एक्स्प्लोर

मंत्रिपद न मिळाल्यानं नाराजी? विस्ताराची तारीख सांगत बच्चू कडू म्हणाले, आपल्याला शब्द दिलाय...

Maharashtra Political Crisis : मंत्रिपद न मिळाल्यानं बच्चू कडू हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर त्यांनी स्वत: भाष्य केलं आहे.

Maharashtra Political Crisis : राज्यात ठाकरे सरकार जाऊन बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या. शिंदे-फडणवीस सरकार (Shinde Fadanvis Govt) सत्तेत आल्यानंतर 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार (Cabinet Expansion) झाला. मात्र या विस्तारात अनेकांना डावलले गेले. यात अपक्ष आमदार बच्चू कडू यांचाही समावेश आहे. मंत्रिपद न मिळाल्यानं बच्चू कडू (bacchu kadu )हे नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यावर त्यांनी स्वत: भाष्य केलं आहे. 15 सप्टेंबरच्या आत मंत्रीमंडळ विस्तार होईल असं म्हणत बच्चू कडू यांनी आपल्याला शब्द दिला असल्याचं म्हटलं आहे. याआधी देखील बच्चू कडू यांनी त्यांना मंत्रिपद मिळण्यासंदर्भात दावा केला आहे.

बच्चू कडू आज पावसाळी अधिवेशनात बोलत होते. फोन टॅपिंग प्रकरणावर बोलताना बच्चू कडू म्हणाले की, माझा देखील फोन टॅप झाला होता. मी गांजा तस्करी करतो म्हणून फोन टॅप करण्यात आला होता. याबाबत आरोप झाले परंतु मला कोणाच्या क्लीन चीटची गरज नाही. मी देखील शरण जाणार नाही. या प्रकरणात अधिकाऱ्यांनी काही केलं नसेल तर शरण जाण्याची गरज नाही, असं ते म्हणाले. 
 
व्यक्तिगत हितासाठी आम्ही नाराज होणार नाही

बच्चू कडू म्हणाले की, कामानिमित्त बाहेर असल्याने मी काल येऊ शकलो नव्हतो. नाराज आहे म्हणून न येण्याचं काही कारण नाही. नाराजी असली तरी ती सभागृहात दाखवण्यात अर्थ नाही. मी याआधीही बोललो आहे की, व्यक्तिगत हितासाठी आम्ही नाराज होणार नाही. महत्त्वाचे मुद्दे असून त्यासंबंधी लढा सुरु राहील, असं ते म्हणाले.

सिंचन घोटाळ्याच्या चौकशीसंबंधी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, ईडीचा उपयोग देशातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी केला आणि तो सार्वत्रिक केला तर चांगलं होईल.  

फडणवीस आणि गडकरी यांना वेगळं करुन चालणार नाही

भाजपने निवडणूक समितीत गडकरींना वगळून फडणवीसांना स्थान दिल्याबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे. फडणवीस आणि गडकरी यांना वेगळं करुन चालणार नाही. भाजपाची निती पाहता तिथे व्यक्तिगत पाहिलं जात नाही, असं ते म्हणाले.

इतर महत्वाच्या बातम्या

Maharashtra Monsoon Assembly Session : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस, 'या' मुद्द्यांवर विरोधक होणार

Maharashtra Monsoon Session LIVE : पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस, प्रत्येक अपडेट एका क्लिकवर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Aadivashi MLA Protest Special Report : आदिवासी आमदारांच्या मागण्या काय ?Top 25 : टॉप 25 न्यूज : 10 PM :4 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaHarshvardhan Patil Special Report : जुना हिशेब, साथीला साहेब; हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारीPune Crime Special Report : सोकोवले गुन्हेगार; पुण्यात पुन्हा अत्याचार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
आंदोलनाच्या सुरुवातीपासून आम्ही जरांगे पाटलांसोबत; आमदार धीरज देशमुखांनी घेतली भेट
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
अमेरिका नाही, तर सिंगापूरच्या राष्ट्राध्यक्षांना सर्वाधिक पगार; भारतीय चलनानुसार किती?
PM Internship : पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
पीएम इंटर्नशीपसाठी 'या' दिवसापासून भरता येणार फॉर्म, तरुणांना दरमहा मिळणार 5 हजार रुपये; कसा कराल अर्ज?
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, चकमक सुरूच; बॉर्डरवर 600 जवान तैनात
Dilip Khedkar : बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
बोगस IAS अधिकारी पूजा खेडकरच्या वडिलांचे राधाकृष्ण विखे पाटलांवर गंभीर आरोप! लेकीच्या विरोधातील कारवाईवरही बोलले
S Jaishankar Pakistan Visit : तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तब्बल 9 वर्षांनी पहिल्यांदाच मोदी सरकारमधील मंत्री दोन दिवस पाकिस्तान दौऱ्यावर जाणार!
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तारीख अन् वेळ ठरली, जयंत पाटलांनीच सांगितला; हर्षवर्धन पाटलांसाठी शरद पवारांची इंदापुरात जंगी सभा
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
तुमच्या सरदाराने सत्तेच्या जाळ्यात उड्या मारल्या होत्या ना?; झिरवळांच्या उडीवर भडकले राज ठाकरे
Embed widget