एक्स्प्लोर
कोल्हापुरी चपलांना GI मानांकन, कारागिरांच्या प्रयत्नांना यश
कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलांना GI मानांकन आणि त्याचे पेटन्ट मिळावे यासाठी कोल्हापुरातील चर्मकार समाज गेल्या कित्येक वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करत होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे.
कोल्हापूर : कोल्हापूरची शान असलेल्या कोल्हापुरी चपलांना GI मानांकन आणि त्याचे पेटन्ट मिळावे यासाठी कोल्हापुरातील चर्मकार समाज गेल्या कित्येक वर्षांपासून केंद्र आणि राज्य सरकारकडे मागणी करत होता. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे. परंतु या जीआय मानांकनामध्ये कोल्हापूरसोबतच कर्नाटकचा समावेश केल्याने कोल्हापुरातील संत रोहिदास चर्मोद्योग आणि चर्मकार विकास महामंडळाने नाराजी व्यक्त केली आहे.
महामंडळाच्या दाव्यानुसार कर्नाटकात बनवल्या जाणाऱ्या कोल्हापुरी चपला या बनावट आणि हलक्या प्रतीच्या असतात. त्यामुळे महामंडळाने वारंवार सरकारशी संपर्क करुन यासंबंधी माहिती दिली होती. परंतु सरकारने जीआय मानांकनात कर्नाटकचाही समावेश केल्यामुळे कोल्हापुरातील चर्मकार समाजातील सर्वच लोक व दुकान मालकांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यामध्ये कर्नाटकने केलेली घुसखोरी हाणून पाडण्यासाठी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
कोल्हापूरकरांची अस्मिता म्हणून कोल्हापुरी चपलांकडे पाहिले जाते. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापुरी चप्पल व्यवसायाला मोठे करण्यासाठी चर्मकार समाजाला मदत केली. जगात भारी कोल्हापुरी असणाऱ्या या कोल्हापुरी चप्पलने जगाला कोल्हापूरची ओळख करुन दिली. परंतु त्यावर आता कर्नाटकदेखील हक्क दाखवायला लागलं आहे.
पारंपरिक कोल्हापुरी विथ साऊथ इंडियन ट्विस्ट | घे भरारी | एबीपी माझा
कोल्हापूरी चप्पलवर कर्नाटक हक्क दाखवून जी घुसखोरी करत आहे ती वेळेतच हाणून पाडायला हवी. जर तसे करण्यात आपण अपयशी ठरलो तर कोल्हापूरी चप्पल कर्नाटकी चप्पल म्हणून ओळखली जाईल, अशी भीती महामंडळाने व्यक्त केली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
बातम्या
बीड
पुणे
Advertisement