एक्स्प्लोर

Sanjay Raut : देशात हुकूमशाहीचं सरकार, न्यायाधीशांना धमक्या देण्याचं काम सुरु : संजय राऊत 

Sanjay Raut : देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये, ती सत्ताधाऱ्यांची गुलाम राहावी यासाठी धमकी दिली जात असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं.

Sanjay Raut : सध्या न्यायव्यवस्था खिश्यात टाकण्याचा प्रयत्न सुरु आहे. परंतू, देशात अजून असे काही न्यायाधीश आहेत की जे सरकारच्या दबावाखाली येत नाहीत, मात्र त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केलं. देशातील न्यायव्यवस्था स्वतंत्र राहू नये, ती सत्ताधाऱ्यांची गुलाम राहावी यासाठी धमकी दिली जात आहे. कायदा मंत्री किरण रिजीजूंचा न्यायालयावर दबाव आहे. 

कोकणातील जनता उद्धव ठाकरेंसोबत

5 मार्चला खेडमध्ये (Khed) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची जी सभा झाली त्यामध्ये सगळं चित्र स्पष्ट झालं आहे. कोकणातील जनता उद्धव ठाकरेंच्या मागे असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत  यांनी केलं. आता कोणीही सभा घेतली तरी फरक पडत नसल्याचे राऊत म्हणाले. आज खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Sinde)यांची जाहीर सभा होत आहे. त्यांच्या या सभेबाबत राऊतांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी राऊत बोलत होते. 

राहुल गांधी यांनी  माफी का मागावी, राऊतांचा सवाल ? 

न्याव्यवस्थेला धमकी देणारं सरकार यालाच हुकूमशाहीचं सरकार म्हणतात अशी टीका संजय राऊतांनी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना हुकूमशाही विरोधात लंडनमध्ये आवाज उठवला आहे, म्हणून राहुल गांधी यांचे लोकसभेतील सदस्यत्व रद्द करण्याच्या हालचाली सुरु असल्याचे राऊत म्हणाले. संसदेत जे काम चाचलं आहे, त्याबाबत राहुल गांधी यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहेत. लोकशाही वाचवण्यासाठी राहुल गांधी यांनी जर भूमिका मांडली असेल तर त्यांनी माफी का मागावी असा सवाल संजय राऊत यांनी केला. राहुल गांधी यांनी माफी मागण्याचे कोणतेही कारण नसल्याचे राऊत म्हणाले. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज खेडमध्ये सभा 

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज रत्नागिरी (Ratnagiri) जिल्ह्यातील खेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. आज सायंकाळी सहा वाजता ही सभा होणार आहे. माजी मंत्री रामदास कदम यांनी या सभेचं आयोजन केलं आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये केलेल्या टिकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ज्या गोळीबार मैदानात उद्धव ठाकरे यांची सभा झाली होती त्याच मैदानात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे. 

महत्त्वाच्या बातम्या:

Nashik Sanjay Raut : एकनाथ शिंदे सोडून सगळे शिवसेनेत येतील, आम्ही शिंदेंना घेणार नाही, संजय राऊत यांचे मोठे वक्तव्य

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024 Latest NewsABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 26 January 2024Anandache Paan : 780 भाषा शोधणारे पद्मश्री Ganesh Devi यांच्याशी 'द इंडियन्स'  या महाग्रंथाबद्दल गप्पा 25 January 2025Narhari Zirwal On Guardian Minister Post : आधी खदखद नंतर सारवासारव; नरहरी झिरवाल यांचं वक्तव्य चर्चेत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sheikh Hasina : पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
पाकिस्तानात जे इम्रान खान यांचं झालं, तीच अवस्था शेख हसीनांच्या पक्षाची बांगलादेशात होणार? अंतरिम सरकार आणखी एका निर्णयाच्या तयारीत
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
अपघातातील जखमी दुचाकीस्वारासाठी थांबला उपमुख्यमंत्र्यांचा ताफा; एकनाथ शिंदे धावले मदतीला
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
... तर मी जरांगेंच्या उपोषणाला भेट देईल; आंतरवालीतील उपोषणावर पालकमंत्री पंकजा मुंडे स्पष्टच बोलल्या
Narhari Zirwal : आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
आधी हिंगोलीच्या पालकमंत्रिपदावरून खदखद, आता नरहरी झिरवाळांचा वक्तव्यावरुन यू-टर्न;  म्हणाले....
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
पोलिसांना कस्पटासमान लेखणारा माजोरडा कुणाल बाकलिवाल पेशाने बिल्डर, राजकीय नेत्यांशी खास ओळखी
Dhananjay Munde Resignation: ...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
...तर देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंना राजीनामा द्यायला लावतील; चंद्रकांत पाटलांचं सूचक वक्तव्य
Pankaja Munde : पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
पालकमंत्री झाल्यानंतर पंकजा मुंडे पहिल्यांदाच पोहोचल्या जालन्यात; प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त साधत जिल्हावासियांना मोठा शब्द; म्हणाल्या...
Ajit Pawar: अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
अजित पवारांच्या निकटवर्तीयांकडून वृद्ध नागरिकाला मारहाण; अजितदादांना विचारणा करताच म्हणाले, 'त्यांचा फोन बंद आहे...'
Embed widget