एक्स्प्लोर

राज्याच्या राजकारणात नवा भूकंप, संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार? भाजप आमदाराच्या दाव्यानं खळबळ

Nitesh Rane on Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत 10 जून किंवा त्याआधीच राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप आमदाराच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.

Maharashtra Politics : शिवसेनेतील (Shiv Sena) बंडापासूनच राज्याच्या राजकारणात अनेक नाट्यमयी घडामोडी घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात आतापर्यंत अनेक भूकंप झाले आहेत. अशातच महाराष्ट्राच्या राजकारणात आता पुन्हा एकदा एक मोठा भूकंप होणार असल्याचा दावा एका भाजप (BJP) नेत्यानं केला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) 10 जून किंवा त्याआधीच राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश करणार असल्याचा दावा भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केला आहे. तसेच, संजय राऊत हे शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट होऊ देत नाहीत. उद्धव ठाकरेंना एकटं पाडण्याचा राऊतांचा कट आहे, असाही खळबळजनक आरोप नितेश राणेंनी राऊतांवर केला आहे. 

नितेश राणे म्हणाले की, "मुंबईच्या व्रजमूठ सभेआधी मी सांगितलं होतं की, बिकेसीमध्ये होणारी महाविकस आघाडीची शेवटची सभा आहे. परंतु, लोकांनी मला हलक्यात घेतलं. परंतु, काहीच दिवसांत महाविकास आघाडीकडून सभा रद्द करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. आता ते भाकीत जसं खरं ठरलं तसचं आता संजय राजाराम राऊत हे 10 जून किंवा त्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्याबाबत त्यांच्या बैठका झाल्या आहेत. तुम्ही संजय राऊत यांची भूमिका मागच्या काही दिवसातील पाहिली तर लक्षात येईल की, अजित पवार यांच्या विरोधात त्यांची भूमिका आहे. त्यांची अशी देखील मागणी आहे की, अजित पवार गेले की, मी पक्षात प्रवेश करेल."

संजय राऊत हे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट होऊ देत नाहीत : नितेश राणे 

"राष्ट्रवादीला त्यांनी हे देखील कळवलं आहे की, उद्धव ठाकरे याचं आता काही खरं नाही. एबीपी माझाच्या कार्यक्रमापूर्वी संजय राऊत शरद पवार यांच्याशी संपर्क साधत होते. परंतु, होऊ शकला नाही, म्हणून त्यांनी सिल्व्हर ओकला जाणं पसंद केलं. आता त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या घरात भांडणं लावली आहेत.", असं नितेश राणे म्हणाले. पवार यांच्या राजीनाम्याच्या दिवशी सर्वांनी फोन करून पवारांना विनंती केली की, तुम्ही राजीनामा देऊ नका. परंतु उद्धव ठाकरे यांनी त्यांचाशी संपर्क केला नाही. अशी माहिती होती की, उद्धव ठाकरे शरद पवार यांना भेटायला जाणार होते. परंतु, ते गेले नाहीत. किंबहुना संजय राऊत यांनी भेट घेऊ दिली नाही."

कर्नाटकात जाऊन राऊतांची काँग्रेसची दलाली : नितेश राणे 

कर्नाटकमध्ये संजय राऊत भाषणं करायला गेले होते. तिथं संजय राऊत काँग्रेसची दलाली करण्याचं काम करत आहे. तिथं महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार उभे आहेत, तिथं काँग्रेस उमेदवार त्यांच्या विरोधात आहे आणि तरीदेखील संजय राऊत काँग्रेसची दलाली करत आहेत, असंही नितेश राणे म्हणाले. 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, 19 तारखेला पंतप्रधान बदलणार; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, विखे पाटलांचही सडकून टीका
Who is Nitin Nabin: ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
ज्यांचं कालपर्यंत नाव कोणाला माहीत नाही, ओळखही नाही तेच आता थेट भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष! नितिन नबीन नेमके आहेत तरी कोण?
Kolhapur Municipal Corporation: आचारसंहिता लागण्यापूर्वीच कोल्हापूरच्या केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंकडून प्रस्तावावर सही
कोल्हापूर : आचारसंहिता लागण्यापूर्वीच केएमटी कर्मचाऱ्यांना घेतलं कायम सेवेत; एकनाथ शिंदेंची प्रस्तावावर सही
Embed widget