Morocco to cull 3 million stray dogs: मोरोक्को, स्पेन आणि पोर्तुगालसह 2030 मध्ये फिफा विश्वचषक आयोजित करणार आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मोरोक्कोने 30 लाख श्वानांना मारण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे जगभरातून संताप व्यक्त करण्यात येतोय. खरं तर, मोरोक्कोने फिफा विश्वचषकादरम्यान देशातील पर्यटनाला चालना देण्यासाठी 3 लाख भटक्या श्वानांना मारण्याची घोषणा केली आहे. पण मोरोक्कोच्या या योजनेवर आता जगभरातील प्राणीप्रेमी संस्था आणि कार्यकर्त्यांनी जोरदार टीका केली आहे.


श्वानांना विष देऊन किंवा गोळ्या घालून मारण्यात येणार? 


डेली मेलच्या वृत्तानुसार, मोरोक्कतील अधिकाऱ्यांनी देशातील भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येला तोंड देण्यासाठी अशा अमानवी आणि बेकायदेशीर पद्धतींचा अवलंब करण्याचा विचार केला आहे.  मोरक्कोच्या या धोरणानुसार,  श्वानांना सर्वात धोकादायक स्ट्रायक्नाईन विष देण्यात येणार आहे. याशिवाय सार्वजनिक ठिकाणी श्वानांना गोळ्या घालणे आणि फावडे मारून मारणे या पद्धतींचा समावेश आहे.


मोरोक्कोच्या घोषणेमुळे प्राणी प्रेमी संघटना आक्रमक 


इंटरनॅशनल ॲनिमल वेल्फेअर अँड प्रोटेक्शन कोलिशनने मोरोक्कोच्या या निर्णयानंतर जगाला इशारा दिला आहे की, या योजनेअंतर्गत सुमारे 30 लाख श्वान मारले जाऊ शकतात. प्रसिद्ध प्राइमेटोलॉजिस्ट आणि प्राणी हक्कांचे कार्यकर्ते वकिल जेन गुडॉल यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला आहे. त्यांनी याबाबत फिफाला पत्र लिहून या हत्या थांबवण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहन केले आहे.


फिफाला लिहिलेल्या पत्रात जेन गुडॉलने या श्वानांना मारण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या क्रूर आणि अमानवीय पद्धतींचा तीव्र शब्दात निषेध केला. श्वानांच्या हत्या असेच सुरू राहिल्यास मोरोक्कोमध्ये होणारी फिफा स्पर्धा स्थगित करण्यात यावी, असे म्हटले आहे. मोरोक्कोमध्ये भटक्या कुत्र्यांची हत्या थांबवण्याच्या कायदेशीर पद्धती आहेत. परंतु  अधिकारी अनेकदा स्थानिक कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या हस्तक्षेपाशिवाय अशी कारवाई करतात, असं एका  अहवालातून समोर आलं आहे. 


मात्र, फिफाने याबाबत अद्याप कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही किंवा याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही.  प्राणी प्रेमी संघटना मोरोक्कोमधील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगण्यात येत आहे. 




इतर महत्त्वाच्या बातम्या


Israeli attacks on Gaza : 50 हजार निष्पाप जीव गेल्यानंतर तब्बल 469 दिवसांनी इस्रायलची शस्त्रसंधीला मान्यता; पहिल्या टप्प्यात हमास 33 ओलिसांची सुटका करणार