एक्स्प्लोर

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकार मंत्रिमंडळाचा विस्तार 'या' दिवशी होणार?

Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार 12 किंवा 13 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Politics : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सगळ्यांचे लक्ष नव्या सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारावर लागले आहे. या नव्या सरकारच्या मंत्र्यांचा शपथविधी कार्यक्रम 12 किंवा 13 जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. त्यानंतर काही दिवसानंतर विधीमंडळाचे अधिवेशन होणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आधीच नवीन मंत्री आपला पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे. येत्या दोन दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. 

शिवसेनेत आतापर्यंतची सर्वात मोठी बंडाळी झाली आहे. शिवसेनेचे निष्ठावंत समजले जाणारे एकनाथ शिंदे यांनी पक्षाविरोधात बंड पुकारले. एकनाथ शिंदे यांनी पक्षात उभी फूट पाडत 40 आमदार आपल्या बाजूला वळवले आहेत. त्यानंतर या गटाने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेले  महाविकास आघाडी सरकार पाडले आणि भाजपसोबत सरकार स्थापन केले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले असून देवेंद्र फडणवीस हे नाट्यमयरीत्या उपमुख्यमंत्री झाले आहेत. त्यानंतर आता नव्या सरकारच्या शपथविधीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार 12 किंवा 13 जुलैला होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये येत्या दोन दिवसात खाते वाटपावर चर्चा होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही महत्त्वाची खाती शिंदे गटाला मिळणार आहे. भाजपकडे गृह, महसूल खाते जाण्याची शक्यता आहे. तर, शिंदे गटाकडे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम खाते जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. 

वर्ष 2014 ते 2019 दरम्यानच्या काळात भाजप-शिवसेना युतीच्या काळात गृह, महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खाते भाजपकडे होती. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गृह खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे, महसूल खाते काँग्रेसकडे, नगरविकास खाते शिवसेनेकडे होते. 

दरम्यान, याआधी समोर आलेल्या माहितीनुसार, भाजप आणि एकनाथ शिंदे गटातील चर्चेनुसार, दर 6 आमदारांमागे एक कॅबिनेट आणि राज्यमंत्रीपद दिले जाऊ शकते. सहा आमदारांमागे एक मंत्री या सूत्रानुसार भाजपला फायदा होणार आहे. भाजपला या सूत्रानुसार 28  मंत्रिपदे मिळणार आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

शिवसेनेचं 'धनुष्यबाण' आमचंच; 'या' बंडखोर आमदाराचा मोठा दावा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar Vs Sharad Pawar | संजय राऊतांची कोणती भूमिका पवारांना अमान्य? Rajkiy SholeDeva Thane : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर तोडक कारवाई, आत्मदहनाच्या इशाऱ्यामुळे मनपा पथक माघारीWadettiwar On Narendra Maharaj:नरेंद्र महाराजांवर टीका अनुयायांच्या रडारवर वडेट्टीवार Special ReportZero Hour | दिल्लीत डॉ. नीलम गोऱ्हेंचं विधान, मुंबईत शिवसैनिकांनी पेटवलं रान ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Artificial intelligence : एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
एआय आणि तंत्रज्ञान क्रांतीचे नेतृत्व महाराष्ट्र करेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
Ind vs Pak Abrar Ahmed : शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
शुभमनला जा जा जा करणाऱ्या अबरारवर संतापला पाकिस्तानी खेळाडू; म्हणाला...
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
उन्हाळा सुरू... 2 दिवसांत 4 जिल्ह्यात वाढणार तापमान; हवामान प्रादेशिक विभागाकडून खबरदारीची सूचना
Akola : अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
अकोल्यात रोडगे पार्टी जिवावर बेतली, मधमाशांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू, अनेकजण जखमी
Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
माणिकराव कोकाटेंना तात्पुरता दिलासा, पण अपात्रतेची टांगती तलवार कायम, न्यायालयात काय-काय घडलं?
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
लग्न जमेना, मराठवाड्यातील 30 वर्षीय युवकाने स्वत:च्याच शेतात संपवलं जीवन; कुटुंबीयांचा आक्रोश, सर्वत्र हळहळ
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
नैतिकतेच्या मुद्द्यावर धनंजय मुंडेंचा राजीनामा? शरद पवारांनी अजित दादांची री ओढली, पहिल्यांदाच प्रतिक्रिया
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
कुख्यात गज्या मारणेवर 5 व्यांदा मकोका अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांनी उचललं; उद्या कोर्टात हजर करणार
Embed widget