 जिल्ह्यात उद्यापासून आठवडाभर म्हणजे शनिवार दिनांक 3 ऑगस्टपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम आहे. 

मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात अतिजोरदार पावसाची शक्यता

मुंबईसह कोकणातील 7 जिल्ह्यात अतिजोरदार पावसाच्या शक्यतेला अजुन वातावरणीय उतरतीचा धक्का लागलेला नाही. त्यामुळं तिथं पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील जायकवाडी व इतर लघु-प्रकल्पातील धरणे वगळता ह्या आठवड्यात जलआवकेच्या सातत्यातून महाराष्ट्रातील सर्व धरणात जलसंवर्धनातून जलसाठा वाढीची टक्केवारी शतकाकडे झेपावत आहे. काही ठिकाणी धरणे ओसंडून वाहत आहेत. जुलैत आतापर्यंत तीन आठवडे ओढ दिलेल्या मान्सूनने जुलै अखेरात महाराष्ट्रासाठी ह्यावर्षी आपल्या वर्तनातून वेगळेच असे हे वैशिष्ठ दाखवून दिले आहे. 

मराठवाड्यातील लघु प्रकल्प व जायकवाडीत समाधानकारक साठा करणाऱ्या, तसेच महाराष्ट्रातील शेतजमिनीची पूर्णपणे भूक शमवणाऱ्या व विहीरींना पाणी-पाझर फोडणाऱ्या जोरदार पावसाची संपूर्ण महाराष्ट्राला अजूनही प्रतिक्षा आहेच. कदाचित शेतकऱ्यांना ऑगस्ट अखेरपर्यंत ह्यासाठी वाट पहावी लागू शकते. यासाठी ऑगस्ट महिन्यातील मान्सूनचे वर्तन महत्वाचे समजावे. 

महत्वाच्या बातम्या:

Vidarbha Rain Update : नुसता धो धो !गोसीखुर्द धरणाचे सर्व 33 दरवाजे उघडले; मुसळधार पावसाची विदर्भात दाणादाण  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?Vinod Kambli Sachin Tendulkar : सचिनच्या डोक्यावर फिरवला मायेचा हात, विनोदचा भावनिक क्षणVinod Kambli Raj Thackeray : दोन मिनिटं थांबले, राज ठाकरे विनोद कांबळींना आवर्जून भेटले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget