Maharashtra Political Crisis LIVE: राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं

Maharashtra Political Crisis Live Updates: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात फैसला अवघ्या काही तासांत. 16 आमदारांच्या अपात्रतेचा फैसला होणार, निकाल एकमतानं येण्याची शक्यता

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 May 2023 02:52 PM
Maharashtra Politics : अजूनही 16 आमदारांच्या निर्णयावर सरकारचे भवितव्य, निकालानंतर नरहरी झिरवाळ असं का म्हणाले?

Maharashtra Politics : सद्यस्थितीत सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना दिलासा मिळाला आहे. मात्र अद्यापही 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे 16 आमदारांचा निर्णय अद्याप येणे बाकी आहे, त्यामुळे शिंदे फडणवीस सरकारचे भवितव्य त्यावर अवलंबून असल्याचे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) म्हणाले आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Uddhav Thackeray: शिंदे गटाच्या आम्हीच शिवसेना दाव्यावर 'सर्वोच्च' ताशेरे;पक्ष आणि चिन्हावर उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Uddhav Thackeray: गेल्या 11 महिन्यांपासून अंधांतरी असलेल्या महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेवेळी केलेल्या प्रत्येक कृतीवर ताशेरे ओढले आहेत. फुटलेला गट बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने फटकारले आहे. त्यामुळे शिंदे गटाकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या आम्हीच शिवसेना यावरून सर्वोच्च न्यायालयाने कडक शब्दात शिंदे गटाला फटकारले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

CM Eknath Shinde : घटनाबाह्य सरकार म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने कालबाह्य केलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Maharashtra Political Crisis : आजचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा लोकशाहीमध्ये अपेक्षित असलेला निकाल होता, अखेर सत्याचा विजय झाला अशी पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. आमचं सरकार घटनाबाह्य आहे असं म्हणणाऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाने आज कालबाह्य केलं आहे असंही ते म्हणाले. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Political Crisis: 'राजीनामा नसता दिला तर...'; सर्वोच्च न्यायालयाच्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले...

Uddhav Thackeray On Supreme Court Verdict: आज सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) निर्णय दिला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं एका मुद्द्यावर अत्यंत महत्त्वाची टिप्पणी केली आणि राज्याच्या राजकारणात खळबळ माजली. सर्वोच्च न्यायालयानं शिंदेंसह त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांवर ताशेरे ओढले, पण तरीही शिंदे सरकार स्थिर राहिलं त्यासाठी कारण ठरलं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा राजीनामा. उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिली नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं. सर्वोच्च न्यायालयाच्या याच वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मी राजीनामा दिला नसता तर मी परत मुख्यमंत्री झालो असतो, पण ही लढाई माझ्यासाठी नाहीये, जनतेसाठी आहे, लोकशाहीसाठी आहे, असं म्हटलं आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

आता काही शंका नाही ना कोणाला? काहीजण पराभवाचे फटाके फोडतायत; शिंदेंचा ठाकरे गटाला टोला

Maharashtra Poltical Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा जल्लोष

Maharashtra Poltical Crisis: सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर भाजप आमदार अतुल भातखळकर यांचा जल्लोष


अतुल भातखळकर यांनी कांदिवली येथे न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केलं 


यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Prasad Lad on Uddhav Thackeray: "मैदान सोडून पळालेल्या उद्धव ठाकरेंची राखण सर्वोच्च न्यायालयानं देखील केली नाही"; पळपुटेपणावर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब 

Prasad Lad on Uddhav Thackeray: सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर भाजप आमदार प्रसाद लाड यांची उद्धव ठाकरेंवर टीका


"मैदान सोडून पळालेल्या उद्धव ठाकरेंची राखण सर्वोच्च न्यायालयानं देखील केली नाही"; पळपुटेपणावर सर्वोच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब 

Maharashtra Politics : 'ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड', सुप्रीम निकालानंतर सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट

Maharashtra Politics : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल अखेर लागला असून शिंदे-फडणवीस सरकार (Eknath Shinde)वाचले आहे. सगळं चुकलं पण शिंदे सरकार वाचलं असल्याचं या निकालातून समोर आला आहे. अशातच शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी पहिली प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. 'ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड' अशा आशयाची पोस्ट केली आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis: व्हिपसंदर्भात नेमकं काय म्हणालं सुप्रीम कोर्ट?

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : दहाव्या सुचीनुसार राजकीय पक्षाचा व्हिप अतिशय महत्त्वाचा आहे. ठाकरे गटाचे व्हिप महत्त्वाचे होते. ठाकरे गटाचे व्हिप पाळणे गरजेचे होते. गोगावलेंची प्रतोद म्हणून नियुक्ती बेकायदेशीर आहे.  विधीमंडळ पक्षाने व्हिप पासून स्वताला दूर करणं पक्षाशी नाळ तोडण्यासारखं  आहे. 2019 साली सर्व आमदारांनी उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख केलं तर एकनाथ शिंदेंना गटनेता म्हणून निवडले होते. अधिकृत व्हिप कोणाचा हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, असे निरीक्षण कोर्टाने नोंदवले आहे. 

Maharashtra Poltical Crisis Live Updates: गोगावलेंची प्रतोद म्हणून झालेली नियुक्ती बेकायदेशीर : सर्वोच्च न्यायालय

Maharashtra Poltical Crisis Live Updates: राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज महत्वाचा निर्णय दिला आहे. यामध्ये न्यायालयानं कोर्टावर ताशेरे ओढले आहेत. पण सध्या शिंदे-फडणवीस सरकार बचावलं आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे देण्यात आला आहे. सध्या राज्यातील सरकार वाचलं आहे. अध्यक्षांनी 16 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भातील निर्णय लवकर घ्यावा असेही न्यायालयानं म्हटलं आहे. गोगावलेंची प्रतोद म्हणून झालेली नियुक्ती न्यायालयानं बेकादेशीर ठरवली आहे. यावर प्रतिक्रिया देताना गोगावले म्हणाले की, कोर्टानं दिलेला निर्णय मला मान्य आहे. आम्ही काळजी करत नसल्याचे ते म्हणाले. 

Devendra Fadnavis : कोर्टाच्या निकालावर समाधानी, सरकार जाणार म्हणणाऱ्यांच्या मनसुब्यावर पाणी : फडणवीस

Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयानं आज जो निर्णय दिला, त्याबाबत आम्ही समाधानी असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी केलं. जे लोक कालपर्यंत सरकार जाणार म्हणत उड्या मारत होते त्यांच्या सर्व मनसुब्यावर पाणी फिरल्याचे फडणवीस म्हणाले. लोक चुकीच्या चर्चा करत होते. आम्ही पत्रकार परिषदेत सविस्तर याबाबतचे विश्लेषण करु असेही फडणवीस म्हणाले.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Poltical Crisis: उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता तर, सरकार परत बोलावलं असतं; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य

Maharashtra Poltical Crisis Live: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत (Maharashtra Poltical Crisis) आज सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) निकाल जाहीर केला. यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं ठाकरे गटाला मोठा धक्का देत शिंदेंना दिलासा दिला आहे. त्यामुळे आता हे स्पष्ट होतंय की, राज्यातील शिंदे सरकार बचावलं आहे आणि त्यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची खुर्चीही. याबाबत निर्णय देताना सर्वोच्च न्यायालयानं मोठं वक्तव्य केलं. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं, असं सर्वोच्च न्यायालयानं आपला निकाल जाहीर करताना म्हटलं आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : आज सुप्रीम कोर्टात काय-काय घडलं?

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : भरत गोगावले प्रतोद म्हणून नियुक्ती बेकादेशीर, अधिकृत व्हिप कोण हे जाणून घेण्याचा प्रयत्न झाला नाही, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबत सुप्रीम कोर्टाचं निरीक्षण


अपात्रतेपासून वाचण्यासाठी आम्हीच खरा पक्ष आहोत, हा बचाव होऊ शकत नाही


सरकारवर शंका घेण्याचं कारण राज्यपालांकडे नव्हतं. बहुमत चाचणी बोलावण्याची गरज नव्हती. पक्षांतर्गत वाद मिटवण्यासाठी बहुमत चाचणीचा वापर नको


उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना मुख्यमंत्री म्हणून पुनर्स्थापित करण्याचा निर्णय दिला असता.


ठाकरेंच्या बाजूने काय काय? 


- प्रकरण 7 न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी मान्य
- गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर
- फुटलेला गट बचावासाठी मूळ पक्ष असल्याचा दावा करु शकत नाही

Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात मोठा निकाल, आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांकडे सोपवला, एकनाथ शिंदेंना दिलासा

Maharashtra Political Crisis : राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेणार असल्यामुळे, ते आमदार पात्रच आहेत यावर शिक्कामोर्तब झालं आहे. त्यामुळे ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे. या निर्णयामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Political Crisis : शिंदे गट आणि राज्यपालांवर ताशेरे पण सरकार वाचलं, आजच्या सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीतील महत्त्वपूर्ण पाच निरीक्षणं

Maharashtra Political Crisis :  राज्यातल्या  सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूने लागला आहे. सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदेंना दिलासा आहे. 16 आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण अध्यक्षांकडे वर्ग करण्यात आला आहे. आजच्या निकालात देखील उद्धव ठाकरेंचा राजीनामा हा कळीचा मुद्दा ठरला आहे.  तसेच राज्यपालांच्या भूमिकेवर देखील ताशेरे ओढले आहेत. सुप्रीम कोर्टाने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.  


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : राज्यातील शिंदे सरकार बचावलं; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल शिंदेंच्या बाजूनं

Maharashtra Poltical Crisis Live Updates: उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य

Maharashtra Poltical Crisis Live Updates: उद्धव ठाकरेंनी स्वखुशीनं राजीनामा दिला, त्यांनी राजीनामा दिला नसता, तर सरकार पुन्हा आणलं असतं; सर्वोच्च न्यायालयाचं मोठं वक्तव्य

Maharashtra Poltical Crisis Live Updates: नबाम रेबिया प्रकरण मोठ्या घटनापीठाकडे वर्ग; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: शिंदे-फडणवीस सरकारवर याचा काही परिणाम होणार नाही : महादेव जानकर

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आज बारामतीतील माळेगाव येथे एका खाजगी कार्यक्रमात आले होते, यावेळी माध्यमाशी संवाद साधताना महादेव जानकर यांनी विविध विषयावरती भाष्य केले. यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती भाष्य करताना जानकर म्हणाले की, शिंदे फडवणीस सरकारकडे 185 चा आकडा असून यामध्ये जरी 16 आमदार अपात्र झाले तरी भाजपकडे बहुमत येत आहेत. यामुळे राज्य सरकारला कोणताही धोका नाही आणि शिंदे-फडवणीस सरकार स्थिर राहील.

Maharashtra Poltical Crisis: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा महानिकाल! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार, खुद्द सरन्यायाधीश निकालाचं वाचन करण्याची शक्यता

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा महानिकाल! महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर थोड्याच वेळात सुप्रीम कोर्टाचा निकाल येणार, खुद्द सरन्यायाधीश निकालाचं वाचन करण्याची शक्यता

Maharashtra Poltical Crisis Live Updates: मुख्यमंत्री शिंदे यांचा आजचा काय पण पुढचा पण कार्यकाळ पूर्ण होईल : यामिनी जाधव
Maharashtra Poltical Crisis Live Updates: माझा पूर्णपणे न्याय व्यवस्थेवर आणि बाबासाहेबांनी लिहलेल्या संविधावर विश्वास आहे. जो निर्णय येईल तो संविधानालाच अनुसरुन आहे. मुख्यमंत्री शिंदे यांचा आजचा काय पण पुढचा पण कार्यकाळ पूर्ण होईल, असा विश्वास मुंबई येथील शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यामीनी जाधव यांनी व्यक्‍त केलाय. आमदार यामीनी जाधव यांनी जळगावात शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांच्या कन्येच्या विवाह सोहळ्याला हजेरी लावली. यादरम्यान, सत्तासंघर्षाच्या निकालावर त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.

 

एकनाथ शिंदे, आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास आहे. सकारात्मक विचार आहे, सर्वांना सकारात्मक दिशेने घेवून जाईल. प्रत्येक न्याय तज्ञांच वेगवेगळी मते असतील, मात्र मी पुन्हा पुन्हा सांगते की, आमचा न्याय देवतेवर विश्वास आहे. जे आहे ते उद्या दिसेलच, असे आमदार यामीनी जाधव यांनी स्पष्ट केले. 

 

व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. त्यामुळे प्रत्येकाची मते बदलू शकत नाही, असे म्हणत यामीनी जाधव यांनी संजय राऊत यांना टोला लगावला आहे.

 

अजिबात धाकधुक नाहीये, माझ्या चेहऱ्यावर कुठे दिसतयं का? मी चांगल्या पध्दतीने लग्न इन्जॉय केलं... मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजचाच काय पण मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचा पुढचा पण कार्यकाळ पूर्ण होईल...

 
Ajit Pawar : जोपर्यंत त्यांच्याकडे 145 चा आकडा तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नाही : अजित पवार

Ajit Pawar : जोपर्यंत 145 चा आकडा त्यांच्याकडे आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नसल्याचे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं. आपण सर्वजण वाट पाहत आहोत की सुप्रीम कोर्टाचा निकाल कधी येतोय. मे महिन्यात निकाल लागणार आहे अशी चर्चा होती. आज त्यासंदर्भआत निकाल लागणार आहे. बघू काय निकाल लागणार आहे, असे अजित पवार म्हणाले. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Political Crisis: सत्तासंघर्षाच्या निकालात मराठवाड्यातील पाच आमदारांवर टांगती तलवार

Maharashtra Political Crisis: तब्बल अकरा महिन्यानंतर राज्यातील सत्तासंघर्षावर आज (11 मे) निकाल येणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सत्ता राहणार की जाणार हे देखील या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. दरम्यान अपात्रतेची  टांगती तलवार असलेल्या 16 आमदारांमध्ये मराठवाड्यातील पाच आमदारांचा समावेश आहे. त्यामुळे या निकालाकडे मराठवाड्याचे देखील विशेष लक्ष असणार आहे. पैठणचे आमदार संदिपान भुमरे (Sandipan Bhumre), सिल्लोड-सोयगाव मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार (Abdul Sattar), छत्रपती संभाजीनगर पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat), वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे (Ramesh Bornare) यांच्यासह धाराशिवच्या भूम-परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांचा अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या 16 आमदारांमध्ये सहभाग आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Poltical Crisis Live Updates: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, योगायोग की, आणखी काही?

Maharashtra Poltical Crisis Live Updates: राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना IL&FS प्रकरणी ईडीकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. 2018 मध्ये याचप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही नोटीस पाठवण्यात आली होती. जयंत पाटील यांना सोमवारी चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे सोमवारी जयंत पाटील चौकशीसाठी हजर राहणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर आज निकाल येणार आहे, आणि त्याच्या काही तास आधी जयंत पाटील यांना नोटीस मिळते, हा योगायोग समजायचा की आणखी काय? हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. 

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : सत्ता संघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर, मंत्री उदय सामंत मात्र कामात व्यस्त

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : रत्नागिरी- सत्ता संघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवर


शिंदे-फडणवीस गटातील मंत्री उदय सामंत मात्र कामात व्यस्त


सत्ता संघर्षाच्या निकालाच्या अगोदर आपल्या मतदारसंघात घेतात कामांचा आढावा


सकाळी पावणे सात वाजल्यापासून उदय सामंत आपल्या मतदारसंघात ऑन फिल्ड

Maharashtra Poltical Crisis Live Updates: सत्तासंघर्षाचा निकाल, शिंदे गटातील आमदारांची धाकधूक वाढली, आमदार महेश  शिंदे मात्र उद्घाटनात व्यस्त

Maharashtra Poltical Crisis Live Updates: सत्ता संघर्षाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.  निकालालाची वेळ जस जशी जवळ येऊ लागली आहे तस तसे मंत्रीमंडळाची धाकधुक वाढत असल्याचे असताना दुसरीकडे 16 आमदारांपैकी एक आमदार महेश  शिंदे मात्र उदघाटणामध्ये व्यस्त आहेत. 

Narhari Zirwal: झिरवळ नेमके आहेत कुठे? कोणी म्हणतंय 'नॉट रिचेबल', कुणी म्हणतंय अजितदादांसोबत

Maharashtra Political Crisis:  सत्ता संघर्षाच्या निकालाचा महत्वाचा  दिवस आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे.  नरहरी झिरवाळ यांच्यांशी सध्या कुणाचाही संपर्क होत नसून ते नॉट रिचेबल आहेत, असा मेसेज माध्यमांमध्ये फिरू लागला.  या नंतर राजकीय चर्चांना उधाण आले. त्यानंतर नरहरी झिरवाळ आपल्या गावीच असल्याची माहिती झिरवाळ यांच्या कार्यालयाने एबीपी माझाला दिली आहे.


नरहरी झिरवाळ पुन्हा एकदा नॉट रीचेबल झाले आहेत.  नरहरी झिरवाळ फोन बंद करून  करून  अज्ञातस्थळी रवाना झाले अशा चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र नरहरी झिरवाळ नाशिकमधील दिंडोरी आपल्या गावीच असल्याची माहिती कार्यालयाने दिली आहे.  मात्र नरहरी झिरवाळ यांचा फोन नॉट रिचेबल आहे.  नरहरी झिरवाळ  हे अजित पवार दिंडोरी तालुक्यातील एका कंपनीमधे असल्याची माहिती आहे. मात्र याबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे. नरहरी झिरवळ त्यांच्यासोबत असल्याची माहिती सध्या समोर येत आहे.


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Pravin Darekar On Maharashtra Political Crisis : निकालाची आम्हाला चिंता किंवा काळजी नाही, धक्कादायक निर्णय येईल असं वाटत नाही : प्रवीण दरेकर

Pravin Darekar On Maharashtra Political Crisis : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल आज जाहीर होणार आहे. यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


सत्ता संघर्षाच्या निकालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे


कोणत्याही प्रकारची चिंता किंवा काळजी आम्हाला नाही


विधीमंडळाने घेतलेला निर्णय अंतिम असतो


एकनाथ शिंदे यांनी पक्षप्रमुखांच्या विरोधात आवाज उठवला आहे


नेतृत्वाच्या विरोधात आवाज उठवला आहे


धक्कादायक निर्णय येईल असं आम्हाला वाटत नाही


संजय राऊत डबल ढोलकीसारखे आहेत


मनासारखं झालं नाही की न्यायव्यवस्थेला बोलतात, सोयीनुसार त्यांच बोलणं असतं

Sanjay Raut on Maharashtra Political Crisis : काय झाडी ,काय डोंगर, काय हिरवळ, आज वाट पाहतोय तुमची, नरहरी झिरवळ.. जय महाराष्ट्र! असं ट्वीट ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.



Eknath Shinde vs Uddhav Thackeray: निकालाच्या पार्श्वभूमीवर बुलढाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यांकडून मंदिरात पूजा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल आज अकरा वाजता सर्वोच्च न्यायालयात सुनावल्या जाणार आहे. याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी आज सकाळपासूनच विविध मंदिरात पूजा आजच्या करण्यास सुरुवात केली आहे.  या निकालाबाबत ठाकरे गटाला दिलासा मिळावा अशी प्रार्थना देवाकडे करत आहेत.

Anand Dubey On Maharashtra Political Crisis : न्यायाचा विजय होईल अशी आशा आणि विश्वास : आनंद दुबे

Anand Dubey On Maharashtra Political Crisis : माननीय सुप्रीम कोर्टाचा निर्णय लवकरच येणार आहे, आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणि आशा आहे की न्यायाचा विजय होईल, आजवर झालेल्या अत्याचार आणि अपमानातून आम्हाला मुक्ती मिळेल, अखेर सत्याचाच विजय होईल, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे प्रवक्ते आनंद दुबे यांनी दिली आहे.

Maharashtra Poltical Crisis Live Updates: सत्ता संघर्षाच्या निकालाचा महत्वाचा दिवस; विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मात्र नॉट रीचेबल

Maharashtra Poltical Crisis Live Updates: सत्ता संघर्षाच्या निकालाचा महत्वाचा दिवस. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ मात्र नॉट रीचेबल, झिरवाळ यांचे फोन बंद, गावाकडील घरीही झिरवळ नाही. सुप्रीम कोर्टाच्या निकाला दिवशीच झिरवाळ नॉट रीचेबल

Maharashtra Political Crisis Live Updates : ठाकरे गटाचे आणि शिवसेनेचे नेते दिल्लीत, सत्तासंघर्षाच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर आपापल्या वकिलांशी चर्चा

Maharashtra Political Crisis Live Updates : ठाकरे गटाचे नेते अनिल परब काल रात्री दिल्लीत दाखल झाले आहेत. 


तसेच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे ही दिल्लीत असल्याची माहिती आहेत. 


काल रात्री दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपापल्या वकिलांशी बोलून आजच्या निकालानंतर काय रणनीती ठेवावी याबद्दल चर्चा केल्याची माहिती आहे.

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : ठाकरे गटाचे नेते, शिंदे गटाचे नेतेही दिल्लीत दाखल

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : ठाकरे गटाचे नेते अनिल परब काल रात्री दिल्लीत दाखल झाले आहे.


तसेच शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे हे ही दिल्लीत असल्याची माहिती आहेत.


काल रात्री दोन्ही गटाच्या नेत्यांनी आपापल्या वकिलांशी बोलून आजच्या निकालानंतर काय रणनीती ठेवावी याबद्दल चर्चा केल्याची माहिती आहे.

Chhatrapati Sambhaji Raje on Maharashtra Poltical Crisis: राज्याच्या सत्तासंघर्ष प्रकरणाच्या निकालाबाबत सर्वसामान्य जनतेला काहीही घेणं देणं नाही : छत्रपती संभाजीराजे

Chhatrapati Sambhaji Raje on Maharashtra Poltical Crisis: राज्याच्या सत्तासंघर्ष प्रकरणी लागणाऱ्या निकालाशी सर्वसामान्य जनतेला काहीही घेणं देणं नाही, आमदारांची खुर्ची टिकवण्यासाठी धावपळ सुरू आहे. या शब्दांत छत्रपती संभाजीराजे यांनी सद्य स्थितीवर प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणाचा हा पोरखेळ अनेक वर्षांपासून सुरू असून लोक त्याला कंटाळले आहेत, या शब्दात संभाजी राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नांदेड जिल्ह्यातील तामसा इथे पत्रकारांशी बोलत होते.

Maharashtra Poltical Crisis Live Updates: आज राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल; गृहविभाग अलर्ट मोडवर, गृहविभागाकडून पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश

Maharashtra Poltical Crisis Live Updates: आज राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल लागणार आहे. त्या पार्श्वभूमीवर गृहविभाग अलर्ट मोडवर आलं आहे. गृहविभागाने पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. निकालानंतर राजकीय तेढ निर्माण होण्याची शक्यता असल्याने गृहविभागाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. 

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलणार की, सावरणार? तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ म्हणतात...

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आता अवघ्या काही तासांवर आला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा (Maharashtra Politics)  बदलवणारा हा निकाल असणार आहे. काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप होऊन राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाले. गेल्या नऊ महिन्यांपासून यावर सुप्रीम कोर्टात सत्ता संघर्ष सुरु आहे. अशातच उद्या या सत्तासंघर्षांवर निकाल दिला जाणार आहे. या सर्व प्रक्रियेत तत्कालीन विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांची महत्वाची भूमिका राहिलेली आहे. यावर त्यांनी महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. झिरवाळ म्हणाले की, मी दिलेला निकाल हा कुठल्या आकसापोटी दिलेला नसून घटनेनुसार दिला आहे. त्यामुळे न्यायदेवता माझ्या निर्णयाचा विचार करून निर्णय देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


झिरवाळ यांनी मांडलेले दहा महत्वाचे मुद्दे




  • जर निर्णय घ्यायची वेळ आली तर माझ्याकडे येईल, तत्कालीन उपाध्यक्ष असताना दिलेला निर्णय आहे, त्यामुळे माझ्याकडे निर्णय येईल.  




  • 16 आमदार अपात्र ठरल्यानंतर सरकारला धोका आहे,  मुख्यमंत्री अपात्र ठरल्यावर सरकार पडणार, नंतर कोणाचे सरकार येणार हा भाग वेगळा आहे. 




  • सत्तासंघर्षाबाबत अनेक दिवसांपासूनचा युक्तिवाद आहे, 16 आमदार मी अपात्र केलेले आहेत, त्यामुळे माझ्याकडे निर्णय आला, तरीही निर्णयात कुठलाही बदल होणार नाही.




  • ज्यावेळी निर्णय दिला, त्यावेळी मी उपाध्यक्ष होतो, त्यामुळे हा निर्णय माझ्याकडे येईल. मलाच पुढे निकाल द्यायचा आहे, तो अधिकार सध्याच्या विधानसभा अध्यक्षांना नाही. 




  • निर्णय न्यायालयीन प्रक्रियेतून घेऊ शकतात. सार्वभौम सभागृहात जर एखादा निर्णय होत नसेल तर तो विधानसभा अध्यक्षांकडे येत असतो. तो निर्णय मी दिलेला आहे, त्यामुळेच हा निर्णय मी देऊ शकतो.




  • तसेच हा निर्णय सुप्रीम कोर्ट घेऊ शकत, नसेल तर मी निर्णय घेऊ शकतो, आणि माझा निर्णय एकमताने मानला जाईल. त्यावेळचा निर्णय आम्ही घेतला होता, त्यामुळे आम्ही दोघे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे निर्णय घेतील.




  • विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्यांच्याकडे प्रकरण येईल असं म्हणत असले तरीही त्यात तथ्य नाही, त्यावेळी निर्णय ज्याने घेतला त्याकडे प्रकरण येईल. 




  • मी घेतलेल्या निर्णयाला त्यांनी हरकत घेतली, म्हणून प्रकरण न्यायालयात गेले. माझ्यावर अविश्वास आणला मात्र तो सिद्ध झाला नाही, त्यामुळे तो प्रश्न येणार  नाही. 




  • तसेच उर्वरित  24 आमदारांना निर्णय लागू होऊ शकतो का? तर अद्याप त्याबाबत सांगता येणार नाही. मात्र आज तरी 16 आमदारांसाठी लागू होऊ शकतो.




  • पक्षाचे नेते म्हणून काय वाटत? सर्वसामान्य जनता होरपळलेली आहे, अवकाळी पाऊस, गारपीट, महागाई आहे, सरकार म्हणून लक्ष नाहीय, शेतकरी, मजूर, उद्योजक यांना झळ भोगावी लागत आहे.



Maharashtra Politics : सत्तासंघर्षावर नरहरी झिरवाळ यांनी मांडलेले दहा महत्वाचे मुद्दे

Maharashtra Politics : राज्यातील सत्तासंघर्षाचा (Maharashtra Political Crisis) निकाल येण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असून अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. याचबरोबर सत्ता स्थापनेच्या आधी  विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ (Narhari Zirwal) यांची महत्वाची भूमिका राहिलेली होती. त्यांनी या सत्तासंघर्षांवर महत्वाचे मुद्दे मांडले आहेत. सुप्रीम कोर्टात उद्या सत्ता संघर्षावर निकाल येणार असून नरहरी झिरवाळ यांनी सत्तासंघर्षावर महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. 


सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: अपात्रतेची टांगती तलवार असणारे 16 आमदार कोण?

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर त्यांनी गुवाहाटी गाठलं. त्यावेळी विधानपरिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी त्यांना अपात्रतेची नोटिस बजावली. नंतर उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आलं. 


त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि त्या 16 बंडखोर आमदारांना अपात्र ठरवा अशी मागणी उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आली. या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली असून आज त्यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. त्यामुळे या 16 आमदारांचे भवितव्य काय हे काहीच तासांमध्ये स्पष्ट होणार आहे. या 16 आमदारांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नाव आहे. त्यामुळे शिंदे सरकारचे भवितव्य हे आजच्या निकालावर अवलंबून असणार आहे. 


घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधी हा निकाल येणार आहे. 1973 सालच्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणे आजचा निकाल हा एक लँडमार्क जजमेंट असण्याची शक्यता आहे.


अपात्रतेची टांगती तलवार असणारे 16 आमदार कोण?  



  • एकनाथ शिंदे 

  • अब्दुल सत्तार 

  • तानाजी सावंत 

  • यामिनी जाधव

  • संदिपान भुमरे

  • भरत गोगावले 

  • संजय शिरसाट

  • लता सोनवणे 

  • प्रकाश सुर्वे 

  • बालाजी किणीकर 

  • बालाजी कल्याणकर

  • अनिल बाबर

  • संजय रायमुलकर 

  • रमेश बोरणारे 

  • चिमणराव पाटील 

  • महेश शिंदे

Shivsena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 'या' 16 आमदारांच्या अपात्रतेचा फैसला आज

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज निकाल लागणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदार अपात्र ठरणार की शिंदे सरकार कायम राहणार हे स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: एकनाथ शिंदेंचा डाव मोडणार की सावरणार? आज 'सर्वोच्च' फैसला

Eknath Shinde vs Uddhav Thackeray: महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर 20 जून 2022 रोजी जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या (Shivsena) फुटीपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. त्यावेळी बंडखोरी केलेल्या 16 आमदारांना अपात्र करण्याची नोटिस त्यावेळचे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी दिली होती. पण त्याआधीच त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. 

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित

Supreme Court Verdict on Maharashtra Poltical Crisis : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 14 फेब्रुवारी ते 16 मार्च अशी सलग सुनावणी झाली आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे, त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा. दिल्ली केंद्र सरकारचं प्रकरण महाराष्ट्रातील प्रकरणाच्या आधीच पूर्ण झालं आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे. 

Maharashtra Poltical Crisis Live Updates : मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच राहणार: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Poltical Crisis Live Updates : ज्यातील सत्तासंघर्षाचा  निकाल जाहीर होण्यास अवघे काही तास शिल्लक राहिले असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून कायम राहणार, ते राजीनामा देणार, पुढील निवडणूक त्यांच्या नेतृत्वात लढवली जाणार असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.

Shivsena : एकनाथ शिंदेंचा डाव मोडणार की सावरणार? राज्यातील सत्तासंघर्षावर आज सुनावणी

Maharashtra Poltical Crisis Live: राज्यातील सत्तासंघर्षावर जवळपास अकरा महिन्यानंतर आज निकाल लागणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला डाव सावरणार की विस्कटणार हे आज स्पष्ट होणार आहे. 


महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधी हा निकाल येणार आहे. 1973 सालच्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणे आजचा निकाल हा एक लँडमार्क जजमेंट असण्याची शक्यता आहे. 


सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra Poltical Crisis Live : अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असा निकाल येण्याची शक्यता; आजच्या निकालावर अजित पवारांचं मत

Maharashtra Poltical Crisis Live : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा निकाल आज सुप्रीम कोर्ट देणार आहे. आजच्या निकालावर राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. अध्यक्षांनी निर्णय
घ्यावा असा निकाल येण्याची शक्यता आहे. चेंडू अध्यक्षांच्या कोर्टात जाईल असंच दिसतंय, असं अजित पवार म्हणाले आहेत. 

Maharashtra Poltical Crisis Live: महाराष्ट्राचा महानिकाल; महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात फैसला आज

Maharashtra Poltical Crisis Live Updates: 21 जून 2022... ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी महाराष्ट्रात थरारक आणि अभूतपूर्व सत्तासंघर्ष सुरू झाला. 10 महिन्यांनंतर या सत्तासंघर्षाचा महानिकाल आज लागणारेय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल एकमताने दिला जाण्याची आणि फक्त सरन्यायाधीश निकालाचं वाचन करण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा निकाल येण्याचीही शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे, शिवसेनेसह ठाकरे गटाची धाकधूक वाढलीय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत. प्रचंड धक्कादायकरित्या घडलेल्या या सत्तानाट्याने महाराष्ट्राचा राजकीय पटच बदलून टाकला.  उद्धव ठाकरेंना चेकमेट करून शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र आता कोर्ट शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांना पात्र ठरवणार की अपात्र?, शिंदेंनी मांडलेला सत्तेचा डाव विस्कटणार की अभय मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणारेत. तीन पक्षांची मोट बांधून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीसह, शिंदेंना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झालेल्या भाजपचेही डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Political Crisis Live Updates: 21 जून 2022... ही तीच तारीख आहे, ज्यादिवशी महाराष्ट्रात थरारक आणि अभूतपूर्व सत्तासंघर्ष सुरू झाला. 10 महिन्यांनंतर या सत्तासंघर्षाचा महानिकाल आज लागणारेय. महत्त्वाचं म्हणजे, हा निकाल एकमताने दिला जाण्याची आणि फक्त सरन्यायाधीश निकालाचं वाचन करण्याची शक्यता आहे. आज सकाळी 11 वाजताच्या सुमारास हा निकाल येण्याचीही शक्यता वर्तवली जातेय. त्यामुळे, शिवसेनेसह ठाकरे गटाची धाकधूक वाढलीय. महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत. प्रचंड धक्कादायकरित्या घडलेल्या या सत्तानाट्याने महाराष्ट्राचा राजकीय पटच बदलून टाकला. उद्धव ठाकरेंना चेकमेट करून शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र आता कोर्ट शिंदेंसोबत गेलेल्या 16 आमदारांना पात्र ठरवणार की अपात्र? शिंदेंनी मांडलेला सत्तेचा डाव विस्कटणार की अभय मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणारेत. तीन पक्षांची मोट बांधून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीसह, शिंदेंना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झालेल्या भाजपचेही डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत.


राज्यातील सत्तासंघर्षावर जवळपास अकरा महिन्यानंतर आज निकाल लागणार आहे. शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेला डाव सावरणार की विस्कटणार हे आज स्पष्ट होणार आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल एकमताने येण्याची शक्यता असून सरन्यायाधीश चंद्रचूड हा निकाल वाचून दाखवणार आहेत. घटनेच्या दहाव्या अनुसूचीतील पक्षांतर बदी कायद्यासंबंधी हा निकाल येणार आहे. 1973 सालच्या केशवानंद भारती खटल्याप्रमाणे आजचा निकाल हा एक लँडमार्क जजमेंट असण्याची शक्यता आहे. 


गेल्या वर्षी 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तत्पूर्वी सूरत ते गुवाहाटी आणि तेथून गोवामार्गे महाराष्ट्रात झालेलं सत्तांतर संपूर्ण भारतात आजही चर्चेचा विषय आहे. या पार्श्वभूमीवर सत्तासंघर्षाचा निकाल कुणाच्या बाजूने लागेल यांची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे. 


महाराष्ट्रात विधानपरिषद निवडणुकीनंतर 20 जून 2022 रोजी जे नाट्य रंगलं, त्यातून सत्तांतरापर्यंत आणि शिवसेनेच्या (Shivsena) फुटीपर्यंत अनेक घडामोडी घडल्या. त्यावेळी बंडखोरी केलेल्या 16 आमदारांना अपात्र करण्याची नोटिस त्यावेळचे विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांनी दिली होती. पण त्याआधीच त्यावेळचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला आणि राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार सत्तेत आले. तेव्हापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात आलं. 


घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित


हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर 14 फेब्रुवारी ते 16 मार्च अशी सलग सुनावणी झाली आणि तेव्हापासून हा निकाल राखीव आहे. ज्या घटनापीठाला हा निकाल द्यायचा आहे त्या घटनापीठाचे दोन निकाल प्रलंबित आहेत. एक महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा आणि दुसरा दिल्ली आणि केंद्र सरकारमधल्या अधिकारांच्या वादाचा. दिल्ली केंद्र सरकारचं प्रकरण महाराष्ट्रातील प्रकरणाच्या आधीच पूर्ण झालं आहे. 17 जानेवारीपासून हाही निकाल प्रलंबित आहे. 


shivsena symbol supreme court hearing live updates maharashtra political crisis uddhav thackeray vs eknath shinde shiv Sena bjp Maharashtra news marathi news

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.