Devendra Fadnavis : दीक्षाभूमीला मिळणार "अ" वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा, केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार; फडणवीसांचे आश्वासन
Devendra Fadnavis : फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना दीक्षाभूमी ला "ब वर्ग" तीर्थक्षेत्राचा दर्जा देत विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता.
Devendra Fadnavis : दीक्षाभूमीला (Dikshabhoomi) "अ वर्ग" तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे (Central Government) पाठपुरावा करू आणि दीक्षाभूमीच्या विकासाचा 190 कोटी रुपयांचा नवा आराखडा लवकरच मंजूर करू असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिले आहे. ते काल नागपूर येथील दीक्षाभूमीवर 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सोहळ्यात बोलत होते.
मविआच्या काळात 40 कोटी रुपये बँक खात्यातच राहिले- फडणवीस
फडणवीस म्हणाले, मी मुख्यमंत्री असताना दीक्षाभूमी ला "ब वर्ग" तीर्थक्षेत्राचा दर्जा देत विकासासाठी शंभर कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला होता. चाळीस कोटी रुपये ऍडव्हान्स म्हणूनही दिले होते. मात्र दुर्दैवाने महाविकास आघाडी सरकारच्या काळात 40 कोटी रुपये बँक खात्यामध्येच राहून गेले. त्यापैकी दमडीचा ही वापर विकास कामांसाठी होऊ शकला नाही अशी खंत फडणवीस यांनी बोलून दाखवली.
190 कोटी रुपयांचा नवा आराखडा पुढील पंधरा दिवसात मंजूर करू
मात्र आता दीक्षाभूमीच्या विकासासाठी आणखी निधीची गरज असून 190 कोटी रुपयांचा नवा आराखडा पुढील पंधरा दिवसात मंजूर करू असा आश्वासन फडणवीस यांनी दिला. 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने काल संध्याकाळी दीक्षाभूमी स्मारक समितीकडून भव्य सोहळा आयोजित करण्यात आला. मात्र ऐनवेळी पाऊस आल्यामुळे लोकांची तारांबळ उडाली मोठ्या संख्येने आलेले लोक घरी परत गेले. जे मोजके लोकं दीक्षाभूमीवर उपस्थित होते त्यांनी कुठला तरी आडोशा घेऊन भाषण ऐकले.
दीक्षाभूमीवर अनुयायांची लक्षणीय गर्दी
या कार्यक्रमप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ते महापौर असल्यापासून दीक्षाभूमीच्या विकासासाठी केलेल्या कार्याची माहिती दिली. तसेच केंद्र सरकारकडून दीक्षाभूमीला ‘अ’ दर्जाच्या धार्मिक स्थळाची मान्यता प्रलंबित असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व रामदास आठवले यांच्यासह आपण स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, ऐतिहासिक दीक्षाभूमीवर 66 वर्षांपूर्वी 14 ऑक्टोबर 1956 रोजी दसरा सणाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्मदीक्षा घेतली. त्यानंतर त्यांनी लाखो अनुयायांना दीक्षा दिली. तेव्हापासून दरवर्षी धम्मचक्र प्रवर्तन वर्धापन दिन सोहळा नागपूर येथे होतो. देश-विदेशातून लाखो अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमीवर येतात. यावर्षीही गेल्या तीन दिवसात जवळपास 30 लाख नागरिकांनी याठिकाणी अभिवादन केले. पाऊस सुरू असतानाही अनुयायांनी केलेली गर्दी लक्षणीय होती.
इतर महत्वाच्या बातम्या
Todays Headline 6th october : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या
Durga Visarjan : पश्चिम बंगालमध्ये दुर्गा विसर्जनादिवशी मोठी दुर्घटना; अचानक आलेल्या पुरामुळे 7 जणांचा मृत्यू, पाहा Video