एक्स्प्लोर

Maharashtra Rain Update : गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर‍, आत्ताची स्थिती जाणून घ्या

पुढील दोन दिवस विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Key Events
Maharashtra Rain Live Updates: IMD predicts heavy rainfall for next week; northwest India expected to receive light showers Maharashtra Rain Update : गडचिरोली जिल्ह्यातील अनेक नद्यांना पूर‍, आत्ताची स्थिती जाणून घ्या
live_blog

Background

Maharashtra Rain Update : राज्यात पुढील दोन दिवस सर्वत्र वादळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. प्रामुख्याने कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात सर्वत्र जोरदार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार होत असलेल्या कमी दाबाचा क्षेत्रांमुळे पाऊस लांबला आहे. बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाची स्थिती तयार होत आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई, कोकण आणिविदर्भासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढणार आहे.  महाराष्ट्रासाठी पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचे असतील, असे कुलाबा येथील प्रादेशिक हवामान विभागाने सांगीतलय. तसचं अनेक ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवलाय.

सप्टेंबर मध्यानंतर राज्यासह देशभरातून मान्सून प्रामुख्यानं माघारी फिरत असतो मात्र यावर्षी सप्टेंबर अखेर उजाडणार असल्यानं राज्यात चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाचा  इशारा देण्यात आला आहे. याशिवाय पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

कोकणात पुढील दोन दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. आज संपूर्ण कोकणासाठी यलो अलर्ट जारी, 64 मिमी ते 115 मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर कोकणात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. तर  पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या चारही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात विजांसह मुसळधारेचा अंदाज

मध्य महाराष्ट्रात घाट परिसरात विजांसह मुसळधारेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  पुणे, नाशिक, साताऱ्यातील घाट माथ्यावर चांगल्या पावसाचा अंदाज आहे.तर  सोलापूर, नंदुरबार, धुळे, जळगावमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या ठिकाणी यलो अलर्ट जारी केला आहे.

मराठवाड्यात धरणं 100 टक्के भरली

परतण्यापूर्वी पावसानं राज्यभरात धुवांधार बँटिंग सुरु केली आहे. अशातच यंदा झालेल्या पावसामुळं मराठवाड्याची पाण्याची चिंता मिटली आहे. मराठवाड्यातील सर्व धरणं तुडुंब भरली आहेत. 

16:27 PM (IST)  •  22 Sep 2021

गडचिरोली जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल

गडचिरोली जिल्हयातील पूर‍ स्थितीबाबत संक्षिप्त अहवाल

1. वैनगंगा नदी : 
गोसीखुर्द धरणाचे 33 पैकी 29 गेट 0.50 मी. ने उघडलेले असुन 3412 क्युमेक्स विसर्ग सुरु आहे. 
वैनगंगा नदी काठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.
चिचडोह बॅरेज चे 38 पैकी 38 गेट उघडलेले असुन विसर्ग 7866 क्युमेक्स आहे. 
इटियाडोह प्रकल्प - 72.23% / कालवा- बंद / वेस्ट वेअर ओवरफ्लो- निरंक
नदीची पाणी पातळी पवनी, वडसा, वाघोली व आष्टी सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे. 

2. वर्धा नदी :
निम्न वर्धा प्रकल्पाचे 31 पैकी 3 गेट उघडलेले असुन विसर्ग 84 क्युमेक्स आहे. 
बामणी (बल्हारशा) व सिरपूर/सकमूर सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या खाली आहे. 

3. प्राणहिता नदी : 
दिना प्रकल्प – 97.11% / कालवा- बंद / वेस्ट वेअर ओवरफ्लो- निरंक
प्राणहिता नदीची पाणी पातळी  महागांव व टेकरा सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे.

4. गोदावरी नदी :
लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) चे 85 पैकी 24 गेट उघडलेले असुन विसर्ग 5643 क्युमेक्स (1,99,300 क्युसेक्स) आहे. 
गोदावरी नदी काठावरील गावांतील नागरीकांनी उचित सतर्कता बाळगावी.
गोदावरी नदीची पाणी पातळी कालेश्वरम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे. 

5. इंद्रावती नदी :
इंद्रावती नदीची पाणी पातळी जगदलपूर, चिंदनार व पाथागुडम सरीता मापन केंद्रावरील नोंदीनुसार इशारा पातळीच्या खाली आहे. 

पर्लकोटा नदीची पाणी पातळी भामरागड सरीता मापन केंद्रावरील सकाळी 8.30 वाजताच्या  नोंदीनुसार पूलाच्या 2.95 मी. ने खाली आहे. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक

व्हिडीओ

KDMC Shiv Sena VS BJP : फोडाफोडीला उधाण, कुणाचं कल्याण? सेना-भाजपत रस्सीखेच? Special Report
Mumbai Mayor : मुंबईचा महापौर कुणाच्या जीवाला घोर? पडद्यामागे कोणाची कुणाशी चर्चा Special Report
Silver Rate Hike : चांदीचे दर वाढण्याची नेमकी कारणं काय? चांदी दर तीन लाख पार.. Special Report
Thane Mahapalika Mayor : बहुमत जोरदार पण कोण 'ठाणे'दार? भाजप-सेनेत वाद पेटणार? Special Report
Snehal Shivkar :'पतीच्या समाजसेवेच्या कामामुळे यश', रिक्षाचालकाची पत्नी ठाकरेंच्या सेनेची नगरसेविका

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा, संघाला चांगला ऑलराऊंडर मिळेल, इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
भारतानं मालिका गमावली पण टीममधील या खेळाडूला सपोर्ट करावा,इरफान पठाण यानं कोणाचं नाव घेतलं?
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
RBI : रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, महाराष्ट्रातील 'या'अर्बन सहकारी बँकेला 1 लाखांचा दंड, कारण समोर
Bihar Bhavan in Mumbai : बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? मराठी अस्मितेचं काय होणार?
बिहार सरकार मुंबईत 'बिहार भवन' कसं बांधणार? त्यासाठी कायदा काय सांगतोय? 
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
अभिनेते मनोज तिवारींच्या मुंबईतील बंगल्यात चोरी, घरातून 6 लाख चोरले;आरोपीला अटक
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बारामतीत पंचविशीतील अज्ञात महिलेवर अत्याचार करून निर्घृण पद्धतीनं संपवलं; मृतदेह माळरानात सापडल्याने तालुक्यात खळबळ
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
बाबा सिद्दिकी सारखीच तुमची हत्या करू, नवनीत राणांना जीवे मारण्याची धमकी; पोलिसांत फिर्याद दाखल
पवारांनी ते सत्तेत की विरोधात एकदा सांगावं, पुणे पिंपरीच्या निवडणुकीत त्यांना कात्रजचा घाट दाखवला गेला, लक्ष्मण हाकेंची टीका
बारामतीच्या लोकांनी आग्रह केल्यास इथून विधानसभा लढणार, लक्ष्मण हाकेंची घोषणा, पवारांविरोधात बारामती विकास आघाडी स्थापन
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नितीन नबीन बिनविरोध; निवडणूक प्रकियेतून विजय, कोण आहेत नवे अध्यक्ष?
Embed widget