Ajit Pawar : कारण नसताना बदनामी, फडणवीसांच्या टीकेला अजित पवारांचा प्रत्युत्तर, म्हणाले....
महाविकास आघाडीच्या मोर्चावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
Ajit Pawar : राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. महाविकास आघाडीच्या मोर्चावर (Maha Vikas Aghadi Morcha) फडणवीसांनी टीका केली होती. फडणवीसांनी कालच्या मोर्चाला नॅनो मोर्चा असं म्हटलं होतं. याबाबत प्रसारमाध्यमांनी अजित पवारांना विचारलं असता, आम्ही त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्र्यांनी मोर्चाला नॅनो म्हणावं की स्कुटर म्हणावं हा त्यांचा विषय असल्याचे अजित पवार म्हणाले.
मोर्चात पैसे वाटप झाले नाहीत, कारण नसताना बदनामी
काल (17 डिसेंबर) मुंबईत महाविकास आघाडी आणि समविचारी पक्षांनी एकत्र येत मोर्चा काढला होता. या मोर्चावर देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. हा नॅनो मोर्चा असल्याचे फडणवीस म्हणाले होते. त्यांच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांच्या वक्तव्याला महत्त्व देत नसल्याचे अजित पवार म्हणाले. मी शेवटपर्यंत मोर्चात सहभागी झालो होतो. या मोर्चात पैसे वाटप झाले नाहीत. कारण नसताना बदनामी होत असल्याचे अजित पवार म्हणाले. बेताल वक्तव्याच्या विरोधात जनतेनं मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. या आवाहनाला प्रतिसाद देत लोक मोर्चात सहभगी झाले होते. महाविकास आघाडीसाठी आम्ही एकत्र येत असतोच. पण मोर्च्याच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो, त्यामुळं समाधानी असल्याचे अजित पवार म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना काय म्हणायचे आहे ते त्यांना म्हणू द्या, त्यांना लखलाभ असेही अजित पवार म्हणाले.
नेमकं काय म्हणाले होते फडणवीस?
जे व्हिडिओ बाहेर येत आहेत, ते लाजिरवाणे आहेत. मोर्चात आलेल्या लोकांना आपण का आलो हे माहीत नसल्याचे फडणवीस म्हणाले होते. कोणत्या पक्षाचा मोर्चा आहे हे माहित नाही. पैसे वाटले जात आहेत आणि एवढं सगळं करूनही ते संख्या जमवू शकले नाहीत. त्यामुळं जनतेला काय हवं आहे हे आज दिसून आले आहे. जनतेलाही माहित आहे की हे फक्त राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाने राजकारण करत आहे. मुंबईत नॅनो मोर्चा निघाला आहे. त्यामुळं मुंबईत कोणाची ताकद आहे हे दिसून आल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या:
महामोर्चात पैसे देऊन माणसं जमवली; व्हिडीओ शेअर करत भाजपचा आरोप, फडणवीस म्हणाले, व्हिडीओ लाजिरवाणा, अजित पवारांनी आरोप फेटाळले...