CM Uddhav Thackeray : शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंद : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे ( Eknath shinde) यांच्या बंडामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला.
CM Uddhav Thackeray : "मी मुख्यमंत्री पद आणि पक्षप्रमुख पद सोडायला तयार आहे. परंतु, ज्यांना मी मुख्यमंत्रीपदी नको आहे त्यांनी समोर येऊन सांगा, मी आव्हानांना तोंड देणारा माणूस आहे. शिवसैनिकांना असे वाटत असेल तर मी पक्ष प्रमुख पद सोडायला तयार आहे. शिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होणार असेल तर माझी तयारी आहे, मी पद सोडायला तयार आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठारे यांनी म्हटले आहे.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपण राजीनामा द्यायाल तयार आहे, पण समोर येऊन सांगा. शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला तर मला आनंदर होईल असे म्हटले आहे.
"मी मुख्यमंत्रीपद सोडल्यानंतर शिवसेनाचा मुख्यमंत्री होत असेल तर मला आनंद आहे. फक्त मला हे समोरून येऊन सांगा. तुम्ही या आणि माझ्याशी बोला मग आपण बघू" असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले, " मी संकटाला सामोरा जाणारा शिवसैनिक आहे. त्यामुळे आव्हानांना तोडं द्यायला मी तयार आहे. त्यामुळे सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा सरळ समोर येऊन बोलायला हवं होतं. मी पद सोडले असते. सुरतला गेलेल्या एकाही आमदाराने मला समोर येऊन बोलले असते तर मी आताच्या आता राजीनामा द्यायला तयार आहे. माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करतो. मला फोनवरून देखील सांगतीले की, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्या, तर आजच मी माझा मुक्काम वर्षावरुन मातोश्रीवर हलवण्यास तयार आहे, मला कोणताही मोह नाही . फक्त माझ्या समोर येऊन बोला, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे म्हणाले, "एकदा ठरवू समोर येऊन स्पष्ट सांगा. मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. आयुष्याची कमाई पद नाहीत. कुटुंब प्रमुख म्हणून मला अनेकांनी सांगितले ही माझी कमाई. याबरोबरच मी जे बोलत आहे ते माझे नाटक नाही. माझ्यासाठी कोणाकडे किती संख्या हा विषय गौण आहे. संख्या कशी जमवता हे नगण्य असून मी आपलं मानतो त्यांनी मला सांगावं मी मुख्यमंत्री पद सोडतो.