एक्स्प्लोर

मंत्रिमंडळ विस्तारावरुन मनसे आमदार राजू पाटील यांचा राज्य सरकारला खोचक सवाल, म्हणाले...

Maharashtra Politics : सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनी राज्य सरकारला मंत्रिमंडळ विस्तारावरुन घेरलं.

Maharashtra Politics : राज्यातील महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi) कोसळलं आणि राज्यात नवं सरकार स्थापन झालं. शिंदे-फडणवीस सरकार. शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी भाजपसोबत (BJP) एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केलं. सरकारचा शपथविधी होऊन तब्बल 38 दिवस उलटले मात्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मात्र पत्ताच नाही. सरकार स्थापनेचा दावा केल्यानंतर केवळ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी शपथ घेतली. असं असलं तरी उपमुख्यमंत्री फडणवीसांकडेही अद्याप कोणतंच खातं देण्यात आलेलं नाही. यावरुन विरोधकांकडून सरकारवर सातत्यानं आरोपांचे बाण सोडले जात आहेत. अशातच आता मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनीही मंत्रिमंडळ विस्तारावरुन सरकारवर निशाणा साधला आहे. बंड झाले आता थंड झाले? तुमचं सर्व ओके आहे हो, पण लोकांच्या समस्येकडे कोण बघेल? असा खोचक सवाल ट्वीट करत मनसेचे आमदार राजू पाटील यांनी विचारला आहे. 

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख पे तारीख सुरू असल्यानं सर्व स्तरातून टीका सुरू झाली आहे. केवळ विरोधकच नव्हे तर सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनीही आता सरकारला ट्विटरवरून खोचक सवाल विचारले आहेत. तुमचं सगळं ओके पण लोकांच्या समस्येकडे कोण पाहणार? असा प्रश्न राजू पाटील यानी विचारला आहे.

बंड झाले, आता थंड झाले? : राजू पाटील

शिंदे फडणवीस सरकारला महिनाभराचा कालावधी उलटला, मात्र अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नसल्यानं विरोधी पक्षांनी सरकारला लक्ष केलं आहे. त्या पाठोपाठ सरकारला पाठिंबा देणाऱ्या मनसे आमदार राजू पाटील यांनी देखील सरकारला ट्वीट करत जाब विचारला आहे. मनसे आमदार राजू पाटील यांनी ट्वीटमध्ये म्हटलंय की, "बंड झाले, आता थंड झाले? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचं पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल? असा सवालही ट्विटरवर ट्वीट करून राजू पाटील यांनी विचारला आहे. सरकारच्या बाजूनं मतदान करणाऱ्या मनसे आमदारांच्या ट्वीटमुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचवल्या आहेत. 

मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात?

आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) दिल्लीमध्ये आहेत. या दौऱ्यात  मात्र विस्ताराबाबत फायनल निर्णय होणार आहे. मंत्रिमंडळ विस्तार याच आठवड्यात होणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली आहे. या विस्तारात गृहमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे. तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हेही मंत्रिमंडळात असणार आहेत. पण विस्तारानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठी
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
धक्कादायक! रेल्वेचं अप्पर बर्थ सीट कोसळलं, खालचा प्रवासी ठार; रेल्वे मंत्रालयाचं स्पष्टीकरण
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
भटक्या कुत्र्यांचा हैदोस; बोईसरमध्ये एकाच दिवसात 26 जणांना चावला, निधीअभावी यंत्रणा सुस्त
Embed widget