Jalna News : राज्यात सत्तांतर व्हावं यासाठी बंडखोरांना भाजपने 7000 कोटी रुपये दिले; चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक आरोप
Maharashtra Political Crisis : आम्ही संघ परिवाराला देणग्या देतो पण ते आपला पैसा या कामासाठी वापरतात असा आरोपही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.
![Jalna News : राज्यात सत्तांतर व्हावं यासाठी बंडखोरांना भाजपने 7000 कोटी रुपये दिले; चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक आरोप Maharashtra Political Crisis Shivsena Chandrakant Khaire allegation BJP gave Rs 7000 crore to the rebels Jalna News : राज्यात सत्तांतर व्हावं यासाठी बंडखोरांना भाजपने 7000 कोटी रुपये दिले; चंद्रकांत खैरे यांचा खळबळजनक आरोप](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/06/28/0667810031908f981a9b9458931170ba_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
जालना: राज्यात सत्तांतर व्हावे यासाठी एकनाथ शिंदे आणि शिवसेना बंडखोर आमदारांना भाजपने 7000 कोटी रुपये दिल्याचा सनसनाटी आरोप शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. तर ज्या दिवशी शिवसेना पक्ष हायजॅक कराल त्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसैनिक तुम्हाला जाळून टाकल्या शिवाय राहणार नाही असं धक्कादायक वक्तव्य सेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी केलं आहे. जालन्यातील मोर्चात चंद्रकात खैरे आणि माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी ही खळबळजनक वक्तव्यं केली आहेत.
संघाच्या लोकांना विचारा, संघ परिवाराला देखील आम्हीदेखील डोनेशन देतो. मात्र ते आपला पैसा तिकडे वापरतात असा आरोपही शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केला. ते म्हणाले की, एक रिक्षावाला एवढा मोठा होतो कसा? एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचा डुप्लिकेट शिवसैनिक आहे.
दरम्यान, व्यासपीठावर या भाषणादरम्यान शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. ज्या दिवशी शिवसेना पक्ष हायजॅक कराल त्या दिवशी महाराष्ट्रातील शिवसैनिक तुम्हाला जाळून टाकल्या शिवाय राहणार नाहीत असं शिवाजीराव चोथे यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदेंनी बंडखोर आमदारांवर जादूटोणा केला
शिवसेना विरोधात बंड करणारे एकनाथ शिंदे यांच्याबद्दल चंद्रकांत खैरे यांनी अजब दावा केला आहे. शिवसेना बंडखोर आमदारांना गुवाहाटीला घेऊन गेलेल्या एकनाथ शिंदेंना जादूटोणा येत असल्याचं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी या आधी केलं होतं. वैजापूर तालुक्याचे बंडखोर आमदार रमेश बोरणारे यांच्या मतदारसंघात शिवसेना मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चंद्रकांत खैरे यांनी बोरणारे यांच्यासह एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले, त्या गुवाहाटीत काय चालू आहे, आमदारांना कसं बेकार करून ठेवलंय. त्यांच्यावर जादूटोणा करण्यात आला आहे. कारण एकनाथ शिंदे हे जादूटोणा करतात. त्यांच्या तोंडामध्ये सतत एक कोणतीतरी पांढरी गोळी असते. म्हणून त्यांनी जादूटोणा करून या लोकांना आपलंसं करून घेतलंय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)