Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात दुचाकी चोरणाऱ्या टोळीने अजब प्रकार केला आहे... चोरलेल्या दुचाकी थेट विहिरीमध्ये टाकून दिल्याचा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये या टोळीने अनेक दुचाकी चोरल्या होत्या. अखेर हा प्रकार उघडकीस आला आहे. चोरलेल्या दुचाकी त्यांनी विहिरीत टाकल्याचे समोर आले आहे.
अधिकची माहिती अशी की, कोल्हापूर पोलिसांनी या चोरट्यांना पकडून त्यांनी विहिरीमध्ये टाकलेल्या दुचाकी बाहेर काढल्या आहेत... गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनच्या हद्दीत दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या होत्या.... पोलिसांसमोर देखील या चोरट्यांना पकडण्याचे आव्हान होते... मात्र अखेर चोरटे पोलिसांच्या जाळ्यात आले आणि त्यांनी चोरलेल्या दुचाकी थेट विहिरीमध्ये टाकल्याचे कबूल केले.... त्यानंतर आज गुन्हे अन्वेषण विभागाने सशिये आणि नागाव या गावच्या हद्दीत असलेल्या विहिरी मधून चोरलेल्या दुचाकी बाहेर काढले आहेत....
भिवंडी शहरात दुचाकी चोरांवर पोलिसांची मोठी कारवाई
भिवंडी शहरात दोन मोटरसायकल चोरट्यांना निजामपुरा पोलिसांनी अटक करून त्यांच्याकडून चार मोटारसायकलसह एक ऑटो रिक्षा अशी पाच वाहने हस्तगत केली आहेत. याबाबतची माहिती निजामपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. फैजान रमजान अन्सारी (वय 19), समीर जमशेद अन्सारी (वय 20) दोघेही रा.निजामपुरा अशी अटक केलेल्या वाहन चोरांची नावे आहेत.
शहरात वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर चौथा निजामपूर येथे निजामपुरा पोलिसांकडून तपास व पेट्रोलिंग करत असताना फैजान व समीर हे दोघे संशयितरित्या फिरताना आढळून आले होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता दोघांनीही उडवा उडवीची उत्तरे दिली होती. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चार दुचाकींसह एक रिक्षा चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांनी चार मोटरसायकलींसह एक ऑटो रिक्षा या दोघांकडून हस्तगत केली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या